Site icon InMarathi

वजन कमी करून फिट रहाण्यासाठी एक नवा “कौटुंबिक” आदर्श

jesse-family 10 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

वजन कमी करणे हे त्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असत जो त्याच्या वाढत्या वजनाने त्रासलेला असतो. पण वजन कमी करणे हे वाटते तेवढे सोपे नसते. प्रत्येक वेळी आपण वजन कमी करण्याचा निश्चय करतो पण हा निश्चय काही दिवसांतच अयशस्वी होतो आणि मग आपण निराश होतो.

कितीही काही केले तरी जिभेवर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम करणे हे काही सोपे नसते. पण असं म्हणतात की, जे काम एकट्याने होत नसेल ते सर्वांनी सोबत मिळून करायला हवे, याने आपलं लक्ष नेहमी आपल्या ध्येयाकडे असते आणि जर आपण भरकटलो तर इतर आपल्याला त्या ध्येयाची आठवण करवून देतात.

 

 

असेच काहीसे फोटोग्राफर  Jesse याने देखील केले आहे.

 

 

३२ वर्षीय Jesse याने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत सामुहिकपणे वजन कमी करण्याचा निश्चय केला. ६ महिन्यांच्या कठीण परिश्रमानंतर त्यांच्या या निश्चयाचा जो निकाल समोर आला आहे तो खरच थक्क करणारा आहे.

 

 

त्यांनी वजन कमी करण्याआधी आणि वजन कमी केल्यानंतर घेतलेले फोटोज खरच आपल्यातील सर्वांना प्रेरणा आणि एक वेगळीच उर्जा देऊन जातील…

 

 

Jesse यांनी हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा त्यांची आई Jesse आणि त्यांच्या पत्नीसोबत राहायला आली. तेव्हा Jesse यांची पत्नी गर्भवती होती त्यामुळे त्यांची आई त्यांच्या पत्नीच्या देखभालीकरिता आली होती. काही दिवसांनी Jesse यांनी त्यांच्या वडिलांना देखील आपल्या सोबत राहायला येण्यास आमंत्रित केले.

 

 

यावेळी Jesse यांनी Weight Loss Program बद्दल विचार केला.

 

 

यासाठी सर्वातआधी Jesse आणि त्यांच्या वडिलांनी फास्ट चालण्यास सुरवात केली, त्यानंतर त्यांनी जॉगिंगला सुरु केली आणि त्यानंतर त्यांनी जिम जायला सुरवात केली. यासोबतच हे लोकं दर १० दिवसांनी आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांना नोट करत होते.

 

 

आधी या कुटुंबाने १० मार्च ते ३० सप्टेंबर पर्यंतचा टार्गेट ठेवला होता, पण त्यानंतर व्यायाम करणे ही त्यांची सवय झाली. यातून जो परिणाम समोर आला आहे तो खर्च आश्चर्यचकित करून सोडणारा आहे.

 

 

कदाचित यालाच आपण एकीचे बळ म्हणतो जे या कुटुंबाने करून दाखवले आहे… नाही का?

 

 

यातून आपण खरच प्रेरणा घेऊ शकतो. आपल्यातील किती असे लोकं आहेत जे दरवर्षी एक निश्चय करतात की, आता मी नियमित व्यायाम करील, वजन कमी करील पण ते कधीच होत नाही कारण आपल्यात त्या इच्छाशक्तीची कमी असते. पण तेच जर आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत केलं तर आपल्याला त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी असते आणि त्यामुळे आपण सोबत मिळून Jesse ने करून दाखवल ते करू शकतो…

स्त्रोत : BoredPanda

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version