आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
५ डिसेंबर २०१६ रोजी तामिळनाडू मधील जनतेची, गोरगरिबांची ‘अम्मा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयललिता यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या राजकारणात कोण एका महिला नेत्याला इतकी प्रसिद्धी, इतक प्रेम मिळाल्याच उदाहरण फारच दुर्मिळ आहे. जयललितांसाठी तामिळनाडू मधील जनता अक्षरश: वेडी होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण तामिळनाडू राज्यावर शोककळा पसरली. जणू आईच्या जाण्याने तेथील जनता पोरकी झाली. स्त्री-पुरुष, लहान-थोर धाय मोकलून रडताना दिसले. प्रत्येक नागरिकाच्या मनात आपुलकीच स्थान मिळवणाऱ्या जयललिता यांनी असा काय बदल घडवून आणला होता की लोक त्यांना देवाचा दर्जा देऊ लागले त्याचा आढावा या लेखात आपण घेणार आहोत.
एक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरु करणाऱ्या जयललिता यांनी राजकारणाच्या क्षेत्रात पाउल टाकल आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तीन गोष्टींपासून मिळालेल्या सहनुभुतीच्या आधारावर तामिळनाडू राज्याची सत्ता अलगद त्यांच्या हातात आली. जयललिता यांचे राजकीय सल्लागार आणि एडीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एमजी रामचंद्रन यांचा १९८७ सालच्या अखेरीस मध्ये मृत्यू झाला आणि पक्षाची धुरा जयललिता यांनी हाती घेतली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
१९८९ मध्ये त्या आमदार म्हणून विधानसभेत गेल्या. त्यावेळी करुणानिधी यांच्या डीएमके पक्षातील मंत्र्यांनी भर विधानसभेमध्ये जयललिता यांची साडी फाडली, चवताळलेल्या जयललिता यांनी सभेचा त्याग केला. या घटनेमुळे डीएमके पक्षाची भरपूर नाचक्की झाली आणि जयललिता यांना जनतेची सहानुभूती मिळाली. १९९१ मध्ये निवडणुकीत जयललिता यांनी कॉंग्रेस पक्षासोबत युती केली, परंतु निवडणुकांच्या पूर्वीच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली आणि पुन्हा एकदा जनतेची सहानुभूती जयललिता यांच्या पदरात पडली.
१९९१ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षासोबत भरघोस मतांनी निवडून येत जयललिता तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. दरम्यानच्या काळात भारत सरकारने उचललेले आर्थिक उदारीकरणाचे पाउल पहिल्याच वेळेस मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणाऱ्या जयललिता यांच्या चांगलेच पथ्यावर पडले. त्यांनी तामिळनाडू राज्यातील उद्योगधंद्यांना चालना दिली. परिमाणी उद्योजक गट त्यांच्या बाजूने उभा राहिला. त्यावेळेस तामिळनाडू मध्ये स्त्रीभ्रूण हत्येला पेव फुटले होते. यावर उपाय म्हणून आणि स्त्रियांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने जयललिता यांनी ‘पाळणा घर योजना’ अंमलात आणली.
दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जयललिता यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प तामिळनाडू राज्यात राबविला आणि आज संपूर्ण देशात तामिळनाडू राज्याचा आदर्श घेऊन ठिकठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प म्हणजे त्यांच्यासाठी मास्टरकार्ड होते. जे यशस्वी ठरले. मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहताना पहिल्या दोन सत्रात त्या अनेक प्रकरणांमध्ये अडकल्या. परंतु पुराव्याअभावी त्या प्रत्येक प्रकरणातून निर्दोष सुटत राहिल्या. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या जयललिता यांनी एव्हाना जनतेमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले होते. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांशी तामिळी जनतेला जणूकाही देणेघेणे नव्हते, जयललिता या उत्तम काम करीत आहे आणि पुढे अनेक वर्षे त्याच मुख्यमंत्री हव्यात असा आग्रह ही जनता धरू लागली होती.
हा सगळा परिमाण होता त्यांनी केलेल्या लोककार्यांचा. बेरोजगारांचा प्रश्न मिटावा यासाठी जयललिता यांनी राज्यात करोडो रुपयांची गुंतवणूक आणली आणि राज्य उद्योगसंपन्न करून दाखविले. १९६७ पासून रखडलेला ‘विरनाम प्रकल्प’ त्यांनी अखेर २००४ मध्ये पूर्ण केला. या प्रकल्पामुळे चेन्नई शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. डाकू वीरप्पन याला मारण्याची कामगिरी देखील जयललिता यांच्या कारकिर्दीत त्यांच्याच आदेशावरून झाली. ज्यामुळे तामिळी जनतेमध्ये जयललिता यांच्या विषयीचा आदर अधिकच बळावला. जयललिता यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांमार्फत चालवण्यात येणारे देशातील पहिले महिला पोलीस स्टेशन उभे केले. तसेच भारताची पहिली महिला पोलीस बटालियन संघटीत करण्याचे श्रेय देखील जयललिता यांनाच जाते.
देशातील सर्वाधिक वीज उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू राज्याचा समावेश जयललिता यांच्याच वीज धोरणामुळे झाला. त्यांनी गरिबांसाठी ‘अम्मा उनावागम’ नावाने अन्नछत्र सुरु केले आणि त्यांचा अपेक्षित फायदा जयललिता यांना झाला. या अन्नछत्रामुळे भुकेने व्याकुळलेल्या गोरगरीब तामिळी जनतेने आशीर्वाद त्यांना लाभले आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी आपला भक्कम मतदारवर्ग निर्माण केला. ‘अम्मा मारुंदगम’ या नावाखाली त्यांनी एक योजना सुरु केली ज्यामार्फत गरिबांना स्वस्त दरात औषधे मिळू लागली. ‘अम्मा कैपेसी थिट्टम’ या योजने अंतर्गत महिला बचत गटांचे काम अधिक सोपे व्हावे म्हणून कम्प्युटराईज्ड मोबाईल फोन्सचे वाटप करण्यात आले.
‘अम्मा कुडीनीर थिट्टम’ योजने अंतर्गत तामिळी जनतेला अतिशय स्वस्त दारात मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यात आले. ‘अम्मा सीड्स’ योजने अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये अगदी कमी किंमतीत उच्च प्रतीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. मध्यमवर्गीय आणि गरिबांना घरे बांधण्यासाठी कमी दरात सिमेंट उपलब्ध करून द्यावे म्हणून ‘अम्मा सिमेंट स्कीम’ सुरु करण्यात आली. ज्या लोकांना रेग्युलर हेल्थ चेकअप परवडत नाही अश्यांसाठी जयललिता यांनी ‘अम्मा हेल्थ चेकअप’ योजना सुरु केली आणि अतिशय कमी दारात लोकांना रेग्युलर हेल्थ चेकअपची सुविधा उपलब्ध करून दिली. ही आहेत काही प्रसिद्ध कामे, याव्यतिरिक्त लोकहितार्थ अनेक उपक्रम राबवून त्यांनी तामिळनाडू मधील जनतेचा कधीही न तुटणारा विश्वास संपादन केला होता.
भारतातील इतर राजकारण्यांच्या तुलनेत आपल्या कारकिर्दीत जयललिता यांनी जनतेसाठी अनेक कामे केली. तामिळनाडू राज्याच्या आंतरिक सुरक्षेवर, अर्थव्यवस्थेवर, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर त्यांनी विशेष भर दिला. बस्स! जनतेला अजून काय हवे असते. दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून दिल्या की जनतेची राजकारण्यांबद्दल कोणतीही तक्रार नसते. बहुधा जयललिता यांनी ही गोष्ट अचूक हेरली होती. म्हणूनच त्यांच्यावर असंख्य आरोप होऊन देखील, त्यांनी तुरुंगवास भोगून देखील त्यांच्या मागे खंबीरपणे उभा असलेला जनसमुदाय तसूभरही मागे हलला नाही. उलट जयललिता यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात लोक रस्त्यावर उतरले. भारतीय इतिहासात असा पाठींबा क्वचितच कोणा नेत्याला मिळाला असेल.
अश्या या लोकनेत्याच्या जाण्याने तामिळनाडू जनतेचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे हे मात्र खरे !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.