आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
देशावर संकट आलं की त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पुढे येतात ते शूरवीर जवान! अशावेळी नेतेमंडळी आपण सामान्य नागरिक आपापला जीव वाचवण्यासाठी एक तर देश सोडतात नाहीतर सुरक्षित स्थळी जाऊन आसरा घेतो.
तालिबानी टोळ्यांनी चक्क अफगाणिस्तान देशच ताब्यात घेतला असून आता तिथे सत्ता देखील त्यांचीच असणार, अफगाणिस्तानचे सर्वेसर्वा अश्रफ घनी जनतेला धीर द्यायच्या ऐवजी आपल्या कुटुंबाला घेऊन पळून गेले. जनता मात्र मिळेल तसा पळ काढत होती.
आपल्या इथे वडापमध्ये जसे गर्दी करून बसतात अथवा लोकल मध्ये लटकवून प्रवास करतात तसेच तिकडची जनता विमानावर लटकून प्रवास करत होती..
आज संपूर्ण जगात स्थलांतरित हा मुद्दा सतत चर्चेत असतोच, प्रगत राष्ट्रात विकसानशील देशातून आलेल्या नागरिकांनामुळे तेथिल स्थानिकांना रोजगार मिळत नाही, त्यातूनच अनेक वाद निर्माण होतात. आज आपल्या देशात एखादे छोटे काम करायला लोक नाक मुरडतात मात्र तीच लोक परदेशात गेल्यावर मात्र पडेल ते काम करतात .
अफगाणिस्तानच्या लोकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे असाच एक फोटो व्हायरल झाला आहे तो म्हणजे एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या माणसाचा! एक वेळ तो सामान्य माणूस असेल तर ठीक, मात्र तो कोणी सामान्य माणूस नसून चक्क अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचा आहे.
कोण आहेत सय्यद अहमद शाह सादत?
अफगाणिस्तानात जेव्हा घनी यांचे सरकार होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात सईद हे दूरसंचार विभागाचे मंत्री होते. तालिबानी हल्ल्याची कुजबुज मंत्रिमंडळात आधीपासूनच लागली असावी कारण त्यांच्यासोबतचे अनेक मंत्री हल्ला होण्याच्या आधीपासूनच देश सोडून पळून गेले होते.
मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेण्याच्या आधीच सय्यद यांनी देश सोडण्याच्या हालचाली सुरु ठेवल्या होत्या, २०२० साली त्यांनी राजीनामा देऊन, अनेक देशांना विनवणी केली होती अखेर जर्मन सरकारने त्यांना आश्रय दिला.
जर्मनीमध्ये आश्रय तर मिळाला मात्र पोट पाण्यासाठी काहीतरी कराव लागलेच, आधीच कोरोनामुळे जगभरात अनेकांचे जॉब गेले. त्यात लगेचच चांगल्या पगाराची नोकरी मिळेल याची शाश्वती नाही, म्हणूनच त्यांनी थेट पिइझा डिलिव्हरी बॉयचा जॉब स्वीकारला, आज ते जर्मनीमधील लोकांच्या घरी पिझ्झा देण्याचं काम करत आहेत.
सय्यद अहमद हे स्वतः इंजियनर आहेत आणि ऑक्सफोर्डसारख्या मोठ्या कॉलेजमधून शिकलेलं आहेत. तसेच त्यांनी अफगाणिस्तानात असताना अनेक मंत्रिपद भूषवली आहेत.
–
हे ही वाचा – अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.
–
आज कोरोनामुळे खरं तर आहे तो जॉब टिकवायचे आज लोकांना कठीण झाले आहे, त्यामुळे मिळेल तो जॉब लोकांना टिकवाव लागत आहे, इथे तर चक्क एका देशाचा मंत्रीच पिझ्झा डिलेव्हरीच काम करत आहे. त्यामुळे अफगाणी जनतेला पोटापाण्यासाठी काय करावे हा प्रश्न आहेच..
या एका इदाहरणावरून अफगाणिस्तानच्या जतनेचे भयावह भविष्य आणि त्याचे वास्तव उघड झाले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.