' एका जखमी सैनिकाच्या जिद्दीमुळेच, ‘ती’ अमरनाथ यात्रा पूर्ण होऊ शकली होती… – InMarathi

एका जखमी सैनिकाच्या जिद्दीमुळेच, ‘ती’ अमरनाथ यात्रा पूर्ण होऊ शकली होती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तुम्ही अमिताभ बच्चन, बॉबी देओल, डॅनी यांचा ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ हा चित्रपट बघितलाय का? त्यात ऐन अमरनाथ यात्रा भंग करण्याचा आतंकवाद्यांचा कट असतो आणि हे सगळे मिळून तो डाव हाणून पडतात.

त्यात बॉबी देओलला अगदी गोळी लागलेली असताना देखील तो त्या आतंकवाद्याला पळून जाऊ देत नाही. हा तर म्हणा सिनेमा होता, खऱ्या आयुष्यात असं थोडीच होतं, आत्ता नक्की असंच तुम्हाला वाटत असेल. पण अगदी अशीच एक घटना आपल्या सैनिकांसोबतही घडली आहे.

एका शूर सैनिकाने आपण जखमी अवस्थेत असूनही अमरनाथ यात्रेत येणारं विघ्न परतवून लावलं होतं.

 

Amarnath-Yatra InMarathi

 

काय आहे नेमकी गोष्ट ती जाणून घेऊया.

ग्रेटर नोएडात राहणाऱ्या, सेवानिवृत्त सुभेदार ‘गजे सिंह’ यांना सगळे नागरिक आदराने वाकून नमस्कार करतात. कारण त्यांनी कामगिरीच अशी केली आहे.

गजे सिंह हे, ग्रेटर नोएडाच्या, गुलावठी खुर्द गावात राहतात. गावातील एकूण एक व्यक्ती त्यांना ओळखते. आणि या मागचं कारणही असंच आहे. केवळ एक सेवानिवृत्त सैनिक म्हणून नव्हे तर त्यांच्या कर्तबगरीमुळे आज त्यांची इतकी प्रतिष्ठा आहे.

गजे सिंह आणि जम्मू-काश्मीर

ही गोष्ट आहे १९९३ सालची! कडाक्याची थंडी होती, आणि त्यात नेहमी प्रमाणे अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ३४ वर्षे भारतीय सेनेत आपलं योगदान देऊन देशाची सेवा करणारे गजे सिंह त्यापैकी १६ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते. जम्मू काश्मीरच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एकूण ३५ आतंकवाद्यांना ठार मारलंय.

 

jammu and kashmir inmarathi

 

त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, जम्मू काश्मीर येथे झालेलं पोस्टिंग, तिथली १६ वर्ष हे सगळे त्यांच्यासाठी अगदी अविस्मरणीय अनुभव ठरले.

तिथली शरीर गरठवून टाकणारी थंडी, आणि हे सगळे उष्ण प्रदेशातून आलेले सैनिक! त्यांना तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला बराच त्रास झाला. थंडी बरोबरच रोज एक वेगळं आव्हान होतं. अशा अनुभवात तिथले दिवस जात होते.

 

jammu kashmir inmarathi

===

हे ही वाचा – गंभीर जखमी असतांना ३ दिवस झाडावर जीवन-संघर्ष करणारी गुप्तहेर; वाचा शौर्यगाथा

===

जम्मू-काश्मीरमधील कठीण प्रसंग

३ जानेवारी १९८९ साली त्यांचं पोस्टिंग बारामुला येथे करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथल्या पहाडात काही आतंकवादी ठाण मांडून बसल्याची त्यांना आपल्या गुप्तहेर यंत्रणेकडून माहिती मिळाली. तिथलं हे ऑपरेशन १० तास चालू होतं. आणि अशातच भारतीय सेनेने १४ आतंकवादी ठार मारले. आणि त्या ऑपरेशनमध्ये यश मिळवलं.

आपल्या जवानांवर कधी, कुठून कोणतं संकट कोसळून पडेल काहीच सांगता येत नाही. पण ना डगमगता, आपल्या शरीरात बळ आणून समस्त देशवासी सुखरूप असावे यासाठी ते लढायला उभे राहतात. पदोपदी संकट पेरून ठेवलेलंच असतं.

 

indian army inmarathi
zeenews.india.com

 

गजे सिंह यांच्या तुकडीच्या बाबतीत असंच काहीसं १९९१ साली घडलं. आर्मीच्या बसमधून जेव्हा ते आणि इतर ५० सैनिक प्रवास करत होते तेव्हा, जंगलातील झाडांमध्ये लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी गोळीबार करणे सुरू केले. या चकमकीत सगळे आतंकवादी ठार मारले गेले.

अमरनाथ यात्रेत काय घडलं…

आपल्या शूरतेची, धैर्याची वेळोवेळी जाणीव करून देणाऱ्या गजे सिंह यांनी १९९३ साली झालेल्या अमरनाथ यात्रेत सुद्धा आपली कर्तबगारी दाखवली.

चकमकीत त्यांना स्वतःला गोळी लागली होती. पण इतक्या जखमी अवस्थेत असूनही त्यांनी धीर सोडला नाही, की हिंमत ढळू दिली नाही. आपले सगळे त्राण एकवटून ते उठून उभे राहिले आणि त्यांनी आतंकवाद्यांना हरवायचेच असा पक्का निश्चय केला.

जखमी अवस्थेतही त्यांनी युद्ध सुरु ठेवलं आणि अमरनाथ सारख्या पवित्र यात्रेत विघ्न घालू पाहणाऱ्या आतंकवाद्यांना मारून पाडलं.

 

amarnath yatra inmarathi

 

त्यांच्यासोबत जे इतर सैनिक होते, त्यांनी गजे सिंहबद्दल सांगताना असं म्हटलं होतं, की त्यांचं ते रौद्र रुप बघून त्या दिवशी स्वतः भोलेनाथ पृथ्वीवर अवतरले असाच भास होत होता.

गजे सिंह सोबत, प्रत्येक सैनिक जिवाच्या आकांताने नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लढत होता. आम्ही चांगलं कार्य करत होतो म्हणून स्वतः शंकराने आमच्यात त्यावेळी प्राण फुंकले असावे असंच वाटून गेलं. भक्तांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून सैनिक झटले होते. त्यामुळेच ती अमरनाथ यात्रा यथासांग पार पडू शकली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?