Site icon InMarathi

दीर्घायुषी होण्याचा महामंत्र, ब्लु झोन डाएट! समजून घ्या आणि आचरणात आणा

breakfast 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अन्न – म्हणायला तर परब्रम्ह, आपली सगळी खटाटोप ही पोट भरण्यासाठीच चालली असते. आपलं शरीर सुरळीतपणे सुरु ठेवायला अन्न हे अत्यावश्यक आहेच पण हेच अन्न जर अति झालं, त्याचा अतिरेक झाला तर अनेक जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतं.

ओबेसिटी, हार्ट अॅटॅक, कोलेस्ट्रॉल, PCOD, अकाली अनैसर्गिक मृत्यू हे सगळं फक्त चुकीचं अन्न ग्रहण केल्याने होऊ शकतं. आपल्याला अन्न ग्रहण कसं करावं, कोणता पदार्थ कोणत्या पदार्थांबरोबर खाऊ नये, कोणते पदार्थ हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत हे आपल्याला अजिबात ठाऊक नसतं आणि आपण सतत चुकीचं अन्न खात असतो. आणि मग वजन कमी करायचं असलं किंवा अन्न ग्रहण करण्याची पद्धत तळावर आणणे असो, आपण अत्यंत कठोर मार्गांचा अवलंब करतो.

 

 

जसे की अगदी काट्यावर मोजून जेवणे, कठीण वेळा पाळणे, आवडते पदार्थ पूर्णपणे वर्जित करणे, इत्यादी. पण जगाच्या काही भागात अशी ही माणसं आहेत जी आपलं मन ना मारता, आपल्या आवडीची पदार्थ खाऊन सुद्धा अत्यंत सुदृढ आहेत. ती माणसं हमखास शंभरी सुद्धा गाठतात. फक्त त्यांच्या डाएटच्या भरवश्यावर. त्यांच्या डाएटला ब्लु डाएट असं म्हणतात.

आज आपण याच ब्लु डाएट विषयी जाणून घेणार आहोत. संशोधकांनी ब्लु डाएटचं आचरण करणाऱ्या अनेक देशातील तब्बल १५० खाद्य पदार्थांचा आणि पद्धतींचा अभ्यास करुन हे खालील काही निष्कर्ष काढले आहेत. काय आहे ब्लु डाएट जाणून घेऊया.

ब्लु डाएट –

ही एक अशी आहार पद्धती आहे, ज्यात व्हिटॅमिन्स, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, अमिनो ऍसिडस् असे अन्नातील पौष्टिक घटक मोजून मापून ना खाता, नैसर्गिक पद्धतीने जसे मिळतील तसे घ्यायचे असतात. ब्लु डाएट मुख्यतः प्लांट बेस्ड डाएट – जसे कडधान्य, फळं, भाज्या, बिया यावर आधारित आहे. यातील एक एक घटक आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत.

१. प्लांट बेस्ड अन्न –

ब्लु डाएटमध्ये प्लांट बेस्ड अन्नपादार्थांच्या निवडीला भरपूर प्राधान्य दिलं आहे. फळ भाज्या, पाले भाज्या, कडधान्य, कंदमुळं, plant milk जसं बदामाचं दूध, नारळाचं दूध, इत्यादी यांचा आहारात जास्त समावेश असतो. हे डाएट फॉलो करणारे लोक सहसा सगळेच डेअरी उत्पादनं टाळतात.

हा बदल एका दिवसात घडणार नसतो पण आपल्याला सतत प्रयत्न करायचे असतात. त्यामुळे उद्या किंवा पुढील ३-४ दिवस लागणाऱ्या भाज्या आणि फळं आधीच आणून ठेवा जेणेकरून भूक लागल्यास ते पटकन उपलब्ध असतील.

 

 

२. दूध आणि इतर डेअरी उत्पादनं –

डेअरी उत्पादनांतून आपल्याला कॅल्शियम व प्रोटीन मिळते म्हणून आपल्या पूर्वजांनी १०,०००-५०,००० वर्षांपूर्वी आपल्या आहारात दुधाचा आणि त्यापासून बनलेल्या अनेक पदार्थांचा, जसे – पनीर, चीज, तूप, लोणी, यांचा समावेश करून घेतला आहे. पण काळानुसार बदलणाऱ्या वातावरणानुसार आजकालची माणसं लॅक्टोज इनटॉलरंट झालेली आहेत. ज्यामुळे त्यांना दुग्धपदार्थांत असलेलं लॅक्टोज पचायला जड जातं.

ब्लु डाएटमध्ये हे दुग्ध पदार्थ संपूर्ण वर्ज करुन त्यांच्या ऐवजी “प्लांट बेस्ड” पदार्थांचा समावेश करून घेतात. जसे गाय किंवा म्हशीच्या दुधा ऐवजी बदाम, नारळ, सोयाबीनचं दूध वापरणं, पनीर ऐवजी सोयाबीन पासून बनलेला टोफू वापरणे, इत्यादी.

 

zaykarecipes.com

३. मांसाहार टाळा –

मांसाहार हा जरी प्रोटीनचा उत्तम स्रोत असला तरी त्यात सॅच्युरेटेड फॅट सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतात. जे आपल्या शरीराला पचायला अत्यंत जड जातं. मांसाहारी पदार्थांमुळे हार्ट डिसीज, कोलेस्ट्रॉल, आणि कॅन्सरसारखे आजार सुद्धा होऊ शकतात. पण तुम्हाला मोह आवरत नसेल तर आठवड्यातून केवळ २ अंडी किंवा आठवड्यातून एकदा मांसाहार, इतक्याच मात्रेत तुम्ही ग्रहण करायला हवं. मांसाहारातही मासोळी हाच एक उत्तम पर्याय आहे.

 

 

४. कोणतं तेल वापरावं –

आता भाज्या करताना, फोडणी घालताना कोणत्याना कोणत्या तेलाचा, तुपाचा किंवा बटरचा वापर करावाच लागतो. पण इतर सगळ्या तेलांमध्ये अमिनो अॅसिड, फॅट्स, यांबरोबर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे घटक सुद्धा असतात. त्यामुळे शक्यतो आपण ऑलिव्ह ऑइलचाच वापर करायला हवा. ज्यात अनेक उपयुक्त अमिनो ऍसिडस् असतात, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचं काम करत.

 

today.com

५. साखर पूर्णपणे कमी करा –

refined sugar म्हणजे पांढरी प्रोसेस केलेली साखर हि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. वजन वाढवण्याबरोबरच ती कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढवते ज्यामुळे रक्त घट्ट होऊन आपल्याला हार्ट अॅटॅक येणाची शक्यता असते. शिवाय टाइप २ डायबेटीसचा सुद्धा धोका वाढतो. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की साखरेचा अति वापर केल्याने, आपलं जीवन हे ४ वर्षांनी कमी होतं. त्यामुळे साखर आणि साखरयुक्त पदार्थ पूर्णपणे बंद करून टाका.

 

 

६. पाकिटात मिळणारे सगळेच पदार्थ संपूर्णपणे टाळा –

पाकिटातील पदार्थ जास्त दिवस चांगले आणि फ्रेश ठेवण्यासाठी त्यांच्यात preservatives चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यामुळे आपल्या हृदयासाठी सगळ्यात घातक असलेल्या ट्रान्स फॅटची निर्मिती होते. हे ट्रान्स फॅट आपल्या रक्तवाहिन्यांना चिकटून बसतात आणि यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होत नाही.

 

 

७. सुक्यामेव्याचा वापर –

सुका मेवा जरी फार महाग वाटत असला तरी आपल्या शरीराच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे असतात. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हला काहीतरी चटर पटर खाण्याची इच्छा होईल, तेव्हा शक्यतो विविध प्रकारचा सुका मेवा ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. जस बदाम, काजू, अक्रोड हे रोज संतुलित प्रमाणात ग्रहण केल्या जायलाच हवं.

 

 

हे डाएट फॉलो करणारे लोक जबरदस्ती स्वतःवर ते लादून घेत नाहीत. त्यांची जीवनशैलीच आता तशी झालेली आहे. डाएट हे कधीच जबरदस्तीने लादलेलं नसून आपली जगण्याची पद्धत बनायला हवी. तुम्ही सुद्धा ब्लु डाएट फॉलो केलं तर तुमचं जीवन सुद्धा निरोगी होऊन २०-३० वर्षांनी नक्कीच वाढेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version