तो खराखुरा रँचो ठरला असता, मात्र या दुर्दैवी अपघातानंतर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखाद्या गोष्टीला जाणून घेण्याची जिज्ञासु वृत्ती प्रत्येकात असली पाहिजे. एखादी गोष्ट घडते तर ती का घडते आणि कशी घडते हे प्रश्न सगळ्यांनाच पडले पाहिजेत, कारण प्रश्न पडले तरच त्यांचं उत्तर शोधण्याची आपण धडपड करू, आणि ते उत्तर शोधणं म्हणजे आपल्या आयुष्याचं ध्येय बनेल.
समुद्रात हरवलेल्या जहाजाप्रमाणे नाही, तर दिशा ठरवलेल्या जहाजाप्रमाणे आपण वाटचाल करणं सुरु करू. पण ही जिज्ञासू वृत्ती सुद्धा एका मर्यादेपर्यंतच चांगली असते. ती मर्यादेत असली की कोडी सुटत जातात, पण ती जास्त वाढली की अजून गुंता होत जातो.
या वृत्तीच्या उदाहरणांमध्ये अमेरिका, रशिया अशा पुढारलेल्या देशातल्या मुलांची उदाहरणं फार दिली जातात. तिथली मुलं कसा आपला वेळ वाया न घालवता विज्ञानाची पुस्तकं वाचतात आणि नवनवीन यंत्र घरीच बनवून पाहतात, कसा ते आपला संपूर्ण वेळ जोड-तोड करून वेगवेगळे प्रयोग करण्यात घालवतात असं सतत आपल्याला सांगण्यात येतं.
भारतीयही यात काही मागे नाहीत बरं का? सोनम वाङ्चुक, म्हणजे रँचो हा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहेच. पण आता याच स्वदेशी संशोधकांच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलंय. आपला दुसरा रँचो, म्हणजे यवतमाळचा शेख इस्माईल. इस्माईलचा रँचो कसा झाला ती गोष्ट पाहूया.
यवतमाळ जिल्ह्यातील, महागाव तालुक्यात फुलसावंगी म्हणून गाव आहे. २४ वर्षांचा शेख इस्माईल हा त्याच गावाचा रहिवासी होता. आता इथे “होता” का वापरलय ते आपल्याला पुढे कळेलंच.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
इस्माईल हा अगदी लहान पणापासूनच अत्यंत चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्तीचा होता. त्याचं शिक्षण जरी खूप नसलं तरी त्याला लहानपणापासून यंत्रांबद्दल जाणून घेण्यात फार रस होता. लहानपणापासूनच, मशीनचा पार्ट काढून बघ, तो पार्ट जोडून बघ अशी कामं तो आवडीने करायचा. एकदा तरी विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसून उंच आकाशात उडायचं त्याचं स्वप्न होतं.
आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु होती. इस्माईलच्या मोठ्या भावाचं वेल्डिंगच दुकान असल्याने, तिथे स्टील लोह-लोखंड, गाड्यांचे तुटके पार्ट्स, पाईप हे सगळं त्याला सहज उपलब्ध व्हायचं.
भावाच्या दुकानातील बिनकामी असलेल्या पार्ट्सना जोडून, त्यात अनेक बदल करून त्यानं एक हेलिकॉप्टर बनवलं. हे हेलिकॉप्टर मुख्यतः स्टीलच्या पाईप्स पासून बनवण्यात आलं होतं. त्या मॉडेलमध्ये एक मारुती ८०० च इंजिन बसवण्यात आलं होतं. इस्माईलने हे हेलिकॉप्टर बनवण्यात रात्र दिवस एक करून टाकले होते. स्वतःला पूर्णपणे हेलिकॉप्टर बनवण्याच्या कामात झोकून दिलं होतं.
त्याच्या मेहनतीला यश आलं आणि हेलिकॉप्टरची निर्मिती पूर्ण झाली. हेलिकॉप्टर उडवण्याचा दिवस सुद्धा ठरवण्यात आला. १५ ऑगस्टच्या शुभदिवशी इस्माईल आपलं हेलिकॉप्टर उडवणार होता. पण त्यापूर्वी एक परीक्षण चाचणी घेऊन बघावी असं ठरलं. जेणेकरून, त्यात काही सुधारणा करायच्या असतील, काही पार्ट्स काम करत नसतील काही खराबी असेल, तर ती लगेच दुरुस्त करता यावी हा इस्माईलच्या हेतू होता.
त्यासाठी, १० ऑगस्टला गावाच्याच मोठ्या ग्राउंडवर चाचणी करण्याचं ठरलं. इस्माईलबरोबर त्याचे काही मित्र आणि गावातील अनेक लोक तिथे हेलिकॉप्टरच्या परीक्षणासाठी जमले होते.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक कौतुक, आनंद आणि उत्सुकता होती. गावाच्या पोराने स्वकष्टाने आणि कोणतीही डिग्री नसताना हेलिकॉप्टर बनवलं होतं, याचा त्यांना अभिमान सुद्धा वाटत होता.
ठरलेल्या वेळी, मैदानावर सगळे जमले आणि चाचणी सुरु झाली. इस्माईल हेलिकॉप्टरमध्ये बसला. त्याने इंजिन सुरु केलं. जेव्हा हेलिकॉप्टरचे भाते फिरू लागले तेव्हा त्याला त्यात काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. आणि इस्माईलने काहीही हालचाल करण्याआधी एक भाता तुटून इस्माईलच्या डोक्यावरच कोसळला आणि त्याला भयंकर इजा झाली.
–
- भारतीय लष्कराचं इतकं सुरक्षित हेलिकॉप्टर नेमकं कोसळलं तरी कसं?
- आधुनिक यंत्रणा असूनही Mi-17V5 हेलिकॉप्टरचे याआधी सुद्धा झाले होते हे अपघात
–
तिथे जमलेल्या त्याच्या मित्रांनी वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन, इस्माईलला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण काहीच उपयोग झाला नाही. उपाचारादरम्यान इस्माईलचे प्राण गेले आणि आपण एका उभरत्या संशोधकाला मुकला.
अनेकदा असंच होतं आपण आपल्या चिकित्सक स्वभावामुळे अनेक नको त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला जातो, आणि एक तर आपण आणखी गोंधळात अडकत जातो किंवा घाई होऊन वाटेत आपल्या कडून काही चुका होतात ज्यामुळे आपण आपलंच नुकसान करून बसतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.