लॉकडाऊन मोकळा होतोय; महाराष्ट्रातली हक्काची पण ज्ञात-अज्ञात स्थळं टिपून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
सणासुदीचा श्रावण महिना, मागच्या वर्षी घरच्या घरीच सण साजरे करण्यात निघून गेला. अगदी नारळी पौर्णिमेला राखी बांधण्याच्या निमित्ताने सुद्धा भावा-बहिणींनी एकमेकांच्या घरी जाणं शक्यतो टाळल्याचं पाहायला मिळालं. ऑनलाईन रक्षणबंधनाला समुद्राहून अधिक उधाण आल्याचं दिसलं.
यंदा मात्र लॉकडाऊनचा ससेमिरा पाठीमागे नव्हता, त्यामुळे एकमेकांच्या घरी जाण्याच्या निमित्ताने सगळीच मंडळी बाहेर पडली, आणि रस्त्यांवर रहदारीचा धुमाकूळ पाहायला मिळाला. वाहतूक कोंडी होणं वाईट असलं, तरी आता लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असल्याने फिरायला जाण्याचा विचार येणं साहजिक आहे.
लॉकडाऊन मोकळा होत असताना फिरायला जाण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारत आहेत. फार दूर जाण्याची इच्छा नसेल, तर महाराष्ट्रातीलच तुमच्या आजूबाजूचे पर्याय तुम्ही नक्कीच पडताळून पहा.
चला आज जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अशाच काही हेरिटेज साईट्सबद्दल जिथे भेट देऊन यायलाच हवं. युनेस्कोने या ठिकाणांना जागतिक हेरिटेजचा दर्जा दिला आहे. मग तर भेट देणं मस्टच, नाही का!
१. एलिफंटा केव्ह्ज
मुंबईच्या पूर्वेला, अवघ्या १० किमी अंतरावर या गुहा आहेत. एकूण ७ गुहांचा हा समूह एका बेटावर स्थित आहे. या गुहांमध्ये भगवान शिव, म्हणजेच शंकराचं महात्म्य दर्शवणाऱ्या आहेत.
या गुहांमध्ये पाहायला मिळणारी कलाकुसर ही इथली खासियत आहे. इथे आल्यावर सौंदर्यपूर्ण शिल्पकला पाहिल्याचं समाधान नक्कीच मिळतं. अनेक संग्रहालयामध्ये एलिफंटामधील कलाकृती पाहायला मिळतात. काही ठिकाणी त्यांची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष गुहांना भेट देऊन हे सौंदर्य अनुभवण्याची मजा काही निराळीच आहे.
२. एलोरा केव्ह्ज
ज्याच्या नावावरून बऱ्याचदा वाद सुरु असतो, अशा औरंबागाबाद शहराचं ऐतिहासिक महत्त्व कधी ना कधी कानावर पडलं असेलच! याच औरंगाबाद शहरात एक ऐतिहासिक आणि जागतिक कीर्तीची वास्तू आहे, जिथे भेट द्यायलाच हवी.
१७ हिंदू गुहा, १२ बौद्ध गुहा आणि ५ जैन गुंफा अशा एकूण ३४ विविध गुहांचा समावेश असणाऱ्या एलोरा गुंफा म्हणजे महाराष्ट्राची शानच म्हणायला हवी.
संपूर्णपणे दगडांमध्ये केलेलं हे कोरीवकाम पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. जगप्रसिद्ध अशा या ठिकाणाला निदान एकदा तरी भेट द्यायला हवीच, नाही का!
३. अजंठा केव्ह्ज
भारताच्या प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणजे अजंठा लेणी! एलिफंटा आणि एलोरा गुहा बघायला हव्यात, तशा अजंठा गुहासुद्धा अवश्य पाहाव्यात. अजंठा लेणी आणि त्यांचं सौंदर्य पाहणं म्हणजे स्वर्गानुभूती असल्याचं अनेकांचं म्हणणं असतं.
एकूण २९ गुहा इथे आहेत. या गुहा वेगवेगळ्या कालखंडात कोरल्या गेल्या असल्याने, वेगवेगळ्या कालखंडातील शिल्पकलेचे नमुने इथे पाहायला मिळतात.
४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
तुम्ही मुंबईत राहणारे असाल, तर हे नाव वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. जिथे रोजच कामाला जातो, अशा ठिकाणाला ‘फिरायला जाण्याचं’ ठिकाण कसं काय म्हणतायत बुवा, असं वाटून गेलं असेल. पण, कधीतरी ऑफिसला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करण्याचं स्टेशन यापलीकडे दृष्टी ठेऊन बघा, म्हणजे या वर्ल्ड हेरिटेज साईटचं महत्त्व लक्षात येईल.
मुंबईबाहेरील ज्या मंडळींना ‘जीवाची मुंबई’ करायला यायचं आहे, त्यांच्या मुंबई दर्शनच्या यादीमध्ये तर, हे एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणून असायलाच हवं. १८७८ साली बांधकाम सुरु करण्यात आलेली ही वास्तू १० वर्षांत, म्हणजेच १८८८ साली पूर्ण झाली. ब्रिटिशकालीन बांधकामाचा उत्तम नमुना असणारी ही वास्तू, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात तिच्या वर्दळीसाठी सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे.
५. व्हिक्टोओरियन आणि आर्ट डेको एनसेम्बल
जिवाची मुंबई करण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय! मुंबईचा जन्मच ब्रिटिशांमुळे झाला, त्यामुळे ब्रिटिशकालीन सुंदर इमारतींची देणगी सुद्धा मुंबईला लाभली. त्यांच्यापैकीच एक म्हणजे हे एनसेम्बल होय. जागतिक दर्जा मिळाला असल्याने याच महत्त्व अधिक वाढलंय यात शंकाच नाही.
व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारती ही मुंबईची अशीच एक शान आहे. ती आजही टिकवून ठेवली आहे, हेदेखील खरं…
काय मग मंडळी, लॉकडाऊनचा त्रास काहीसा कमी झालेला असताना, या हेरिटेज साईट्सना भेट देऊन येणार ना? तुमच्या आवडत्या मंडळींना सुद्धा ही माहिती मिळावी यासाठी लेख शेअर करायलाही विसरू नका.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.