Site icon InMarathi

ध्वजाच्या रक्षणासाठी जेव्हा २५ RSS स्वयंसेवक थेट खलिस्तान्यांना भिडले…

moga inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकताच स्वातंत्र्य दिन आपण दरवर्षी प्रमाणे उत्साहाने साजरा केला. यावेळी स्वातंत्र्य दिन रविवारी आल्याने काहीशी नाराजी लोकांमध्ये होती कारण १५ ऑगस्ट म्हणजे हक्कची सुट्टी, त्यातही ती जर रविवारी आली तर मग हिरमोड होणारच.

१५  ऑगस्टला अगदी कोणालाही विचारलं की, काय केलेस तर येणार हमखास उत्तर म्हणजे बॉर्डर बघितला किंवा तत्सम देशभक्तीपर चित्रपट बघितलं, आज ओटीटीवर हवा तो सिनेमा आपण बघू शकतो. कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवान विक्रम बात्रा यांच्या जीवनावर  आधारित चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे..

 

 

देशाच्या रक्षणासाठी खरं तर लाखो वीरांनी आपला जीव गमावला आहे, अनेकांनी गोळ्या झेलल्या आहेत. दुष्मनाने आपल्या हद्दीत येऊन त्यांचा झेंडा रोवला असताना पुन्हा तिथे तिरंगा फडकवणरे आपले शूरवीर जवान आहेतच, तसेच आपला ध्वज अखंड फडकवत रहावा यासाठी आरएसएस च्या स्वयंसेवकांनी चक्क खलिस्तान्यांना सामोरे गेले होते…

नेमकं काय घडलं होतं?

पंजाब तसा आधीपासूनच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायमच चर्चेत असलेला प्रदेश, चारी बाजूला हिरवंगार शेती, हिमालयातून वाहत येणाऱ्या ५ नद्या असा सुजलाम सुफलाम प्रदेशात  मात्र काही वर्षांपूर्वी खलिस्तानी लोकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

याच पंजाबमधील मोगा जिल्ह्यात एका पार्कमध्ये हा रक्तरंजित प्रकार घडला होता. तो दिवस होता २५ जुन १९८९ रोजच्या सकाळप्रमाणे त्या पार्कमध्ये अनेक नागरिक सकाळी चालण्यासाठी आले होते तर त्याच पार्कच्या एका बाजूला आरएसएसचे स्वयंसेवक आपली शाखा भरवत होते.

 

opindia

 

सकाळी ६ला शाखा सुरु झाली आणि ६.२५च्या दरम्यान अचानक गोळीबार केल्याचा आवाज येऊ लागला. आणि अचानक आलेल्या आवाजामुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. खलिस्तान्यांनी अंदाधुंद गोळीबार चालू ठेवला ज्यात नागरिक आणि आरएसएसचे स्वयंसेवक गंभीरित्या जखमी झाले.

ध्व्ज उतरवण्यास नकार दिला होता 

ज्या पार्कात हा प्रकार घडला ते आज शाहिद स्मारक म्हणून ओळखले जात आहे. त्याच शाहिद स्मारकाचे पदाधिकारी डॉ. राजेश पुरी यांनी अशी माहिती दिली की, जेव्हा खलिस्तानी गोळीबार करत होते तेव्हा त्यांनी या स्वयंसेवकांना धमकी दिली की तुमचा ध्वज खाली उतरवा, मात्र स्वयंसेवकांनी त्यास साफ नकार दिला. मुळात ध्वजाला ते गुरु मानत असल्याने त्याचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य असते. स्वयंसेवकांनी त्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरूच ठेवला.

 

opindia

 

पंजाबमध्ये असलेलल्या हिंदू शीख एकतेला तडा गेल्याचे चित्र दिसत असतानाच, दुसऱ्या दिवशी त्याच पार्कमध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांनी आपली शाखा भरवून हिंदू शीख हे एकच आहेत हे दाखवून दिले.

खलिस्तानी चळवळ 

भारताला स्वातंत्र्य मिळाले या आनंदात अनेकजण होते, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भारतातील अशी अनेक संस्थाने होती ज्यांना स्वतंत्र भारतात यायची इच्छा नव्हती. भारत पाकिस्तान फाळणीमध्ये अनेक शीख बांधवांचा बळी गेला होता, त्यामुळे काही माथेफिरू लोकांनी एकत्र येऊन स्वतंत्र पंजाब थाटायचा अशी मागणी केली, यातूनच जन्मला आली खलिस्तानी चळवळ जी नव्वदच्या दशकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर आक्रमक होती.

 

zee news

 

आज तालिबान्यांनी अफगाणिस्तान देशाला काबीज केलं आहे त्यावरून संपूर्ण जगाला त्याचा फटका पडणार आहे, आज प्रगत देशांना सुद्धा दहशतवादाने पोखरले आहे त्यामुळे एकूणच जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

===

यांच तालिबानी लोकांची तुलना अप्रत्यक्षपणे आरएसएसच्या लोकांशी काहीजण करत आहेत. कारण दोन्ही गट हे धार्मिक कट्टरतेवर चालणारे आहेत. आज आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार असल्याने ते आपापली मत मांडत असतात.

 

ummid.com

 

आरएसएसचे स्वयंसेवक अशा कोणत्याच भानगडीत न पडता आपले काम चालू ठेवतात, नैसर्गिक आपत्ती येवो, साथीचे आजार येवो, देशासाठी आणि देशातील लोकांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढे असतात. देशाबद्दलचे प्रचंड प्रेम, प्रखर देशभक्ती या विचाराने ते आपल्या कार्यातून देशसेवा करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version