Site icon InMarathi

प्रेमात पडलाय, पण नकाराची भीती वाटतेय? मग हे वाचाच!

Fear of rejection IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

भीतीची भावना ही नैसर्गिक व पुरातन आहे. सर्व प्राण्यांत कोणतेही संकट उभे राहिले की भीती वाटून, मुकाबला करण्याचे किंवा पळ काढण्याचे पर्याय असतात. परिस्थिती, सामर्थ्य, बलाबल पाहून जो तो पर्याय निवडला जातो.

त्यातही नकाराची भीती वाटणं ही खूपच अनाकलनीय अशी गोष्ट आहे. म्हणजे ती नेमकी का वाटते याबद्दल विविध मते आहेत. पण आपल्या सगळ्यांनाच ती असते.

आपला नोकरीच्या ठिकाणी झालेल्या मुलाखतीचा निकाल असो नाहीतर एखाद्या मुलीला प्रपोझ केल्यावर तिने उत्तर देईपर्यंतचा वेळ असो, आपल्या मनात नकाराची भीती दाटून असते.

 

कितीतरी वेळेस ही भीती तुमच्या मनात असलेल्या असुरक्षिततेतून जन्माला येते आणि ही असुरक्षितता तुमचा प्रत्येक गोष्टीत सावलीसारखा पाठलाग करते. कधीकधी खूप वेळा नकार पचवायला लागल्याने सुद्धा आपल्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होते.

यामुळे आपला आत्मविश्वास ढासळतो. आपण लोकांच्यात असताना तर बुजलेले असतोच शिवाय आपल्या स्वतःला सुद्धा आपण आवडेनासे होतो.

पण खरं सांगायचं तर, आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतोच असं नाही ना? आयुष्य वाटतं तितकं सरळ, सहज-सोपं नसतं आणि हे लवकरात लवकर समजून घेणं महत्त्वाचं असतं.

नकाराची भीती ही कित्येकदा तुम्ही लहान असताना जन्माला येते. ही भीती आपल्याकडे लक्ष दिलं न जाण्याची, डावललं जाण्याची असू शकते किंवा आणि काही. तुम्ही जसजसे मोठे होत जाता, तसतसं तुमचं छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलं जाणारं कौतुक कमी होत जातं.

स्वतःबद्दल चांगलं मत बनविण्यात आपण कमी पडतो. तर कधी genuinely सुद्धा काही कारणांनी नकार पचवायला लागू शकतात.

 

 

नोकरी किंवा इतर कशातले नकार पचवण्यापेक्षा मुलांना कठीण जातं ते एखाद्या मुलीचा नातं पुढे नेण्यासाठी असलेला नकार पचवणं. आपण त्या गोष्टी फारच लावून घेतो मनाला आणि स्वतःतल्या उणीवा शोधायला लागतो. यातूनच स्वतःला कमी लेखायला लागतो. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर काय कराल?

नकाराच्या भीतीतून स्वतःला बाहेर काढण्यासाठी हे करा:

 

 

स्वतःबद्दलची चुकीची गृहीतके मानून पुढे जाऊ नका :

मला माझं भविष्य माहीत आहे, मी असाच वाईट आहे, मला कोणीच स्वीकारणार नाही अशा चुकीच्या समजुतीत राहिल्याने तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करता की लोकं तुम्हाला नाकारतीलच. तुमच्याही नकळत तुम्ही असे सिग्नल्स देता की लोकं तुमच्यापासून दूर जातील आणि मग लोकं आपसूकच दूर जातात.

 

twiniversity.com

असं वारंवार झालं की मग तुम्ही तोच पुरावा म्हणून वापरता आणि म्हणता की मी म्हटलं नव्हतं लोकं मला नाकारतील? मला माहित होतं हेच होणार आहे. अशी स्वतःची स्वतःबद्दलची नकारात्मक गृहीतके मनातून काढून टाका. लोकं तुम्हाला कसं वागल्यावर स्वीकारतील याचा विचार करा. वाटल्यास त्याचे मुद्दे लिहून काढा.

नकाराची भीती तुमच्या मनातून काढून टाका:

तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का की तुमच्यात नकाराची भीती कुठून आली? ही भीती तुम्हाला नाकारण्याचा कोणाला तरी हक्क आहे या विचारातून येते आणि त्यांनी तुम्हाला नाकारलं तर तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटतं.

खरं सांगायचं तर, तुम्हाला नाकारण्याचा हक्क तुम्हाला स्वतःला सोडून इतर कोणालाच नाही.

काही मुलांना एखाद्या मुलीने नकार दिला तरी ती एकदम कूल असतात. का माहित्ये? कारण ते नकाराची संकल्पनाच मानत नाहीत. त्यांचा इतर संधींवर विश्वास असतो. एका मुलीने नकार दिल्याने आपलं आयुष्य संपलं नाही यावर त्यांचा विश्वास असतो. त्यांच्यासाठी नकार हा नकार नसतोच. संधी असते. तुम्हीही नकारकडे याच दृष्टीने पाहायला शिकायला हवं. कारण हाच दृष्टिकोण योग्य आहे.

 

Couple Enjoying Evening Drinks In Bar

नकार समर्थपणे हाताळायला शिका:

एखाद्या व्यक्तीने आपल्याला नाकारलं की आपल्याला यापुढे कायम सगळ्यांकडून नकार मिळणार असं आपण गृहीत धरतो. हे एक कधीही न संपणारं दुष्टचक्र आहे.

जेव्हा तुम्ही अशी गृहीतके मनात मांडायला लागता तेव्हा स्वतःला प्रश्न विचारायला शिका, की तुमचं हे वागणं कोणाला आवडेल का? तुम्ही त्यांच्या जागी असतात तर तुम्ही कसे रिऍक्ट झाला असतात? चांगल्या वाईट सर्व शक्यतांचा विचार करा आणि मनाला बजावा की तुम्ही कोणतीही परिस्थिती हाताळायला सक्षम आहात.

काही वेळेस केवळ तुमच्या स्वतःच्या मतावर अवलंबून राहू नका:

सतत नकार मिळण्याच्या भीतीमुळे तुम्ही स्वतःबद्दल पूर्वग्रहदूषित विचार करायला लागलेला असता. तुम्ही कसे दिसता, जग तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतं, तुम्ही किती वाईट आहात… वगैरे. यातले बहुतेक सर्व अंदाज नकारात्मक भावनेतून जन्माला आलेले असतात आणि हे सर्व विचार जग तुमच्याबद्दल नव्हे तर तुम्ही स्वतःबद्दल करत असता.

 

istockphoto.com

अशावेळी तुमच्या अशा विचारांना तुमच्या मनाचा ताबा घेऊ देऊ नका. अशावेळी मी इतरांपेक्षा कसा चांगला आहे हा विचार करा.

तुमच्या गुणांना तुमची ताकद बनवा. स्वतःला नकारात्मक विचारांच्या खाईत जाण्यापासून तुम्हीच वाचवू शकता. यातूनच तुम्हाला तुमचा आत्मविश्वास परत मिळेल आणि तुमचे स्वतःबद्दलचे मत सुधारायला मदत होईल.

नकारानंतर आयुष्य संपत नाही हे लक्षात ठेवा:

यासाठी तुम्ही नकारकडे वेगळ्या दृष्टीने पहायला शिकायला हवं. एखादा नकार म्हणजे सगळं संपल्याचं लक्षण नसतं. त्यानंतरही आयुष्य असतं. नातं संपलं तरी तुम्ही उरता. जेव्हा तुम्हाला ‘एखाद्या व्यक्तीने नकार दिला तर ?’ असा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही तो नकार पचवून कसे पुन्हा उभे रहाल आणि पुन्हा कसे आनंदी होऊ शकाल याचा विचार करा.

 

 

आत्मविश्वास कमवा:

नाकारले जाण्याची भीती ही आत्मविश्वासाच्या अभावातून जन्म घेते. म्हणून आत्मविश्वासाची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. तुम्ही आयुष्यात जे काही करत असाल त्याचा पाया हा तुमचा आत्मविश्वास असणार आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे स्वतः पोहोचला असल्याची कल्पना करा.

भरपूर माणसांशी बोला. जे मनात येईल ते बोला. तुमची विनोदबुद्धी जागी करा. मधेच सुचलेला एखादा खुसखुशीत विनोद तुम्हाला भीतीमधून बाहेर पडायला मदत करेल.

 

forbes.com

कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करा:

काही वेळेस डोळे मिटून बसणे आणि एखाद्या आनंददायी घटनेची कल्पना करणे यानेे देखील मनातील स्वतःबद्दल असलेले नकारात्मक विचार आणि नकाराची भीती कमी करण्यास मदत होते. स्वतःच्या मनात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे तुम्हाला अधिक सकारात्मक कृती करायला मदत करते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो.

उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज करायचा विचार करत आहात तर ती नाही म्हणाली तर हा विचार करण्याऐवजी ती हो म्हणेल असा विचार करून पहा. तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून तिला विचाराल आणि कदाचित ती अगदी सहजच तुम्हाला होकार देईल, तुम्ही केलेली कल्पना सत्यात उतरेल.

स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे स्वतःवर प्रेम करतात. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका:

जरी एखाद्या मुलीचं तुमच्यावर प्रेम नसेल तरी तुम्ही तिला मित्र म्हणून आवडू शकता. त्यांना तुमची सोबत आवडू शकते आणि जर तुम्ही तुमचं नातं कसं workout होत नाहीये हेच रडगाणं गात बसलात तर तुमची मैत्रीही संपण्याची शक्यता असते.

स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे स्वतःवर प्रेम करतात. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने स्वतःला बदलायला हवं. यातून तुमची नकार मिळाला तर तो पचविण्याची ताकद वाढेल आणि अशा attitude मुळे तुम्हाला कोणाशीच बोलण्याची भीती वाटणार नाही.

 

 

काही वेळेस स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या भावना दाबून ठेवतात. त्यांना व्यक्त होता येत नाही. त्यांनी काही बंधनं स्वतःला घालून घेतलेली असतात. म्हणून त्या तुम्हाला नकार देतात. हे ही समजून घ्यायला शिका.

जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला नकार देते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की ती तुम्हाला संपूर्ण व्यक्ती म्हणून नाकारते. तर याचा अर्थ असा असतो की त्यांना जशी व्यक्ती जोडीदार म्हणून हवी आहे तसे तुम्ही नाही. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवा की नकाराची भीती जर तुम्ही नकारात्मक भावनांना थारा दिलात तरच तुम्हाला ग्रासू शकते. हे लक्षात घेऊन वागलात तर कोणताच नकार तुम्हाला पचवणं जड जाणार नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर –

Rejection doesn’t have to carry that much weight – not if you don’t let it.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version