Site icon InMarathi

या झाडांच्या सानिध्यात चुकून सुद्धा आलात तरी मृत्यू निश्चित!

dhoka inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘पुराणातली वांगी पुराणातच’ अशी आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे. पण त्या पुराणांमध्ये काही गोष्टी अशा देखील आहेत ज्यांचे प्रतिबिंब आपल्याला आजही आजूबाजूला पहायला मिळते. त्यातच एक कथा आहे ‘समुद्र मंथनाची’!

ज्यामध्ये उत्पन्न झालेल्या ‘हलाहल’ विषाचे भगवान शंकरांनी सेवन केले, पण ते विष पित असताना त्या विषाचे काही थेंब खाली धरतीवर असलेल्या प्राणी,पक्षी ,वनस्पति यांच्यावर पडले आणि त्या कायमच्या विषारी झाल्या.

 

 

कथा काहीही असो पण जगात अशा विषारी वनस्पती अस्तित्वात आहेत ज्यांच्यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. खरंतर झाडे ही आपल्या जगण्याचे कारण आहेत. आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा भागवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसा झाडांच्या बाबतीतही अपवाद आहे.

काही झाडे किंवा त्यांचे काही भाग इतके विषारी असतात की त्यांच्या नुसत्या स्पर्शाने किंवा त्यांची फुले ,फळे खाण्याने मृत्यू होवू शकतो. या लेखात आपण अशाच काही झाडांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला त्यांची ओळख होईल. चला तर पाहूया अशी काही झाडे.

 

१. मशिनील ट्री :

करेबियन बेटांवर आढळणारे ‘मेशीनील’ हे झाड जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी झाड म्हटलं जातं. एवढेच नाही तर या झाडामध्ये एतके विष असते की याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या झाडाचे फळ जर चुकूनही कुणी खाल्ले तर त्याच्या जिवावर बेतू शकते.

 

Austin tree services inc

 

मेशीनीलचे झाड ५० फूट उंच असते. याच्या फळामध्ये भयंकर विष असते, त्याचा एक थेंबही त्वचेवर पडल्यास त्वचेवर वाईट पद्धतीने जखम होते. तसेच त्या जागेवर खुप जळजळ होते आणि सुज येते. या फळाला खाणारा व्यक्ती अंधळा होण्याची शक्यताही आहे.

जर एखाद्या व्यक्तीने या झाडाचे फळ खाल्ले तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. यामुळेच जेथे जेथे ही झाडं आहेत त्या ठिकाणच्या परिसरात धोक्याची सुचना देणारे फलक लावण्यात येतात.

 

२. विस्टेरिया :

ही वनस्पती भारतासह जगभरात अनेक ठिकाणी आढळून येते. याचे फूल जांभळ्या रंगाचे आणि आकर्षक असते, पण तेवढेच धोकादायक असते. या वनस्पतीचा कोणताही भाग खाण्यात आल्यास सुस्ती, डोकेदुखी अशक्तपणा, ताप येणे इत्यादी त्रास होवू शकतात.

 

Jardineria

 

३. जायन्ट हॉगवीड :

इंग्लंडमध्ये आढळणारी ही वनस्पती देखील विषारी कुळात येते. हिची फुले शुभ्र ,सफेद रंगाची असून सुंदर असतात. पण जर ती खाण्यात आली तर हमखास मृत्यू होतो. आजवर अनेक लोकांना ही फुले खाण्यात आल्याने मृत्यू आला आहे आणि जर ही फुले डोळ्यांच्या संपर्कात आली तर अंधत्व सुद्धा येते.

 

BBC

 

४. सरबेरा ओडोलम :

या झाडाला ‘सुसाईड ट्री’ म्हणूनही ओळखले जाते. भारतात केरळसह दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांमध्ये हे झाड आढळते. दिसायला सुंदर असणारे झाड तेवढेच जहाल आणि विषारी आहे.

याच्या बियांमध्ये सरबेरीन नावाचा घटक असतो ज्याच्यामुळे हे खाण्यात आले तर पोटदुखी,डोकेदुखी,उलट्या, डायरिया तसेच हृदयाचे ठोके अनियमित होणे हे त्रास होतात आणि काही अवधीतच मृत्यू येवू शकतो. एखाद्या विषारी इंजेक्शन सारखेच या झाडाचे विष काम करते.

 

 

 

५. बेलाडोना :

मध्य आणि दक्षिण आशियात आढळणारे हे झाड नाईट्शेड या नावाने देखील ओळखले जाते. फळ विषारी असून ते काळ्या रंगाचे असते. ते खाण्यात आले तर उलटी, जुलाब, चक्कर हे त्रास होवू शकतात.

 

herbal tips

 

६.पॉयजन ओक आणि आईवी :

या वनस्पतीच्या संपर्कात आल्यावर मानवी त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटतात. जखम होते. तसेच काही वेळेला याच्यामुळे जीव जाण्याच्या घटनाही घडतात, मानवी त्वचेसाठी प्रचंड हानिकारक अशी ही वनस्पती आहे.

 

wikipedia

 

७. रोसरी पी किंवा गुंज :

आयुर्वेद शास्त्रात या वनस्पतीच्या पाने आणि मुळे यांचे जारी औषधी गुणधर्म संगितले असले तरी त्याची फळे तेवढीच विषारी असतात. ही फळे खाण्यात आल्यावर मृत्यू होतो. पूर्वीच्या काली या बियांचा वापर दागिन्यांमध्ये होत असे. पण त्यांच्या विषारीपणामुळे आता केला जात नाही.

 

amaruajala

 

८. एंजल्स ट्रंपेट ( धोत्रा ) :

छोट्या घंटेच्या आकाराची फुले असलेली ही वनस्पती गार्डनिंगसाठी उपयुक्त असली तरी तिच्या बिया विषारी असतात. त्यांमध्ये असलेल्या tropane alkaloids मुळे भ्रम होतो. तसेच वेगवेगळे आभास होवू शकतात. विषबाधा होवू शकते.

 

better homes and gardens

 

९. स्ट्रीकीनाइन ट्री किंवा कुचला :

भारत, दक्षिण-पूर्व आशिया मध्ये आढळणारा हा पानझडी वृक्ष असून स्ट्रीकीनाइन या घटकामुळे स्नायू आणि चेत संस्था यांवर परिणाम होवू शकतो.

vindhyan ecology

 

याशिवाय यूरोपियन यू, ज्ञ्ंपी, ओलेंडर, मिल्की मंग्रोव, द सँडबॉक्स ट्री, बुन्या पाईन, ही झाडे देखील विषारी वर्गात मोडतात. तर ही होती जगातील काही जीवघेणी झाडे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version