आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
९० मधल्या पिढीने खूप वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकलं आहे. भारतीय पद्धतीचं संगीत ऐकायला मिळतच होत पण त्याकाळातील पाश्चिमात्य संगीताचा प्रभावही फार होता, आणि त्यातून अनेक भारतीय संगीतकारांनी फ्युजन प्रकार आणला.
ज्यात भारतीय संगीतासोबत वेस्टर्न संगीतदेखील असे. संगीतातील अनेक प्रयत्न चालू असताना या पिढीला खूप वेगवेगळं प्रकारचं संगीत ऐकायला मिळाल. ज्यात एक नाव प्रामुख्याने येत ते म्हणजे कुणाल गांजावाला.
या आणि पुढच्या पिढीसाठी कुणाल गांजावाला नाव ऐकल्यावर आपसूकच नॉस्टॅल्जिया फील येतो. त्याची त्याकाळातील गाणी ९० च्या पिढीने अक्षरशः डोक्यावर घेतली होती.
साथिया, मर्डर, अक्सर अशा एका पेक्षा एक चित्रपटांमधील त्याची गाणी रेडिओ, कॅसेट प्लेअरवर ऐकली जात. त्या प्रत्येक गाण्याशी अनेकांच्या आठवणी जोडल्या आहेत म्हणून आजही अनेकांकडे त्याच्या गाण्यांच्या कॅसेट्स आठवण म्हणून आहेत.
तर असा दर्जेदार गायक असणाऱ्या कुणालचा जन्म १४ एप्रिल १९७२ साली पुण्यात झाला. त्याचे वडील हार्मोनियम वाजवत असत आणि बहीण भरतनाट्यम मध्ये पारंगत होती.
कलेची आवड असणाऱ्या आणि ती जोपासली जाणाऱ्या घरात असूनही कुणालला शाळेत कलेमध्ये तितकी आवड नव्हती. त्याला गायक न बनता शिकून सी ए बनण्याची इच्छा होती.
शाळेनंतर कॉलेजमध्ये त्याने एकदा स्टेजवर गाणं गायलं आणि सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. यातून त्याचा कॉलेजमधील कार्यक्रमात गाण्याचा प्रवास सुरु झाला. ९०च्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या जाहिरातींमधून भारतीय ग्राहकांना आकर्षित करत होते.
त्या काळातील लहान मुलांच्या सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता पाहून ते लहान मुलांसाठी योग्य नाहीये आणि हे थांबवण्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ने ‘पियो दूध’ ही मोहीम सुरु केली. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिंगल्ससाठी कुणाल गांजावालाची गायक म्हणून निवड करण्यात आली.
२००२ मध्ये अब के बरस चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पहिला ब्रेक मिळाल्यानंतरही त्याला तितकी प्रसिद्धी मिळत नव्हती. पण साथियातील हमदम सोनियो रे हे त्याच गाणं खूप प्रसिद्ध झालं.
२००४ मधील मर्डर चित्रपटातील भिगे होंट तेरे गाण्यामुळे त्याला प्रसिद्धी सोबतच त्यावर्षीच्या आईफा अवॉर्ड आणि अनेक पुरस्कार मिळाले. पण ज्या गाण्याने त्याला ओळख दिली तसेच अनेक अवॉर्ड्स दिले त्याच गाण्यामुळे आपलं करिअर संपू शकत असे त्याला वाटलं होत.
तर या गाण्याचा किस्सा असा आहे की हे गाणं जेव्हा अनू मलिक यांनी गाण्यासाठी कुणाला दिलं तेव्हा गाण्याचे शब्द हे फार बोल्ड होते. त्या काळात अशी गाणी लिहिली जात नसत.
त्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं माझा आयुष्यातील शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!
गाणं रेकॉर्ड झाल्यावर तो लगेच सत्य साई बाबांकडे गेला व त्यांनी त्याला हिरव्या रंगाची अंगठी दिली आणि ती घालायला सांगितली.
ज्या गाण्यामुळे कुणाल इतका घाबरला होता त्याच गाण्याने नंतर इतिहास घडवला. सर्व वयातल्या लोकांना या गाण्याने वेड लावलं. असाच या गाण्याचा अजून एक किस्सा हा कुणाल आणि अनु मलिक यांच्याशी जोडलेला आहे.
ओ हम दम सोनियो रे गाणं ऐकून अनु मलिक यांनी कुणालला फोन करून त्याचे कौतुक केले आणि आपण लवकर काम करूया असे सांगून फोन ठेवला. कुणाल आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत होता.
ती दिवाळी त्यांच्यसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप महत्वाची होती कारण ज्या घरात ते राहत होते ते घर पाडून तिथे बिल्डिंग बांधणार होते. त्यामुळे कुणाल आणि त्याचे कुटुंबीय त्या घरात दिवाळी साजरी करण्यासाठी भेटले होते.
त्याच वेळी अनू मलिक यांचा कुणाल ला फोन आला की तू लगेच माझ्या स्टुडियोमध्ये ये. कुणाल नाही म्हणाला पण ते म्हणाले कि जास्त काम नाहीये लगेच होईल मग तू जा.
तो स्टुडिओमध्ये गेला आणि त्याने गाणं वाचलं ते त्याला तितकं पटलं नाही पण तो त्यांना नाही म्हणू शकला नाही. कुणालने ते गाणं अगदी ५ मिनिटात रेकॉर्ड केलं. जेव्हा गाणं रेकॉर्ड झालं तेव्हाच अनू यांना कळलं होतं की हे गाणं इतिहास घडवणार आणि तेच झालं.
बॉलिवूडमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचे अनेक किस्से घडतात. पण जे गाणं आपलं करिअर संपवू शकते असं वाटलं त्याच गाण्यामुळे आपलं करिअर एकदम सुसाट जाऊ शकेल हा विचार तर कुणालने अजिबात केला नसेल आणि या गाण्याच्या चाहत्यांनाही हे ऐकून एकदम नवलच वाटेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.