Site icon InMarathi

पर्यटनाचे तीन तेरा वाजले असताना ठाकरे सरकारने हाती घेतले आहेत हे स्तुत्य उपक्रम

cm inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

१५ ऑगस्ट १९४७ ला आपण स्वतंत्र झालो, वर्षानुवर्षे अडकलेल्या गुलागिरीतुन आपण मुक्त तर झालोच, मात्र गेल्या वर्षांपासून एक प्रकारच्या बंधनात आपण अडकलेले आहोत, जे काही काळापुरते कमी होते तर काही काळ जास्त असते.

२०१९ साली महाराष्ट्रातले राजकारण पूर्णपणे ढवळलं गेलं, काहीच दिवसांचे असलेले सरकार कोसळले आणि तीन पक्ष एकत्र येऊन एक नवे सरकार स्थापन झाले ते म्हणजे ठाकरे सरकार. उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर तर आलेच लगेचच त्यांनी हळूहळू सूत्रं हाती घ्यायला सुरवात केली आणि नेमकं कोरोना नावाचं संकट आपल्याकडे आले.

 

 

गेल्या मार्चमध्ये संपूर्ण देशाला टाळे लागले, इतके वर्ष आपण सतत धावत होतो त्याला कुठेतरी स्थगिती आली फक्त अत्यावश्यक सेवा वगळता बाकी संपूर्ण उद्योगधंदे बंद होते. आज सरकारी तिजोरी अनेक मार्गानी भरत असते त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे पर्यटन..

आज आपल्या देशात काही राज्य अशी आहेत जी जास्त करून पर्यटनावर अवलंबून आहेत, मात्र लॉकडाऊन मुळे  तिकडचे पर्यटन चांगलेच कोलमडले आहेत. आज महाराष्ट्र इतर राज्यांच्या मानाने पर्यटनात मागे आहे

ठाकरे सरकारवर होणारी सततची टीका तर दुसरीकडे याच ठाकरे सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी काही स्तुत्य उपक्रम हाती घेतले आहेत, नेमके कोणते उपक्रम आहेत चला जाणून घेऊयात…

 

 

नवरा माझा नवसाचा या चित्रपटामुळे चर्चेत आलेले देवस्थान म्हणजे गणपतीमुळे, जागृत गणपतीचं मंदिर असलेल्या या गणपतीपुळ्यामध्ये आज अनेक रिसॉर्ट आहेत. मंदिरालगत असलेला समुद्रकिनारा अनेकांना आकर्षित करतो. म्हणूनच ठाकरे सरकार येणाऱ्या भाविकांना वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता यावा म्हणून एक बोट क्लब सुरु करणार आहेत.

 

Ratnagiri tourism

 

तानाजी चित्रपट पाहून अनेक जणांनी सिंहगडाकडे धाव घेतली त्याच सिंहगडाच्या इथे असणाऱ्या एमटीडीसीच्या रिसॉर्टचे नूतनीकरण केले आहे तसेच एमटीडीसीची नवी वेबसाईटसुद्धा सुरु केली आहे. अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्यासोबत इतर नेत्यांनी बैठक घेऊन हे निर्णय घेण्यात आले आहेत. ते पुढे असं म्हणाले की, पर्यटनाला चालना देण्यासाठी दोन गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजे पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर काय देऊ शकतो आणि दुसरं म्हणजे ‘आम्ही खात्री देऊ इच्छितो की पर्यटकांसाठी काही नवीन पर्यटन स्थळे त्यांच्या भेटीस आणू’.

 

Hindusthantimes

 

काही ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्या थेट एमटीडीसीशी संलग्न केल्या आहेत जेणेकरून सरकारी मालमत्ताना चालना मिळेल. एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जसा राकट देश आहे कणखर आहे तसा तो नाजूक फुलांचा देश देखिल आहे. आज महाराष्ट्रातील अनेकजण खास साताऱ्यातील कास पठारावर वेगवेगळ्या प्रकराची फुलं बघण्यासाठी जातात. ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप गार्डनच्या धर्तीवर आता कास पठाराचेसुद्धा नूतनीकरण होणार आहे.

 

conde nast traveler india

 

आज राज्याच्या बरोबरीने देशाच्या पर्यटनाला देखील चालना मिळणे गरजेचे आहे. ज्या लोकांचा रोजगार फक्त पर्यटनावर अवलंबून आहे अशा लोकांना सुद्धा पुन्हा एकदा रोजगार मिळायला हवा. आज राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे तरुण असल्याने त्यांच्याकडे अनेक नव्या कल्पना आहेत,  मागेसुद्धा त्यांनी नाईट लाइफचा प्रस्ताव मांडला होता.

आज ठाकरे सरकारवर अनेक स्तरातून टीका होताना दिसून येत आहे, ठाकरे सरकाराने घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा विसंवाद, यावरून विरोधी पक्ष सरकारला चांगलाच धारेवर धरतो. मात्र त्याच सरकारचे पर्यटनाबाबतीतीलं ही पाऊले नक्कीच एक आशेची किरणे दिसत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version