हे १० प्राणी सुद्धा बुद्धिमत्तेच्या बाबतीत माणसापेक्षा फार मागे नाहीत, बरं का…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मेंदू म्हणजे माणसाला चालवणारं हेड ऑफिस. हा अवयव सगळ्यांकडेच असतो. पण फक्त मनुष्यालाच वैचारिक क्षमता जास्त असलेला, सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त उपयोगी, वापरला जाणारा असा मेंदू लाभलेला आहे. यामुळेच आपण परिस्थिती नुसार स्वतःला बदलून इथवर पोहचलो आहोत.
अनेक यंत्रांचा शोध लावून स्वतःसाठी आज आपण सगळ्या सुख सोयींची निर्मिती करून घेतली आहे, ज्यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत आपलं आयुष्य जास्त सोपं आणि सुखी झालेलं आहे.
मेंदूमुळेच आपण एकमेकांशी भावनिकरित्या जोडलेले असतो, आपल्याला कलात्मक दृष्टी मिळते, आपण सज्ञानांसारखे वागतो. पण या सगळ्याच गुणांचा प्राण्यांकडे मात्र अभाव असतो त्यामुळे मनुष्य त्यांना आपल्या तुलनेत कमी लेखू लागतो.
तुम्हाला माहित आहे का, की प्राण्यांचा मेंदू बेकाम नसून त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच विचार कला त्यांना अवगत आहेत, त्यांच्या मेंदूची तेवढी वैचारिक पातळी प्रगत असते. इतकंच काय मनुष्यांप्रमाणे विचार करणारे, मनुष्यांसारख्या कला अवगत असणारे प्राणी सुद्धा जगात आहेत. आज आपण त्यांच्याच बद्दल जाणून घेणार आहोत.
१. कावळा
कावळे हे सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यात हुशार आणि बौद्धिक पक्षी मानले जातात. कावळे आणि त्यांच्याच प्रजातीतील इतर पक्षी हे अत्यंत हुशार असतात.
ते माणसांचे चेहरे लक्षात ठेवू शकतात, इतर कावळयांसोबत कठीण विषयांवर चर्चा करू शकतात. आपल्या भविष्याचा सुद्धा विचार करू थकतात. अभ्यासानुसार, कावळ्यांच्या मेंदू हा ७ वर्षाच्या मनुष्याच्या मेंदू इतका प्रगत झाला असतो.
२. चिम्पान्झी
चिम्पान्झी म्हणजे जवळपास माणसासारखाच असणारा एक प्राणी. त्यांच्यात उच्च वैचारिक क्षमता असल्याचे आढळून येते.
ते भाल्यासारखे हत्यार बनवू शकतात, आपल्या मुलांशी आणि जोडीदाराशी भावनिक कनेक्शन स्थापित करू शकतात. याशिवाय हा एकमेव असा प्राणी आहे जो स्वतःला आरशात ओळखू शकतो आणि sign language शिकून, आपल्याशी संभाषण सुद्धा साधू शकतो.
३. हत्ती
हत्तीच्या अवाढव्य आकारासारखारच त्याचा मेंदू सुद्धा तितकाच मोठा असतो. त्यात माणसापेक्षा जास्त न्यूरॉन्स असतात. हत्तीची स्मरणशक्ती कमालीची तगडी असते. कैक वर्षे आधी घडलेली घटना, भेटलेली व्यक्ती ते लक्षात ठेवतात.
४. गोरिला
गोरिला सुद्धा माणसासारखेच हुशार आणि भावनिक असतात. एकदा भाषा शिकले तर गोरिला संपूर्ण वाक्य बनवून माणसाशी संभाषण करू शकतात आणि त्यांना चिन्ह, आणि कॉम्प्लेक्स चित्र सुद्धा पटकन समजतात, ते कोडं सुद्धा सोडवू शकतात.
५. डुक्कर
डुक्कर एक हुशार प्राणी असून कोडे सोडवण्यात ते अत्यंत तरबेज असतात. त्यांना एखाद्या भुलभुलैयासारख्या रस्त्यात सोडून दिले तर त्यातून योग्य मार्ग काढून ते त्याच्या बाहेर पडते.
डुकरांची reflection grasping शक्ती खूप चांगली असते. ६ आठवड्यांचं वय असलेल्या डुकराच्या पिल्लाला आरशात अन्न दाखवलं तर ते अत्यंत कमी वेळात समजून जातं की अन्न नक्की आहे कुठे…
===
हे ही वाचा – आदिम काळात नष्ट झालेल्या प्राण्यांची साक्ष देणारे “हे” वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आजही पृथ्वीवर टिकून आहेत..
===
६. ऑक्टोपस
ऑक्टोपसचा मेंदू सुद्धा आकाराने मोठाच असतो आणि त्यात न्यूरॉनची संख्या जास्त असते. त्याचे २०% न्यूरॉन्स हे त्याच्या हातांमध्ये असतात. त्यामुळे ऑक्टोपस हा आपल्या संरक्षणासाठी युक्तीचा आणि शस्त्रांचा वापर करू शकतो.
दगड फेकून मारणे, पाण्याचे जोरदार फवारे मारणे या त्याच्या दोन मुख्य बचाव पद्धती आहेत.
७. पोपट
कोणताही पोपट माणसासारखा बोलू शकतो हे आपल्याला माहित आहेच. पण याचबरोबर, पोपट कोडे सुद्धा सोडवू शकतो आणि खूप मोठ्या संख्या लक्षात ठेऊ शकतो.
माणसाशी संभाषण साधताना तो आपले स्वतःचे वाक्य बनवून तो शिकलेल्या संख्यांचा, नवीन शब्दांचा वापर सुद्धा अचूकपणे करू शकतो.
८. कुत्रा
खास मित्र आणि अत्यंत स्वामिनिष्ठ असलेला हा प्राणी सुद्धा अनेक शब्द, प्रसंग, ठिकाणं, लक्षात ठेवून त्यानुसार आपलं वागणं ठरवतो. संशोधनावरून हे सिद्ध झालं आहे, की एक श्वान साधारणतः १६५ ते १०२० शब्द लक्षात ठेवून त्यांचा अर्थ समजून घेऊ शकतो.
९. मांजर
मांजर हे अत्यंत चिकित्सक, स्वार्थी आणि स्वावलंबी असतं. परावलंबी नसण्याची भावना आणि स्वतःबद्दल असलेल्या अभिमानामुळे मांजरीना ट्रेन करणे फार अवघड असते, कारण त्या अशा कोणत्याच अॅक्टिव्हिटीमध्ये सहजपणे सहभागी होत नाहीत. ज्यामुळे अद्याप त्यांच्यावर संशोधन सुद्धा फार झालेलं नाही. पण त्या ह्या आपल्या स्वभावामुळे सगळ्यात वेगळ्या क्वालिटी असल्याचे एक संकेत देतात.
१०. कबुतर
कबुतरं ही गणितात अव्वल असतात आणि त्यांचं भौगोलिक ज्ञान हे फार उत्तम असत. ज्यामुळे पूर्वीच्या काळी पत्रव्यवहारासाठी त्यांचा वापर केला जाई. पण आजकाल मोबाईमुळे त्यांचं हे तंत्र बिघडलं आहे.
===
हे ही वाचा – महायुद्धात त्वेषाने लढणाऱ्या या अस्वलाने नाझी सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणला होता!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.