कोल्ड्रिंकच्या बाटलीचा बेस पंचकोनी का असतो? वाचा या डिझाईनमागचे विज्ञान!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
कोकाकोला, पेप्सी असो वा थम्सअप, लिम्का कोणत्याही कोल्डड्रिंकची बाटली पाहिली, की दिसतो तो त्या बाटलीचा खास आकार! या आकाराची खासियत म्हणजे तळाशी डिझाईन केलेले बंप्स! तळापासून वर टोकाकडे निमुळती होत गेलेली बाटली एखाद्या महाराणीसारखी दिसते. पण काय असेल तिच्या बम्पी डिझाईन मागचे रहस्य? का केली जात असेल तिची अशी खास रचना? तुम्हाला कुतूहल वाटत असेलच ना?
पाण्याच्या किंवा सरबताच्या बाटलीचा तळ सपाट असतो, मात्र कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचा तळ मात्र वेगळ्या रचनेचा असतो. काय आहे या मागे? डिझाईन की विज्ञान? चला जाणून घेऊया या लेखातून..
उन्हाळा सुरू झाला की वेगवेगळ्या आकारांच्या, रंगाच्या आकर्षक अशा कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या आपल्याला बाजारात दिसू लागतात. पण आजकाल त्यांनी आपली जादू सार्यांवरच केली असल्याने त्या बारा महिने चोवीस तास आपल्या जीवनात दिसू लागल्या आहेत.
तुम्ही जेव्हा कोल्ड ड्रिंकची बाटली विकत घेता, तेव्हा तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, की कोल्ड ड्रिंक कोणतेही असो त्याच्या बाटलीची रचना मात्र तळाला पंचकोनी बेस असलेली असते. हो! या मागे काही खास कारण आहेच.
तुम्ही पाहिले असेल, की मिनरल वॉटर किंवा कोणत्याही पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा तळ सपाट असतो. कारण त्यात कोणतेही केमिकल मिसळलेले नसतात. तर कोल्ड ड्रिंकमध्ये केमिकल आणि कार्बोनेटेड पाणी असते.
कोल्ड ड्रिंकची बाटली जोरजोरात हलवली, तर बाटलीत तयार होणार्या गॅसमुळे बाटली फुटू देखील शकते. असे होवू नये यासाठी तिची रचना खास पद्धतीने केलेली असते. जर कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचा तळ सपाट ठेवला तर ती ज्या जागी ठेवली जाईल ( कार ,ट्रेन , टेबल, फ्रीज ) तेथे तयार होणार्या व्हायबरेशनमुळे बाटलीत गॅस तयार झाल्यामुळे ब्लास्ट होऊन बाटली फुटू शकते.
पंचकोनी रचनेमुळे बाटलीची स्ट्रेन्थ वाढते ज्यामुळे बाटलीतील कोल्ड ड्रिंक देखील सुरक्षित राहते.
कारण काय?
तुम्ही एखादा पेपर सहज फोल्ड करू शकता. तो दुमडला तरीही थोड्या प्रयत्नाने तो फोल्ड होऊ शकतो. पण जर तुम्ही त्या पेपरची गुंडाळी केलीत तर ती गुंडाळी तुम्ही सहजपणे फोल्ड करू शकत नाही. एवढंच नाही, तर सतत फोल्ड करत गेल्यावर पेपर फोल्ड करताना अधिक कठीण जात असल्याचं तुमच्या लक्षात येईल.
याच संकल्पनेचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर कोल्ड ड्रिंकची बाटली बनवण्यासाठी केला जातो. एखादा धातू वाकवल्याने त्याची जोर सहन करण्याची क्षमता आणि कडकपणा वाढतो.
जेव्हा बाटलीचा तळ पंचकोनी केला जातो, तेव्हा बाटलीचे जडत्व वाढते आणि टणकपणा देखील! त्यामुळे जरी बाटली खाली पडली किंवा प्रभावित झाली तरी तिच्यातील कोल्ड ड्रिंकमध्ये कोणतीही रिअॅक्शन होत नाही.
दुसरे कारण असे, की कोल्ड ड्रिंक हे नावासारखेच थंड प्यायले जाते. थंड असताना ते लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि त्याचे आकारमान वाढलेले असते. त्यावेळी बाटलीच्या तळातील कॉर्नर किंवा बंप थोडे एक्सपांड होतात. ज्यामुळे लिक्विडचं आकारमान वाढलं, तरी त्या वाढलेल्या आकाराची काळजी घेतली जाते.
अजून एक कारण असे आहे, की कोल्ड ड्रिंकमध्ये कार्बोनेटेड पाणी असते जे गॅस तयार करते. या गॅसचे प्रेशर सहन करण्यासाठी बाटलीचा बेस भक्कम हवा म्हणून देखील तो पंचकोनी आकारात असतो.
त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण हे ही एक कारण आहे. गुरुत्वाकर्षणाचा जोर कमी करण्यासाठी देखील कोल्ड ड्रिंक च्या बाटलीची रचना तळाकडे पंचकोनी व तोंडाकडे निमुळती होत गेलेली असते. कोल्ड ड्रिंकच्या कॅनची रचनादेखील वेगळी असते म्हणजे तळाला आतमध्ये वळलेली, त्यामागे देखील हेच कारण असते.
तर हे होते गुपित कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचा तळ पंचकोनी का असतो या मागे… लेख कसा वाटला ते कॉमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.