Site icon InMarathi

फक्त लढ म्हणा: तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणाऱ्या ७ महत्त्वाच्या टिप्स

aditya desai inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आत्मविश्वास आपल्या जगण्याचा मजबूत पाया असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तीच व्यक्ती यशस्वी होते , जिच्याकडे आत्मविश्वास असतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांच्याकडे बघून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो, कारण ते आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात.

बरेचदा असंही होतं, की तुमच्यात, मुळात आत्मविश्वास असतोही पण घडलेल्या काही नकारात्मक घटनांमुळे तो आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागतो.

 

 

अशावेळी अगदी साधी साधी कामे सुद्धा पूर्ण करणे खूप कठीण वाटू लागतात. या लेखात आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्या आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी उपयुक्त ठरतील.

१. आपली बलस्थाने ओळखा:

प्रत्येकजण आपली क्षमता ओळखून असतो. या जगत कोणीच तसा कमकुवत नसतो. प्रत्येकाकडे काही ना काही वेगळेपण असते. ज्याला आपण आपले बलस्थान म्हणतो.

 

iasbaba.com

ते वेगळेपण कोणते हे शोधून त्यावर लक्ष केन्द्रित करा. काय येत नाही याचा विचार करण्यापेक्षा आणि दुसर्‍या कुठल्या व्यक्तीशी तुलना करण्यापेक्षा आपल्याला काय येत यावर काम केले तर आत्मविश्वास नक्की वाढेल. 

२. चांगल्या आणि प्रोत्साहन देणार्‍या लोकांच्या संपर्कात रहा:

रामायणातील हनुमानाने लंकेत जाण्याचा प्रसंग तर तुम्हाला माहितीच आहे. जर जाम्बुवंत यांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली नसती तर हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव झाली असती का? असे आपल्या अवतीभवतीचे जाम्बुवंत शोधून काढा. जे आपल्या क्षमतेवर विश्वास दाखवू शकतील.

 

 

सतत अशा व्यक्तींच्या संपर्कात रहा. जेव्हा सगळे जग ‘तुम्हाला जमणार नाही’ असे म्हणेल तेव्हा हे जाम्बुवंत तुमच्या पाठीशी ठाम उभे राहतील आणि तुमच्यातील शक्तीचा परिचय करून देतील. जो तुमचा आत्मविश्वास वाढवायला मदत करेल.

३. अनुभव घ्या:

कोणत्याही क्लासमध्ये आत्मविश्वासाचे धडे शिकवले जात नाहीत. माणूस चुकत, पडत, शिकत, ठेचकाळत पुढे जातो. जोवर तुम्ही प्रयत्न करणार नाही तोवर तुम्हाला स्वतःला आजमावून बघताच येणार नाही.

यासाठी मनाची तयार करा. परिस्थितीचा सर्वांगीण विचार करा. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झोकून द्या. हरलात तर अनुभव मिळतो आणि जिंकलात तर आत्मविश्वास.

 

 

४. सकारात्मक विचार करा:

जेव्हा आपला आत्मविश्वास कमी झालेला असतो अशा वेळी, आपल्या मनाची अवस्था फार वाईट झालेली असते त्याला एका रिचार्जची गरज असते. सकारात्मक विचार अशा रीचार्जचे काम करतात.

आपली आवडती गोष्ट करताना आपले मन बाकी सगळ्या गोष्टी विसरून जाते आणि फक्त त्याच गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित होते. अशाप्रकारे काहीवेळानंतर आपले मन पूर्णपणे रिफ्रेश होते आणि आपला आत्मविश्वास परत येतो.

 

 

आपला आत्मविश्वास जेव्हा कमी झालेला असतो तेव्हा आपल्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतात. कोणतेही लहानात लहान काम करताना सुद्धा आपल्याला वाटते की हे काम आपल्याला जमणार नाही, आपल्याला या कामात अपयश येणार आहे, त्यामुळे आपण अगदी लहान काम सुद्धा करणे टाळतो.

अशावेळी आपण प्रयत्नपूर्वक आपल्या मनात येणारे विचार बदलणे गरजेचे असते. आपले विचार जेवढे सकारात्मक असतील तेवढ्या लवकर आपला आत्मविश्वास परत येण्यास सुरुवात होईल.

५. हसत रहा, वागण्या-बोलण्यात सकारात्मकता ठेवा:

smile is a curve line which makes everything straight. त्यामुळे हसत रहा. हसणे ही संसर्गजन्य गोष्ट आहे. आपण जर एखाद्या माणसाकडे बघून स्मितहास्य केले, तर तो माणूस सुद्धा आपोआप आपल्याकडे बघून हसतो.

आपण जर तोंड पाडून शांत बसलो तर आपल्या आजूबाजूची माणसे सुद्धा तशीच होतात आणि आपल्या आजूबाजूला नकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे जाणीवपूर्वक चेहऱ्यावर हास्य टिकवून ठेवा.

 

 

यामुळे आजूबाजूला सकारात्मकता वाढू लागेल आणि याचा परिणाम आपल्या मनाच्या स्थितीवर सुद्धा होईल. यातून आपल्याला आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत होईल.

योगासने आणि व्यायामामुळे देखील स्वत:वरचा विश्वास दृढ होतो म्हणून योगासने आणि व्यायामाबरोबर शक्य असेल तर मेडीटेशन करा, ज्यामुळे तुमचे मन शांत राहील.

६. छोट्या छोट्या कामातून सुरवात करा:

जेव्हा आपण एखादी नवीन सुरवात करत असतो, तेव्हा अगदी सुरवातीलाच आपण मोठा टप्पा ओलांडण्याचा विचार करू नये. आपण असे करायला गेलो आणि त्यात जर आपल्याला अपयश आले तर आपला आत्मविश्वास अजूनच खाली जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जे काम करायचे आहे त्याचे अगदी लहान लहान भाग करून त्याचे उद्दिष्ट आपल्या समोर ठेवणे गरजेचे आहे.

 

 

आपण पहिले उद्दिष्ट पूर्ण करतो, तेव्हा हे काम आपल्याला जमते आहे असा आत्मविश्वास मनात यायला लागतो. त्यामुळे कामाच्या पुढच्या भागाला सुरवात करताना आपला आत्मविश्वास वाढलेला असतो आणि त्यामुळे आपले काम चांगल्याप्रकारे पूर्ण होते.

७. सातत्य ठेवा:

आपल्या आयुष्यात अपयश येणे किंवा इतर काही गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कधी कधी कमी होतो. पण त्याने खचून न जाता आणखी जोमाने आपले काम करत राहिल्यावर गेलेला आत्मविश्वास पुन्हा नक्की परत मिळतो. slow and steady win the race. हे कायम लक्षात ठेवा.

 

 

म्हणून जरी एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा कोणत्याही गोष्टीत अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न करत रहावे. कधी न कधी यश नक्कीच मिळते. सातत्य ठेवल्याने आत्मविश्वास देखील टिकून राहतो.

या छोट्या छोट्या टिप्स आपल्या आत्मविश्वासासाठी नक्कीच मोलाच्या ठरतील असा आम्हाला विश्वास आहे. लेख कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि वाढलेल्या आत्मविश्वासाने नव्या आव्हानांना सामोरे जा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version