' जेव्हा सचिन, गांगुली आणि द्रविड यांनी एकत्र एकाच मॅचमध्ये ठोकलं होतं शतक! – InMarathi

जेव्हा सचिन, गांगुली आणि द्रविड यांनी एकत्र एकाच मॅचमध्ये ठोकलं होतं शतक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सचिन, गांगुली आणि द्रविड जेव्हा एकत्र खेळत, तेव्हा ती मॅच पाहणं ही खऱ्या अर्थाने पर्वणीच म्हणायला हवी. परफेक्ट बॅटिंग ऑर्डर म्हणजे काय, हे या तिघांना आणि त्यांच्या संघसहकाऱ्यांना पाहून म्हणता येत असे.

यातील प्रत्येक खेळाडूची खेळाची पद्धत वेगळी होती. सौरव गांगुलीची खेळी जितकी आक्रमक तितकीच राहुल द्रविडची खेळी अत्यंत संयमी.

 

ganguly and dravid inmarathi

 

१९९६ ते २००८ या काळात सचिन, गांगुली आणि द्रविड हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ होते. या तिघांनी या काळात अनेक शतकं केली, पण इंग्लंड विरुद्धच्या एका मॅचमध्ये या तिघांनीही शतक ठोकले होते.

त्रिमूर्ती…

२६ ऑगस्ट २००२ मध्ये इंग्लंडमधील लीड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंडची तिसरी टेस्ट मॅच होती. गांगुलीने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी चायनीज प्रोडक्ट म्हणून ओळख असणाऱ्या सेहवागची लगेच विकेट गेली. चले तो चांद तक, नहीं तो रात तक अशा खेळामुळे सेहवागला हे नाव पडले होते.

 

sehwag inmarathi
crictracker.com

 

सचिन जगातील उत्तम बॅट्समन आहे, पण तो मॅच जिंकून देऊ शकत नाही. तसेच गांगुली शॉर्ट बॉल खेळू शकत नाही. आणि राहुल द्रविड खेळातील प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण त्यामुळेच त्याचा खेळ संपू शकतो अशा चर्चा या टेस्ट मालिकेदरम्यान सुरु होत्या.

त्या मॅचमधील तिघांच्या खेळाने मात्र सर्वांचच बोलणं बंद झालं. या मालिकेत १ मॅच हरल्यावर आणि दुसरी मॅच ड्रॉ झाल्यावर भारतीय संघ ही मॅच जिंकायचीच या विचाराने मैदानावर उतरला. सेहवाग बाद झाल्यावर द्रविड आला आणि जणू त्याने ‘पॅव्हेलियनमधून येतानाच विचार केला असावा’ की आज विकेट पडून द्यायची नाही, असा चिकटला.

 

dravid inmarathi

 

त्यानुसारच तो प्रत्येक बॉल खेळत होता. त्याच्या अशा खेळण्याने बॉलर अक्षरशः हैराण झाले होते. तो अत्यंत शांतपणे खेळत होता, कोणत्याही प्रकारे रन्सची अपेक्षा न करता आत येणारा बॉल संयमाने खेळत होता आणि बाहेर पडणारा बॉल सोडत होता.

त्याच्या सोबतीला होता संजय बांगर, पण काही वेळेच्या खेळांनंतर तोदेखील आऊट झाला. आणि त्यानंतर सचिन मैदानावर आला.

सचिन बहरात आला…

सचिन आला तसा मैदानात टाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. भारतीय फॅन्स हे एकमेव असतील जे आपल्याच संघाची विकेट गेल्यावर टाळ्या वाजवत असत. त्यादिवशी सचिनचा खेळ पाहून असं वाटत होतं की तो मैदानात उतरला ते आपल्या बॅटने सर्वांना उत्तर देण्यासाठीच.

जे जे त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह उभे करत होते त्या सर्वांना तो आपल्या स्ट्रेट ड्राईव्ह आणि पूल शॉट्सने उत्तर देत होता. द्रविड १४८ रन्स करून आऊट झाला.

सचिन आणि द्रविड या जोडीने १५० रन्सची भागीदारी केली. यादरम्यान सचिनने करिअरमधील तिसावे शतक पूर्ण केले होते. द्रविडच्या विकेट नंतर त्यावेळचा आक्रमक आणि सडेतोड उत्तर देणारा भारतीय कर्णधार सौरव गांगुली मैदानावर आला.

 

sachin and dravid inmarathi

 

गोलंदाजांना सतवलं

ज्या पद्धतीने राहुल आणि सचिनने आपल्या खेळाने उत्तर दिलं तसंच काहीसं गांगुलीही आपल्या खेळातून दाखवून देत होता. या तीनही खेळाडूंनी इंग्लंडच्या बॉलर्सची अक्षरशः सहनशीलतेचा अंत पाहिला.

इंग्लंड संघाने विचार केला असेल की एखादा खेळाडू शतक करेल, पण इथे तर तीन तीन खेळाडू शतक करत आहेत. त्यांची विकेट काढण्यासाठी एश्ले जाईल्स आणि इतर खेळाडू भेदक, आक्रमक बॉलिंग करत होते. सचिन आणि गांगुली सुद्धा त्यांना तसंच उत्तर देत होते.

जाईल्सच्या बॉलिंगला उत्तर म्हणून गांगुलीने त्याच्या एका षटकात २३ रन्स ठोकले. पंचांनी गांगुलीला नीट प्रकाश नाही म्हणून, म्हणजेच बॅड लाईटमुळे खेळ थांबणवण्याचा पर्याय दिला होता. पण त्याने ऐकलं नाही कारण तो खूप चांगली बॅटिंग करत होता.

 

saurav ganguly batting inmarathi

 

सचिन आणि गांगुलीने २४९ रन्सची भागीदारी केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच १५० रन्सहून अधिकची पार्टनरशिप झाली होती.

द्रविड ने ३०७ चेंडूंमध्ये १४८, सचिनने ३३० चेंडूंमध्ये १९३ आणि गांगुलीने १६७ चेंडूंमध्ये १२८ असे रन्स केले. इंग्लंड बॅटिंगला आली पहिल्या डावात २७३ आणि दुसऱ्या डावात ३०९ रन्सवर ते ऑल आऊट झाले.

अनिल कुंबळेने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ४ अशा विकेट घेतल्या. हरभजनने सुद्धा पहिल्या डावात ३ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये १४८ रन्स करणाऱ्या राहुल द्रविडला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.

सचिन, गांगुली आणि द्रविड या तिघांना भारतीय क्रिकेटचा देव, दादा आणि भिंत असं का म्हटलं जातं ते ही मॅच पाहणाऱ्या अनेक भारतीयांना आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींना कळलं असेल.

 

sachin dravid ganguly inmarathi

 

आपल्या खेळाने त्यांनी कायमच क्रिकेटप्रेमींना खेळाचा आनंद लुटू दिला आहे. आजच्या खेळाडूमध्ये दिसणारी आक्रमकता किंवा काही वेळा शांतपणा हे याच पिढीतील खेळाडूंकडून आले आहे असं दिसतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?