पॅरालिम्पिकचा अज्ञात इतिहास आणि यंदाच्या सहभागी भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
ऑलिंपिकनंतर आता जगाला पॅरालिम्पिकचे वेध लागले आहेत. दर चार वर्षांनी ऑलिंपिक स्पर्धेनंतर ही स्पर्धा आयोजित केली जाते. ऑलिंपिकपेक्षा थोडी वेगळी असलेली ही स्पर्धा, जगाच्या दृष्टीने तितकीच महत्वाची असते जितकी ऑलिंपिक! या स्पर्धेतून आपल्याला जगभरातील अपंग खेळाडूंचं कौशल्य कळून येतं.
पॅरालिंपिक स्पर्धेच्या बोधचिन्हात लाल, निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे. अगिटो म्हणजे लॅटिन भाषेत ‘आय मूव्ह’ असा अर्थ होतो. भारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.
यंदाही पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताकडून ५४ सदस्यीय खेळाडूंचं पथक सहभागी होत आहे. देवेंद्र झझारिया, मयप्पन थांगवेलू यांसारखे खेळाडू पुन्हा एकदा भरभरून यश मिळवायला सज्ज झाले आहेत.
या पॅरालिम्पिक खेळांचा इतिहासही त्यांच्यासारखाच रंजक आहे. पॅरालिंपिक हा शब्द पॅरलल ऑलिम्पिक या दोन शब्दांचं मिश्रण करून बनवण्यात आला आहे. त्याच्या नावात समांतर हा अर्थ दडला आहे.
ऑलिंपिकच्या धर्तीवर समांतर पातळीवर आयोजित होणारी स्पर्धा असं या स्पर्धेचं स्वरुप असतं. नाझी जर्मनीतून इंग्लंडला रवाना झालेले सर ल्युडविक गटमन या
डॉक्टरांनी स्टोक मँडव्हिले रुग्णालयात मणक्याच्या दुखापतींकरता विभाग सुरू केला होता. तिथूनच पॅरालिम्पिक खेळांची संकल्पना उदयास आली.
पहिली पॅरालिंपिक स्पर्धा १९४८ साली ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हा या स्पर्धेचं नाव स्टोक मँडव्हिले गेम्स असं होतं. दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्या, कायमचं अपंगत्व आलेल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्याचं या स्पर्धेचं विशेष उद्देश्य होतं.
–
हे ही वाचा – ११ खेळाडूंचा बळी घेणारी ती ऑलिम्पिकची रात्र आजही अंगावर काटा आणते!
–
१६ पुरुष खेळाडूंसह काही महिला खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा पॅरालिंपिक गेम्स या नावाने १९६० पासून सुरू झाली. हळूहळू स्पर्धेचा प्रचार प्रसार वाढू लागला आणि रोम इथं झालेल्या या स्पर्धेत २३ देशातले ४०० खेळाडू सहभागी झाले होते.
१९८९ साली इंटरनॅशनल पॅरालिंपिक कमिटीची, स्पर्धेच्या सुसूत्रीकरणासाठी स्थापना करण्यात आली. यावर्षी २४ ऑक्टोबर ते ५ सप्टेंबर पर्यंत होबऱ्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू –
तिरंदाजी (ज्योती बालयान, राकेश कुमार, हरविंदर सिंह, श्याम सुंदर स्वामी, विवेक चिकारा) – ५
अॅथलेटिक्स (अजित सिंग, अरविंद, रणजीत भाटी, वरुण सिंग भाटी, एकता भयान, देवेंद्र झझारिया, धरमबीर, सुंदर सिंग गुर्जर, भाग्यश्री जाधव, योगेश कथुउनिया, अमित कुमार सरोहा, शरद कुमार, कशीश लाक्रा, नवदीप, निशाद कुमार, प्रवीण कुमार, राम पाल, सोमन राणा, संदीप, सिमरन शर्मा, टेकचंद, मेरीयप्पन थांगवेलू, विनोद कुमार) – २४
बॅडमिंटन (प्रमोद भगत, पलक कोहली, याथीराज सुहास ललिनकरे, कृष्णा नगर, परुल परमार, मनोज सरकार, तरुण ढिल्लाँ) – ७
कॅनोई स्प्रिंट (प्राची यादव) – १
पॉवरलिफ्टिंग (जय दीप, साकीना खातून) – २
नेमबाजी (आकाश, सिद्धार्थ बाबू, दीपक, रुबिना फ्रान्सिस, अवनी लेखारा, मनीष नरवाल, राहुल जखर, दीपंदर सिंग, सिंघराज, स्वरुप उन्हाळकर) – १०
जलतरण (सुयश जाधव, निरंजन मुकुंदन) – २
तायक्वांडो (अरुणा तन्वर) – १
टेबल टेनिस (भविनाबेन पटेल, सोनलबेन पटेल) – २
मग तुम्ही आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी प्रार्थना करणार ना?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.