' पुरग्रस्तांचं वरदान, पाण्यावर चालणारी सायकल; ध्यास घेतलेल्या संशोधकाचं अपूर्व काम – InMarathi

पुरग्रस्तांचं वरदान, पाण्यावर चालणारी सायकल; ध्यास घेतलेल्या संशोधकाचं अपूर्व काम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जगभरात अत्यंत सामान्य वाटणाऱ्या अशा अनेक लोकांनी असामान्य कार्य केलं आहे. ज्यात अनेक व्यक्तींची अनेक कार्य समाजाच्या उपयोगी पडली आहेत. मोहम्मद सैदुल्लाह हे अशाच असामान्य व्यक्तींमधील नाव ज्यांचं संशोधन समाजाच्या उपयोगी पडलं.

कोण होते मोहम्मद सैदुल्लाह?

मोहम्मद मूळचे बिहारमधील मोतीहारी गावचे. शिक्षण जेमतेम १० वी पास, पण कायम काहीतरी नवीन गोष्टी तयार करायची त्यांना फार आवड होती. यातूनच त्यांनी अनेक संशोधनं केली ज्यासाठी ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.

 

mohammad saidullah inmarathi

 

१९७५ मध्ये आलेल्या बिहारच्या पुरामध्ये जाटवा – जानेरवा गाव पुराच्या पाण्याखाली दबले होते. त्यावेळेला त्यांनी स्थानिक नाविकाला आपल्याला सुरक्षित ठिकाणी सोडावे यासाठी विनंती केली. तेव्हा त्या नाविकाने पैसे दिल्याशिवाय बोटीमध्ये बसू देणार नाही असे सांगितलं. ही  गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली. यावर उपाय शोधायचा निर्णय त्यांनी घेतला.

 

flood inmarathi

 

सायकलची निर्मिती…

जिद्दीच्या जोरावर, त्यांनी पुराच्या पाण्यात चालेल अशी सायकल तयार केली. या सायकलमुळे पुराच्या वेळेला अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ म्हणतात ना ते खरं आहे.

ही सायकल तयार करण्यासाठी त्यांनी चार आयताकृती फ्लोट्स घेतले आणि ते सायकलला जोडले. सोबतच सायकलच्या मागच्या चाकाच्या स्पोकला २ फॅन ब्लेड जोडले ज्यामुळे सायकल पाणी आणि जमिनीवर दोन्हीवर चालते. त्यांनी हे ब्लेड अशा पद्धतीने लावले होते की सायकल विरुद्ध दिशेने सुद्धा चालवता येत असे. सायकल नीट चालते का याची चाचणी करण्यासाठी त्यांनी गंगेमधील पहल घाट ते महेंद्रू घाट पार केला.

 

cycle floating on water inmarathi

===

हे ही वाचा – तो खराखुरा रँचो ठरला असता, मात्र या दुर्दैवी अपघातानंतर…

===

जेव्हा मोहम्मद यांनी पहिल्यांदा ही सायकल तयार केली, तेव्हा त्यांना ६००० रुपये खर्च आला. पण आत्ता ते ३००० रुपयात अशी सायकल तयार करत आहेत. त्यांनी सायकल बनवण्यासाठी स्वतःची ४० एकर जमीन विकली आहे.

त्यांनी इतरही संशोधन केले आहे, ज्याला त्यांनी आपल्या बायकोचे नाव दिले. मोहम्मद यांचे नूरजहाँ यांच्यासोबत १९६० मध्ये लग्न झाले. त्यांना ३ मुलं आहेत. नूर सायकल, नूर वॉटर पंप, नूर मिनी वॉटर पंप आणि नूर राहत ही त्यांनी केलेल्या संशोधनाची नाव आहेत.

मोहम्मद यांनी गंगेच्या घाटातील सायकलची केलेली चाचणी पाहण्यासाठी तत्कालीन राज्यपाल ए आर किडवाई सुद्धा होते. यानंतर जानेवारी २००५ मध्ये तत्कालीन भारतीय राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याहस्ते मोहोम्मद यांना नॅशनल इनोवेशन फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्याच वर्षीचा प्रतिष्ठित वॉल स्ट्रीट जर्नल अशियन इनोव्हेशन पुरस्कारासाठी १२ अंतिम स्पर्धकांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली. यासोबत डिस्कव्हरी चॅनेलच्या ‘बियॉंड टुमारो’ या कार्यक्रमासाठीही त्यांची निवड झाली. त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

 

discovery channel inmarathi

 

एनआयएफ त्यांच्याकडून सायकल घेऊन गेले पेटंट मिळवण्यासाठी सुद्धा ३ वर्षानंतर ना त्यांना सायकल मिळाली ना पेटंट मिळाले.

सध्या ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत आहेत. कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ते रोज मध विकण्यासाठी ३० किलोमीटर सायकलचा प्रवास करतात. आणि त्याचे महिन्याअखेरी त्यांना फक्त १५०० रुपये मिळतात.

एनआयएफने त्यांच्यावर अन्याय केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेतला गेला असं ते नेहमी म्हणतात.

मोहोम्मद यांचा मुलगा शाकिलूरहमान याचं म्हणणं आहे, की आधी ते गरीब नव्हते. पण त्याच्या वडिलांनी संशोधनासाठी जागा विकली आणि आज त्यांच्या कुटुंबावर ही परिस्थिती आली.

सायकलच्या संशोधनानंतर मोहम्मद आणि त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास झाला. पण त्यानंतरही नवनवीन संशोधन करण्याचे प्रयत्न त्यांनी थांबवले नाहीत. त्यांनी चावीवर चालणारा टेबल फॅन बनवला जो २ तास चालतो, एक मिनी वॉटर पंप बनवला ज्याला इंधनाची गरज पडत नाही तसेच एक मिनी ट्रॅक्टरही बनवला जो फक्त ५ लिटर डिझेलवर २ तास चालू शकतो.

काळोख असणाऱ्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये लेथ मशीन, गंजलेले नट बोल्ट्स सापडतात. असं सगळं असलं, तरी ते म्हणतात की तीच त्यांची आवडती जागा आहे. तिथे सर्वात जास्त वेळ घालवायला त्यांना आवडते.

 

lathe machine inmarathi

 

जगात असे अनेक मोहम्मद आहेत, जे आपल्या गोष्टी तयार करण्यासाठी कायम झटतात; काहींना त्यात यश मिळते पण काहींना मिळत नाही. पण तरीही ते थांबत नाहीत आपला प्रवास चालूच ठेवतात नवनवीन वस्तूंचा शोध सुरूच ठेवतात.

लोक त्यांच्या अशा वागण्याला वेडेपणा म्हणतात पण अशा वेडेपणातूनच संशोधक निर्माण होत असतात आणि त्यांनी केलेले संशोधन समाजाच्या कायम उपयोगी पडत असतात.

 

research inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?