Site icon InMarathi

महाभारतातील ‘या’ घटनेमुळे आज घराघरात राखी बांधली जाते!!

krishna 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा सण मोठ्या जल्लोशात साजरा होतो. भारतीय संस्कृतीची ओळख असणारा हा सण नेमका कधी चालू झाला असवा याबाबत अनेक मतं असली तरीही इतिहासात, पुराणात या अनोख्या बंधनाच्या अनेक रोचक कथा आहेत

एव्हाना अनेक इमोशनल जाहिरातीचा मारा चालू झाला आहे आणि भावाबहिणीच्या खास सणाची, रक्षाबंधनाची चाहूल लागली आहे. भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच वडिल, भाऊ, नवरा आणि मुलगा यांच्या आधारानं राहिलेली, त्यांच्यावर अवलंबून असणारी आहे.

 

indiatoday.com

 

अनेक सणवार याच्या आजूबाजूलाच घुटळणारे दिसतात. रक्षाबंधन हा सणही असाच एक सण. बहिण आपलं कायम रक्षण करण्याचं वचन भावाच्या मनगटावर एक धागा बांधून मागते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्यास बांधील असतो.

आता अर्थातच आधुनिक जगात विचार बदलले आहेत. स्त्रीला कोणत्याही पुरूषी सुरक्षकवचाची गरज उरली नाही. किंबहुना ती स्वत:च आणि आपल्यासोबतच्या पुरुषाचं रक्षण करायलाही समर्थ आहे. परिस्थिती बदलली असली तरिही या नात्यातले भावबंध तसेच हळवे आहेत आणि म्हणूनच आजही या सणाकडे भाऊ बहिणीच्या नात्याचा सोहळा म्हणून बघिलतं जातं. या निमित्तानं अशाच काही कथा ज्या पिढ्यानुपिढ्या सांगितल्या जात आहेत-

द्रौपदीचं भरजरी वस्त्र –

भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी ही भाऊबहिणींची जोडी पुराणात लोकप्रिय आहे. यांच्या नात्याच्या अनेक कथा सांगितल्या जातो त्यापैकी एक कथा म्हणजे, एकदा श्रीकृष्णाच्या हाताला एकदा दुखापत झाली आणि रक्तस्त्राव होऊ लागला. हे पाहून द्रौपदिनं आपल्या भरजरी रेशमी वस्त्राचा कोना फ़ाडून त्याची चिंधी कृष्णाच्या बोटाला बांधली.

 

naiduniya

 

द्रौपदिचं हे बंधू प्रेम, ही कळवळ पाहून श्रीकृष्ण संतुष्ट झाले आणि त्यांनी वेळप्रसंगी तिचं रक्षण करण्याचं वचन दिलं. पुधे भरसभेत जेंव्हा कौरवांनी रजस्वला द्रौपदिचं वस्त्रहरण करण्यासाठी दरबारात उभं केलं तेंव्हा लज्जीत द्रौपदिला वस्त्रांचा पुरवठा करून कृष्णानं तिचं रक्शण केलं.

इंद्रवेद-

आसुरराजा बालीनं देवांवर आक्रमण केलं आणि या युध्दात देवांचा राजा इंद्र घायाळ झाला. पतीची ही अवस्था बघून इंद्राची पत्नी सची बेचैन झाली आणि ती विष्णूदेवांकडे गेली. भगवान विष्णूंनी तिला एक धागा दिला आणि सांगितलं की, हा धागा बांधून इंद्राला युध्दभूमीवर जायला सांग. त्यानंतर इंद्रानं बालीवर विजय प्राप्त केला.

 

patrika.com

 

लक्ष्मी आणि बाली –

आसुर राजा भगवान विष्णूंचा निस्सिम भक्त होता. त्याच्या भक्तीनं प्रभावित होऊन भगवान विष्णू साक्षात त्याच्या राज्याचं रक्षण करु लागले. भगवान विष्णूंनी यामुळं वैकुंठात येणं बंद केलं आणि माता लक्ष्मी चिंतीत झाल्या.

माता लक्ष्मी एका ब्राह्मण स्त्रीच्या रूपात बलीच्या महालात राहू लागल्या. त्यांनी बलीच मन जिंकलं आणि त्याच्या मनगटावर धागा बांधला. त्या बदल्यात बलीनं तुला काय हवं हे विचारल्यावर त्या लक्ष्मी रूपात आल्या आणि त्यांनी विष्णूंना वैकुठांत परत पाठविण्यास सांगितलं. बली वचनबध्द असल्यानं त्याला ही मागणी पूर्ण करावीच लागली. म्हणूनच काही ठिकाणी रक्षा बंधनला बलेव्हा असंही संबोधलं जातं.

 

dharmyatra

 

सम्राट अलेक्झांडर आणि सम्राट पुरू-

या सणाची सगळ्यात जुनी अशी ही कथा आहे. इ.पू. ३०० मधे अलेक्झांड्र जेंव्हा हिंदुस्थानावर आक्रमणाच्या तयारीत होता तेंव्हा हिंदुस्थानातल्या सम्राट पुरूचा दबदबा होता. पुरूला हरविणं सोपं नव्हतं. या दोन्ही तुल्यबळ सम्राटांमधे घनासाम चालली होती.

 

frankly speaking by kimaya kolhe

 

अलेक्झांडरच्या पत्नीला –रूक्सानाला रक्षाबंधनविषयी कळलं आणि तिनं सम्राट पुरूला गुप्तपणे एक धागा पाठविला आणि युध्दाचा निर्णय काहीही होतो पण आपल्या पतीचा जीव वाचविण्याविषयी विनंती केली. सम्राट पुरूनंही आपल्या या बहिणीच्या विनंतीचा आदर करत अलेक्झांडवर प्राणघातक हल्ला करणं टाळलं.

राणी कर्णावती आणि हुमायूं-

चितौडची राजपूत राणी कर्णावती आणि तिचा राखी बंधू हुमायूं यांच्या गोष्टीला इतिहासात फ़ार महत्व आहे. त्या काळात युध्दातल्या डावपेचाचा, युध्दात प्राणहानी होऊ नये यासाठी राखीचा वापर होत असे. शत्रू पक्षातील राणीनं राखी पाठवून भाऊ मानत मैत्रीचा हात पुढं करणं युद्ध शिष्टाचारात सामान्य होतं.

 

jagran.com

हे ही वाचा – ज्यांना बहीण असते अशी मुलं उत्तम प्रियकर होऊ शकतात? ही आहेत यामागची मानसशास्त्रीय कारणं

राणी कर्णावती विधवा होती आणि राज्याची मदार तिच्यावर होती. त्या काळात राजपूतांत आपसात खूप युध्द होत असत. गुजरातच्या सुलतान बहादूर साह यानं चित्तौडवर आक्रमण केलं.

राणी कर्णावती यात विजय मिळविण्यास असमर्थ होती. परिस्थितीचं गांभिर्य ओळखत तिनं तिचा राखी बंधू हुमायूंला साद घातली आणि राखीच्या या नात्याला जागत हुमायूंही मदतीला धावून आला. त्याच्या मदतीमुळे सुलतान बहादूरच्या सैन्याला मागे हटावं लागलं होतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version