आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
एका मुलाच्या ‘बसपन का प्यार’ गाण्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतले, मुलाची प्रसिद्धी काही दिवसात इतकी वाढली की छत्तीसगढचे मुख्यमंत्री त्याला जाऊन भेटले, ‘रॅपच्या बादशहाने त्याला घेऊन आपले गाणे मार्केट मध्ये आणले. एका प्रसिद्ध मोटार कंपनीने त्याला एक कार भेट दिली आहे’.
आज सोशल मीडिया म्हणजे फटक्यात प्रसिद्धीचा एक मार्ग बनला आहे. घराघरात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सोशल मीडियावर टाकून लोक प्रसिद्ध होतं आहेत. सध्या महाराष्ट्रात एकाच गाण्याची चर्चा होतेय ती म्हणजे ओ शेठ या गाण्याची, या गाण्याने अक्षरशः काही दिवसात मिलियन लाईक्स कमवले आहेत.
प्रत्येकाच्या तोंडी असलेले हे गाणं नेमकं बनलं तरी कस , गाण्यामागे असणारा आवाज कोणाचा आहे? चला तर मग जाणून घेऊयात …
उमेश गवळी आहेत तरी कोण?
उमेश गवळी यांच्या आवाजात हे दमदार गीत गायलं गेले आहे. पूर्वी गवळी आडनावाचे सामान्यतः दुधाचा व्यवसाय करणारे असायचे मात्र उमेशजींच घराणं रमलं ते गायनाच्या क्षेत्रात, त्यांचे वडीलसुद्धा पूर्वी ऑर्केस्ट्रामध्ये वाद्य वाजवत असत, त्यामुळे रक्तातच संगीत होतं, उमेशजींना शिक्षणाची फारशी आवड नसल्याने आपले करियर संगीतातच करायचे त्यांनी ठरवले.
–
हे ही वाचा – “हे गाणं माझ्याऐवजी रफीकडून गाऊन घ्या” असं किशोरदांनी म्हणण्यामागची रंजक कथा!
–
आजही कला क्षेत्राकडे एक स्टेबल करियरचा पर्याय म्हणून बघितले जात नाही. सध्या कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने संगीत नाट्य क्षेत्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उमेशजी एक किबोर्डिस्ट म्हणून ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचे, केवळ कीबोर्डच नाही तर इतर वाद्य देखील त्यांना वाजवता येतात…
गाणं कसं सुचलं?
केवळ किबोर्डिस्ट न राहता उमेशजींनी स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ काढण्याचा घाट घातला, पुण्यात त्यांनी लॉजिक स्टुडिओ नावाने स्वतःचा स्टुडिओ सुरु केला, ज्यात ते इतर संगीतकारांचे रेकॉर्डिंग करायचे. संगीत क्षेत्रात आधीपासूनच असल्याने उमेशजींच्या अनेक ओळखी होत्या. कामात सतत व्यग्र असलेल्या उमेशजींना एकदा त्यांच्या उस्मानाबादच्या मित्राचा फोन आला, त्याने फोन वरच गाण्याच्या फक्त दोन ओळी सांगितल्या..
उमेशजींना कामामुळे फारसे त्यांना या गाण्यावर लक्ष घालता आले नाही, मात्र मित्राने वारंवार त्यांच्या मागे लागून यावर गाणं तयार करायला सांगितले. उमेशजींनी लक्ष घालून ते गाणं तयार केलं. मित्राचा विश्वास होता की हे गाणं नक्कीच हिट ठरेल, मित्राची भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरली अवघ्या काही दिवसातच हे गाणं सुपरहिट ठरलं. याआधी सुद्धा उमेशजींची गाणी केली आहेत.
आज हे गाणं अनेकांच्या स्टोरीज, रिल्स मध्ये दिसून येत अगदी सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींनी हे गाणं डोक्यावर घेतले आहे. लोकांनी चक्क आपल्या फोनची रिंगटोन ठेवली आहे.
वेसावकर मंडळींनी कोळीगीतांचा पायंडा पडून दिला, आज सुद्धा अनेक कोळीगीत येतात आणि जातात मात्र वेसावकार मंडळींची कोळीगीत मात्र आजही अनेकांच्या लक्षात आहेत. पूर्वी कॅसेटचा जमाना होता मात्र आज डिजिटल जमान्यत मोबाईलवर शूट करून तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकता आणि लोकांपर्यंत पोहचू शकता.
आज माणसं अनेक प्रदेशात विखुरली आहेत मात्र संगीत ही अशी एक गोष्ट आहे जी अगदी कोकणातल्या माणसाला देखील खान्देशी गाण्यांची गोडी लावू शकते, भले कोकणी माणसाला खान्देशी भाषा समजो वा न समजो त्यातील भाव नक्कीच कळतो.
शांताबाई येऊन गेली, आमदार होऊन गेले, बारीबारीक पाणी पड सारखं पालघर परिसरातल्या बोलीभाषेतलं गाणंसुद्धा अनेकांनी व्हायरल केलं होत.
लोकगीतांचा असा ठरविक वर्ग असूच शकत नाही. लोकगीतातील शब्दच मुळात अगदी रोजच्या जगण्यातले असल्याने ते चटकन लोकांच्या लक्षात राहतात. म्हणूनच उमेशजींसारखे कलाकार आज रॅप, हिपहॉपच्या जमान्यात लोकगीतांचा प्रकार जिवंत ठेवत आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.