' ट्रूकॉलरला टक्कर देणारं हे पहिलं स्वदेशी अॅप प्रत्येकाने इन्स्टॉल करायलाच हवं! – InMarathi

ट्रूकॉलरला टक्कर देणारं हे पहिलं स्वदेशी अॅप प्रत्येकाने इन्स्टॉल करायलाच हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपला फोन जेव्हापासून ‘स्मार्ट’ झाला तेव्हापासून कोणतीही माहिती मिळवणं सहज शक्य झालं आहे. निनावी नंबर वरून आलेला फोन कोणाचा असेल? कोणत्याही कारणामुळे उचलता न आलेला फोन कोणाचा असेल? आलेला फोन विशिष्ट व्यक्तीचा आहे का? हे सर्व ‘ट्रु कॉलर’मुळे आपल्याला शोधायच्या आधीच सापडतं.

 

true caller inmarathi

 

‘मेक इन इंडिया’चा सगळीकडे बोलबाला सुरु असल्याने जास्तीत जास्त मोबाईल अॅप्लिकेशन सुद्धा भारतीय असावीत अशी आता सर्वांचीच इच्छा आहे. आयटी क्षेत्राने या गोष्टीची दखल घेतली आहे. १५ ऑगस्ट २०२१ पासून ‘भारत कॉलर’ हे आपलं भारतीय अॅप्लिकेशन ‘ट्रू कॉलर’ला पर्याय म्हणून आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे ही भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे.

कसं आहे ‘भारत कॉलर’?

कोणाचा नंबर आहे हे सांगण्याबरोबरच ‘भारत कॉलर’ हे अॅप्लिकेशन तुम्हाला आलेल्या बनावटी, धोकादायक नंबर्सची सुद्धा आपल्याला माहिती देणार आहे.

दहा दिवसांपूर्वी गुगल प्लेस्टोर आणि अॅपलवर उपलब्ध करून दिलेल्या ‘भारत कॉलर’ला ६००० पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड करून वापरायला सुरुवात केली आहे. भारतीय कंपनी ‘किकहेड सॉफ्टवेयर्स’ने ‘भारत कॉलर’ची निर्मिती केली आहे.

 

bharat caller inmarathi

 

‘किकहेड सॉफ्टवेयर्स’ या आयटी कंपनीला २०२० मध्ये ‘शैक्षणिक’ क्षेत्रातील सर्वात चांगले अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील ‘स्टार्टअप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं आहे. आयआयएम बँगलोरचा विद्यार्थी प्रज्वल सिन्हा ही कंपनी २०१८ मध्ये सुरू केली होती.

‘भारत कॉलर’ची गरज काय?

२०१७ मध्ये भारतीय संरक्षक दलाच्या असं लक्षात आलं होतं, की अमेरिकेचं ‘ट्रु कॉलर’ हे आपल्या सैनिकांची वैयक्तिक माहिती चोरत आहे.

भारतीय आर्मीने त्वरित सर्व सैनिकांना ‘ट्रु कॉलर’ आपल्या मोबाईलमधून काढून टाकण्याचे आदेश दिले. भारतीय सरकारने बदल सुचवूनही लोकांना सेवा देतांना त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये रस असलेल्या ‘ट्रु कॉलर’ने त्यांच्या कामाच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यास सहकार्य केलं नाही.

हे लक्षात आल्यावर भारतीय आयटी कंपन्यांना ‘ट्रु कॅलर’ सारखं काम करणारं आणि लोकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी न करणारं अॅप्लिकेशन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

data theft inmarathi
thedataprivacygroup.com

 

जानेवारी २०२१ मध्ये ‘ट्रु कॉलर’चा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आणि अवघ्या ७ महिन्यात ऑगस्ट २०२१ मध्ये ‘भारत कॉलर’ या अॅप्लिकेशनचं तज्ञांच्या सहाय्याने लोकार्पण करण्यात आलं आहे. एकूण ९ लोकांच्या टीमवर्कने हे अॅप्लिकेशन इतक्या कमी वेळात लोकांच्या सेवेत हजर झालं आहे.

===

हे ही वाचा – प्रियजनांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा ‘स्मार्ट’ वापर करणारं हे अॅप ठाऊक आहे का?

===

‘भारत कॉलर’मध्ये वेगळं काय आहे?

ज्यांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केलं आहे आणि त्यांच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर सेव्ह केलेला नसेल, तरी त्यांचं नाव तुम्हाला ‘भारत कॉलर’द्वारे आपल्याला स्क्रीनवर लगेच दिसणार आहे.

तुम्ही अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर जे नाव, नंबर टाईप कराल तेच नाव ‘भारत कॉलर’ तुमच्या नावाने सेव्ह करेल आणि त्यासाठी इतर कोणताही शोध करणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.

‘भारत कॉलर’ वापरतांना तुमचं नाव हे कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह केलं जाणार नाही, हेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. हे अॅप्लिकेशन सध्या ५१ हजार कॉल्ससाठी वापरण्यात आलं आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.

सध्या या अॅपचा वापर भारतापूरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये ‘भारत कॉलर’चा वापर केला जाऊ केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय अॅप्लिकेशन इतके फीचर्स नसले तरीही तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी ‘भारत कॉलर’ हे सर्वात सुरक्षित आहे असं कंपनीने सांगितलं आहे.

 

bharat caller trust inmarathi
bharatcallerapp.com

 

लोकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी होऊ नये, यासाठी ‘किक हेड सॉफ्टवेयर्स’ त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला लोकांची माहिती बघण्याची परवानगी दिलेली नाहीये. कंपनीने मुंबईमध्ये एक सर्व्हर बसवलं आहे ज्याची अगदीच मोजक्या लोकांना माहिती आहे. या सर्व्हरची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. या कामात सरकारच्या मदतीची सुद्धा प्रज्वल सिन्हा यांना अपेक्षा आहे.

‘भारत कॉलर’च्या आधी या कंपनीने ‘भारत स्कॅनर’ नावाने अॅप्लिकेशन तयार केलं आहे. चीनच्या ‘कॅम स्कॅनर’ला सर्वोत्तम पर्याय म्हणून ग्राहकांनी त्या अॅप्लिकेशनला गुगलवर चांगले रेटिंग दिले आहेत.

 

bharat scanner inmarathi

 

तुमची माहिती स्वतःकडे न ठेवता सर्व्हर वरून लोकांपर्यंत खऱ्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव पोहोचवणाऱ्या ‘भारत कॉलर’ला आपणही आजच डाउनलोड करायला पाहिजे. आपलं प्रत्येक डाउनलोड हे आपल्या भारतीय आयटी क्षेत्रातील लोकांना अजून असे लोकोपयोगी अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी प्रोत्साहन देईल हे लक्षात घ्यायला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?