Site icon InMarathi

१,०८,००० झाडं लावून भूतान ने साजरा केला राजकुमाराचा जन्म

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मार्च महिना सुरू झालाय. सॉल्लिड उकडंतय. अंगातून घामाच्या धारा, बाहेर रखरखतं ऊन…खूप अनइझी वाटंतय ना… या सगळ्या अवस्थेत मस्त वाळा घातलेलं पाणी, किंवा ग्लासभर लिंबु सरबत तुम्हाला कुणी दिलं तर तुम्हाला किती कूल वाटेल…अशीच ही एक भन्नाट हिरवीगार कूल स्टोरी.

भूतान या छोट्याशा देशातल्या हजारो नागरिकांनी एकत्र येऊन मागच्या महिन्यातच भूतानच्या नुकत्याच जन्मलेल्या छोट्या राजकुमाराचं स्वागत केलं. सर्वसाधारणपणे राजकुमाराचं स्वागत म्हणजे मिरवणूक, बॅंड बाजा, मिठायांची लयलूट, जेवणावळी, दागदागिने असा सगळा थाट असतो. पण भूतानच्या राजकुमाराचा हा स्वागतसोहळा मात्र ‘एव्हरग्रीन’ ठरलाय.

या आनंदसोहळ्यात नागरिक नुसते सहभागीच झाले नाहीत तर त्यांनी 108,000 (एक लाख आठ हजार) झाडं लावली.

स्त्रोत

राजा खेसर आणि राणी जेटसन यांना 5 फेब्रुवारीला बाळ झालं. या राजकुमाराचं स्वागत म्हणून, बाळाला एक महिना झाल्यानंतर एक लाख वॉलिंटियर्सनी 6 मार्चला झाडं लावली. पंतप्रधान तेर्शींग टोब्गे, त्यांचे 3 मंत्री, विरोधी पक्ष नेतेसुद्धा या अनोख्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.

बुद्धीझममध्ये झाडाला खूप महत्व आहे. झाड खूप मोठा दाता आहे. झाड दीर्घायुष्य, आरोग्य, सौंदर्य आणि दयेचं प्रतिक आहे. गौतम बुद्धांना वडाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली, हा काही निव्वळ योगायोग नाही -असं या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर टेंझीन लेकफेल यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितलं.

108,000 झाडं लावण्यामागचं कारण , 108 हा नंबर बुदिधझममध्ये पवित्र मानला जातो. म्हणूनच जपमाळसुद्धा 108 मण्यांची असते. असंही लेकफेल यांनी सांगितलं.

भूतानमधल्या सर्व 82,000 कुटुंबांनी झाडं लावली, बाकीची 26,000 झाडं वॉलिंटियर्सनी 14 वेगवेगळ्या जिल्ह्यात लावली. हे प्रत्येक झाड लावताना आपल्या राजपुत्राची वाढसुद्धा या झाडांसारखीच सुंदर, हेल्दी व्हावी, आपला राजपुत्र खूप दयाळू आणि हुशार व्हावा अशी प्रार्थना सगळ्यांनी केली.

स्त्रोत

6 मार्चला लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं लावून राजकुमाराच्या जन्माचं सेलिब्रेशन केलं, याच दिवशी भूतानच्या टूरिझम मिनिस्ट्रीने थिंफुमधल्या हॅपीनेस गार्डनचं उद्धाटन केलं. थिंफु हे भूतानच्या राजधानीचं शहर. या शहरातलं हे गार्डन 48,400 स्क्वेअर यार्डसचं आहे. परदेशी पर्यटकांना इथे हॅपीनेस ट्री म्हणजेच झाडं लावून आनंद मिळवण्यासाठी हे गार्डन बनवलंय.

भूतान हा आनंदाचा देश म्हणून ओळखला जातो. प्रत्येक देशातून आलेल्या लोकांनी या गार्डनमनध्ये झाड लावून या आनंदात आपआपल्या देशांचं रिप्रेजेंटेशन करावं ही यामागची कंसेप्ट..आणि या गार्डनच्या माध्यामातून जगभरातले लोक एकत्र येतील, संवाद करतील, आनंदाची देवाण घेवाण करतील हा यामागचा उद्देश. भूतानच्या टूरिझम कांऊन्सिलच्या रिनझिन यांनी हा सगळा या गार्डन बनवण्यामागचा उददेश स्पष्ट केला.

मागच्या जूनमध्येच 100 वॉलिंटियरसच्य़ा टीमने भूतानमध्ये डोंगराळ भागात 49, 672 झाडं फक्त एका तासात लावली होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या रेकॉर्डची नोंद झाली.

इतकी झाडं लावून आनंद वाटणाऱ्या, तो पसरवणाऱ्या या भूतान देशाकडून आपणही थोडी हिरवळ घेऊया…

खूप झाडं लावूया, ती मोठी करुया… लेट्स स्प्रेड धिस ग्रीन हॅपीनेस एव्हरीवेयर…!

: प्रियांका तुपे

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version