Site icon InMarathi

तुम्ही, तुमचे मित्र MPSC-UPSC ची परीक्षा देणार आहात? त्याआधी हे नक्की वाचा!

UPSC topper INMarathi Feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रत्येक आई वडीलांना वाटतं की त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्याव, खूप शिकून प्रगती करावी आणि त्यांच्या मेहनतीचं चीज झालेल त्यांनी त्यांच्या नजरेने बघावे, आणि मग त्यासाठी सुरू होते ती एकमेकांमध्ये चढाओढ! आणि सध्याच्या आपल्या देशातल्या शिक्षण पद्धतीवर काहीही टिप्पणी न केलेलीच बरी!

 

uceazy.com

 

पहिले दहावी बोर्ड, नंतर बारावी डिप्लोमा, त्यांनंतर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए, पीएचडी आणि ही यादी कधीही न संपणारीच आहे! त्यात सुद्धा सायन्स, कॉमर्स,आर्ट्स, बायफोकल, एंजिनियरिंग आणि काय काय विचारू नका! थोडक्यात काय या सगळ्या गोंधळात भरडला जातो तो विद्यार्थी आणि त्याचे पालक!

काही वर्षांपूर्वी असा समज असायचा की हुशार मुलं सायन्स ला जातात, पण हळू हळू तो सुद्धा दूर होत गेला, मग त्याची जागा कॉमर्सने  घेतली, नंतर ज्यांना काहीच जमत नाही ते आर्ट्स मध्ये प्रवेश घेतात असेही काही लोकांचे त्यांचे अकलेलचे तारे तोडून झाले!

 

hsc.co.in

 

मग नंतर हळू हळू लोकं मास मीडिया. एमबीए आणि एंजिनियरिंग ला शिव्या घालायला लागले आणि मग अगदीच काही नाही जमलं तर पत्रकारिता करायचे असंही सांगून झाले! एकंदरच काय तर कोर्सेस ना शिव्या घालून काही होत नाही, जोवर आपण आपल्या मानसिकतेत बदल आणत नाही तोवर ही असच चालत राहणार!

ही  परीस्थिती सध्या दुर्देवाने युपीएससी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची झाली आहे. काही ठोस करिअर जमलं नाही की या परीक्षा द्यायच्या असं एक फॅ़ड सध्या आलं आहे. (याला अपवाद आहेत).

गावाकडून पुण्यात यायचं, खोली करायची आणि या परीक्षांच्या नावावर दिवस काढून घरी आई बापांना खोटं स्वप्न दाखवणाऱ्यांचे प्रमाण वाढीला लागले आहे जे खचितच योग्य नाही. कारण अशा गोष्टी करून स्वतःची फसवणूक होतेच पण आपल्या घरच्यांची फसवणूक सुद्धा हॉट असते ही लक्षात का येत नाही?

 

justdial

 

मुळातच एमपीएससी युपीएससी म्हणजे खायचं काम नाही. ती एक तपश्चर्या आहे. त्याला नुसती अक्कल, नुसती जि्द्द, पैसा असून चालत नाही. त्यासाठी एक वृत्ती लागते. समाजात बदल घडवून आणण्यासाठी, एक भली मोठी शासनपद्धती चालवण्याची ती व्यवस्था आहे.

या व्यवस्थेत आपण कसे फिट आहोत, समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता, सर्व स्तरांतील सामाजिक घटकांसाठीची कणव लागते, त्यासाठी आपला भारत काय आहे? त्याच्या सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक बाजू काय आहेत? याची थोडीफार माहिती हवी.

लेखक विश्वास पाटील ज्यांनी आयएएस ची परीक्षा पास केली, किंवा आजचे तरुण पिढीचे मार्गदर्शक विश्वास नांगरे पाटील यांचे  स्पर्धा परीक्षांच्या वेळेच्या मेहनतीचे किस्से आणि आयपीएस घेऊन त्यांनी केलेली कामं या सगळ्यावर, या माणसांच्या कर्तुत्ववार विद्यार्थ्यांनी एकदातरी नजर टाकलीच पाहीजे!

 

medium

 

आणि या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी याच गोष्टींकडे नेमकं दुर्लक्ष करतात आणि मग पश्चाताप करत बसतात! 

काही मुलांना सहा सहा महिने अभ्यास करून मुंबईचा पोलीस आयुक्त माहिती नसतो. साधे पाच आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची नावे माहीत नसतात. पेपर तर अजिबात वाचत नाहीत.

अवांतर वाचन तर फारच दूरची गोष्ट आहे. याबाबत छेडले असता त्याची त्यांना खंत ना खेद. नुसत्या क्लासेस च्या भरमसाठ फी भरतात आणि समाजाला दाखवायला टाईमपास करतात आणि मग दोन तीन वर्ष काही हातात लागलं नाही, की मग आयोगाच्या नावाने खडे फोडतात.

ज्या मुलींना पदं मिळत नाही त्या लग्न करून मोकळ्या होतात, मुलांची मात्र फरफट होते.

 

youtube.com

 

हे सगळं आम्ही यासाठी सांगत आहोत आहे की, अनेक मुलं या वाटेवर जाऊ इच्छित असतील. त्यांनी कोणताही निर्णय घेण्याच्या आधी स्वतःला नीट ओळखा, उगाच आमच्या गावचे ४० अधिकारी झाले म्हणून वाहवत जाऊ नये!

त्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती, इच्छा, आकांक्षा, दृष्टिकोन यात खूप फरक असतो हे लक्षात घ्या. युट्यूब वरच्या लेक्चर्सने हुरळून जाऊ नका. स्पर्धा परीक्षांचं जग फार निर्दयी असतं. तिथे पद नाही मिळाले तर बाहेरच्या जगात नोकरी मिळवायला त्रास होतो.

तेव्हा विशेषतः मुलांनी जास्तीत जास्त २ attempt द्यावेत. नसेल जमत तर सोडून द्यावं  किंवा नोकरी करत अभ्यास करावा, याउलट अनेक मुलं मान मोडून जबरदस्त अभ्यास करत असतातच त्यामुळे त्यांना विशेस असं काहीच सांगायची आवश्यकता नाही!

 

 

या स्पर्धा परीक्षांकडे फक्त उत्तम पैसा मिळवण्याचे साधन,सरकारी नोकरीची शाश्वती, लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न म्हणून बघू नका, तर या परीक्षेकडे आपल्या देशाचे शासन उत्तमप्रकारे कसे चालवायला मदत होईल या दृष्टीने बघा, नक्कीच यश मिळेल! ही नुसती परीक्षा नसून राजयसेवा करायची संधी आहे जी खूप कमी लोकांना मिळते!

अभ्यासू लोकांचा एक प्रॉब्लेम असतो, दरवर्षी त्यांच्यापैकी काही मुला मुलींची नावं फायनल लिस्ट मध्ये बघून अपयशाच्या खपल्या निघतात आणि त्या वेदना कधीकधी असह्य होतात. त्या वेदना कोणाच्या वाट्याला विनाकारण येऊ नये हीच प्रामाणिक इच्छा.

तेव्हा उद्दिष्ट ठरवूनच पंख पसरा, लाल दिव्याच्या गाडीकडे बघून नाही…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version