Site icon InMarathi

या हॉटेलात लोकांनी वापरलेल्या टूथ ब्रश, कंगव्यापासून थेट वीज निर्मिती केली जाते! वाचा

kawa final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कचरा म्हंटलं की लगेचच आपल्या डोळ्यांसमोर कचर्‍याने भरून वाहणार्‍या कचरा कुंड्या, डंपिंग यार्ड्स आणि एकंदरच अस्वच्छता येते. नकळत आपल्या कपाळावर आठ्या उमटतात कारण गेल्या काही वर्षात प्लास्टीक, इ-वेस्ट आणि इतर कचर्‍याचे प्रमाण इतके वाढले आहे की या कचर्‍याची विल्हेवाट लावणे हे प्रशासनासाठी मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे.

 

 

नवीन डंपिंग यार्ड्स तयार करणे आणि त्याच्याशी संबंधित निर्माण होणार्‍या नवीन समस्या ही देखील एक चिंतेची बाब आहे. कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टीक ची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचा शोध ही लावला जात आहे.

असे असताना जर तुम्हाला समजले की या वेस्ट मटेरियल आणि प्लास्टीक चा वापर करून जर कार्बन डाय ऑक्सिएड विरहित ऊर्जा निर्मिती केली जात आहे आणि इतकेच नाही तर इतर कचरा व उरलेल्या अन्न पदार्थांपासून देखील ऊर्जा निर्मिती केली जात आहे तर?

तर नक्कीच तुमच्या भुवया उंचावल्या जातील आणि मनात कुतूहल निर्माण होईल. कार्बन डाय ऑक्साईड तयार न होता ऊर्जानिर्मिती? हे कसे शक्य आहे ? तर मित्रांनो ही करामत करून दाखवली आहे एका जपानी कंपनीने ते ही एका हॉटेल च्या सोबतीने! जाणून घ्यायचेय ? चला तर मग पाहू ही ऊर्जा निर्मितीची कथा.

 

chiang dao

 

‘कावासाकी किंग स्कायफ्रंट टोकयू रे हॉटेल ‘ जून २०१८ मध्ये सुरू झालेले जपान मधील हे पहिले ‘Hydrogen-Powered Hotel’ जपानच्याच तोशिबा कंपनीने विकसित केलेल्या ‘हायड्रोजन फ्युएल सेल टेक्नोलोजी’ मुळे पूर्णत: पर्यावरणपूरक बनलेलं हे हॉटेल.

तोशिबा कंपनीचे तंत्रज्ञान, कावासाकीमधील स्थानिक ऊर्जा केंद्राशी साधलेला समन्वय यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने प्लॅस्टिक कचर्‍यापासून ३०% तसेच बायोगॅस प्लांटच्या सोबतीने उरलेल्या अन्नापासून ७०% ऊर्जानिर्मिती केली आहे.

हा उपक्रम जपानच्या ‘ Ministry of Environment’s Regional Cooperation’ आणि Low-Carbon Hydrogen Technology Demonstration Project, यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबवण्यात आला.

 

tokyo hotels

 

फूड इंडस्ट्रीमध्ये ही एक प्रकारची क्रांतीच म्हणायला हवी. कारण यातून उरलेल्या वेस्टेजचे रीसायकलिंग होणार आहे. त्याचबरोबर कार्बनचे उत्सर्जन कमी प्रमाणात होवून प्रदूषण नियंत्रण देखील होणार आहे.

टाकाऊ अन्न आणि वस्तु गोळा करून त्यांचा पुन्हा वापर करून हॉटेलच्या वतीने दरवर्षी सरासरी ३०,००० क्युबिक नॅनोमीटर हायड्रोजन निर्माण केला जातो. ज्यातून ४५०.००० kwh वीजनिर्मिती होते , जी जवळपास ८२ घरांना वर्षभर पुरेल इतकी वीज आहे.

हॉटेलमध्ये जमा केलेले प्लॅस्टिक वेस्टेज हे ‘ Showa Denko plastic recycling plant’ इथे रीसायकलिंगसाठी पाठवले जाते. तेथे तयार झालेला हायड्रोजन एका पाईपलाईनद्वारे हॉटेलपर्यंत आणला जातो. या तंत्रज्ञानामुळे दरवर्षी सरासरी २०००० किलो कार्बनचे उत्सर्जन टळले आहे.

 

tokyo hotels

 

हायड्रोजन इंधन सेल सिस्टिम कार्बन च्या उत्सर्जनाशिवाय हायड्रोजन चे रूपांतर वीजेमध्ये करते. ही प्रणाली पूर्ण हॉटेलमध्ये पाइपच्या माध्यमातून वीज पुरवण्याचे काम करते.

हॉटेलमधील सर्व टाकवू कचरा, अगदी हॉटेलमध्ये राहिलेल्या व्यक्तींनी वापरलेले टुथब्रश, कंगवे हे देखील हायड्रोजन बनवण्यासाठी वापरले जातात. यामुळे हॉटेलची विजेची गरज भागवू शकेल एवढ्या हायड्रोजनची निर्मिती सहज होवू शकते.

ही पूर्ण प्रक्रिया ही कार्बन विरहित असल्याने प्रदूषणाचा ही धोका त्यात नाही. आणखी एक अभिनव गोष्ट म्हणजे या हॉटेल मध्ये हायड्रोपोनिक्स (माती शिवाय झाडे उगवण्याचे तंत्रज्ञान) आणि एलईडी प्रकाश संस्लेषण यांच्या मदतीने झाडे, फुलांची रोपे तसेच भाज्या वाढवल्या जात आहेत.

ज्यांचा वापर हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. हॉटेलच्या लॉबीमध्ये कीटकनाशक न वापरलेले लेट्युस देखील उगवले जाते. आणि महिन्यातून एकदा त्याची कापणी होते.

 

Tokyo hotels

 

पर्यटनवाढीच्या दृष्टीने हा उपक्रम, टुरिझम च्या इतिहासात एक मैलाचा दगड होवू पहात आहे. यामध्ये सरकार, स्वायत्त संस्था आणि हॉटेल व्यवस्थापन यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रचंड प्रदूषणाचा सामना करत असताना कावासाकी शहराने पर्यावरणाच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.

यात the chemical production company, Showa Denko, and the headquarters of Toshiba Energy Systems and Solutions. यांचेही योगदान महत्वाचे आहे.

showa denko हे या रिसायकल प्लांटच्या माध्यमातून दिवसाला सरासरी १९५ टन वेस्ट प्लास्टिकचे रीसायकलिंग करतात. तोशिबाच्या या हायड्रोजन फ्यूएल सेल सिस्टमच उपयोग आता इतर ठिकाणी देखील केला जातो आहे,जसे की सुपर मॉल, कमर्शियल साइट्स , मूवी थेटर्स इ.

प्रदूषणाच्या आणि टाकवू प्लास्टीकच्या समस्येशी झगडणार्‍या जगाला तोशिबा आणि kawasaki King Skyfront Tokyu Rei Hotel ने हायड्रोजन फ्यूएल सेल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रदूषणाशी लढण्याचा एक नवा मार्ग दाखवला आहे. आणि आपली पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही पार पाडली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version