' जगाला वेठीस धरलेल्या ‘तालिबान’च्या जन्माचा इतिहास… एक दाहक वास्तव! – InMarathi

जगाला वेठीस धरलेल्या ‘तालिबान’च्या जन्माचा इतिहास… एक दाहक वास्तव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तालिबान – जगात घडणाऱ्या अतिरेकी कारवायांचं उगमस्थान. ‘आतंकवाद’ हा जणू इथल्या मातीतच तयार होतो असं चित्र सध्या आपण सगळे बघत आहोत.

एका रात्रीतून अफगाणिस्तानसारखा देश हा तालिबानी लोकांकडून काबीज केला जातो काय? तिथल्या महिलांवर बेछूट गोळीबार होतो काय? देशात राहणारे सामान्य नागरिक विमानाला लटकून देश सोडून जातात काय? हे सगळं मन विषण्ण करणारं आहे.

 

taliban 2 inmarathi

 

जागतिक राजकारण हे या पूर्ण घटनेने हादरून गेलं आहे. मानवतावाद, कायदा आणि सुव्यवस्थासारखे शब्द सध्या अफगाणिस्तानमध्ये अक्षरशः चिरडले जात आहेत.

‘तालिबानी’ हे फक्त त्या भागात राहणारे काही लोक नसून ती एक ‘वृत्ती’ आहे हे जी मुळासकट उखडून टाकणं ही आता जगाची गरज झाली आहे.

‘तालिबान’च्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तानकडून मदत मिळते हे सर्वश्रुत आहे. पण, ही अतिरेकी वृत्ती तालिबानच्या लोकांत कुठून आली? काय राग आहे या लोकांच्या मनात? हे लोक असे हिंसक का झाले आहेत? जाणून घेऊयात.

‘तालिबान’ या शब्दाचा अर्थ ‘इस्लाम धर्मातील कट्टर विचारांचं समर्थन करणारा विद्यार्थी’ असा होतो. १५ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये घुसून देशावर आपला दावा सांगणाऱ्या तालिबानची सुरुवात ही अफगाणिस्तान च्या दक्षिणेकडील शहर ‘कंदहार’ मधून १९९० मध्ये झाली.

 

talibani people inmarathi

हे ही वाचा तालिबान्यांच्या खुनशी प्रवृत्तीला चीन घालतंय खतपाणी, थरकाप उडवणारं वास्तव!

१९७९ ते १९८९ या दहा वर्षात सोव्हिएत संघाचं ‘कम्युनिस्ट’ पक्षाचं सरकार होतं. सोव्हिएत संघाविरुद्ध लढा देण्यासाठी काही ‘मुजाहिद्दीन’ लोकांना एकत्र करण्यात आलं आणि त्यांना लढाईसाठी प्रशिक्षण देण्यात येत होतं.

हे करण्यासाठी चीन, अमेरिका, इराण, सौदी अरेबिया हे देश तालिबानी संघटनांना अर्थसहाय्य करत होते. तालिबानी लोकांना हत्यार पुरवणे आणि त्यांच्यामार्फत सोव्हिएत संघ या आपल्या शत्रूचा काटा काढणे हा अमेरिकेचा डाव होता. जो नंतर त्यांच्यावर उलटला असंही म्हणता येईल.

१९८९ मध्ये सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानमधून सैन्य काढण्याची सुरुवात झाल्यानंतर अतिरेकी कारवायांचं प्रमाण खूप वाढलं होतं.

‘मुजाहिद्दीन’ लोकांनी एकत्र येऊन तरुण मुलांच्या अतिरेकी टोळ्या तयार करणे, त्यांना मदरशामध्ये पाठवून त्यांचं ‘ब्रेन वॉश’ करणे आणि त्यांच्या मनात लोकांबद्दल कमालीचा द्वेष पसरवणे ही कामं या अतिरेकी संघटनांनी सोयीस्कररित्या सुरू केली.

‘इस्लाम धर्म’ हे एकच अंतिम सत्य आहे त्यांनी लोकांच्या मनात भिनवलं आणि धर्मासाठी जीव देण्याची सुद्धा त्यांच्या मनाची तयारी करून घेतली.

१९९६ मध्ये तालिबानी लोकांनी अफगाणिस्तानच्या राजधानी काबुल मध्ये आपला ‘इस्लामिक एमिरेट्स’चा झेंडा फडकवला होता. सध्या झालेला संघर्ष हा २७ वर्षांपूर्वी सुद्धा झाला होता.

 

taliban emirates inmarathi

 

फरक इतकाच आहे की, त्यावेळी अमेरिका तालिबानच्या पाठीशी उभा होता आणि आज अमेरिकेने आपलं सैन्य परत बोलावून घेतलं आहे.

“इस्लामिक कायदा आमलात यावा” या आपल्या मागणीसाठी त्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील लोकांचीसुद्धा मनं वळवली आणि ‘अल कायदा’या अतिरेकी संघटनेची स्थापना केली.

याच अतिरेकी संघटनेने जगाला ११ सप्टेंबर २००१ हा दिवस दाखवला ज्या दिवशी बलाढ्य अमेरिकेचं ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ हे काही क्षणात उद्धवस्त झालं. ही घटना आणि त्यानंतर लोटलेल्या २० वर्षांच्या काळात तालिबानी लोकांच्या अतिरेकी संघटनेत अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील लोकसुद्धा सामील झाले.

‘मुल्लाह मोहम्मद ओमर’ ही व्यक्ती तालिबानचा संस्थापक म्हणून कुप्रसिद्घ आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपलं सैन्य तैनात केल्यानंतर हा अचानक गायब झाला होता.

२०१३ मध्ये त्याच्या मुलाने मुल्लाह मोहम्मद ओमरचा खून झाल्याची माहिती जाहीर केली होती.

महिला विरोधी धोरण :

‘शरिया’ हा जुलमी कायदा तालिबानने पहिल्या पाच वर्षातच लोकांवर लादला गेला ज्या अंतर्गत मुलींच्या शिक्षणावर, महिलांच्या घराबाहेर एकट्याने निघण्यावर, काम करण्यावर बंदी घालण्यात आली.

 

sharia law inmarathi

 

कोणत्याही घरात महिला ही एकटी राहिली नाही पाहिजे, सतत त्यांच्यासोबत एक पुरुष सुरक्षा रक्षक असलाच पाहिजे हे ‘शरिया’ कायद्यातील प्रमुख जाचक बाबी आहेत.

याव्यतिरिक्त, कोणत्याही आरोपीला जनतेसमोर शिक्षा देणे, पाश्चिमात्य सिनेमा, पुस्तकांवर बंदी, इस्लाम धर्मात मान्यता नसलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करणे हे तालिबानी लोकांचे इतर दुष्कृत्य होते.

तालिबानी लोकांवर एक धर्मांध पट्टी लागलेली आहे ज्यामुळे लोकांनी फक्त धर्मात लिहिलेल्या गोष्टीच फक्त वाचाव्यात आणि काळानुसार कोणताही बदल मान्य करू नये अशी त्यांची विचारसरणी आहे.

अफगाणिस्तानमधील लोकांनी आणि सर्व पाश्चिमात्य देशांनी तालिबानच्या या स्वयंघोषित सरकार आणि कायद्यांचा तीव्र निषेध केला होता. पण, तालिबानने कधीच त्याची दखल घेतली नाही.

१९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानमध्ये ‘तालिबानी सरकार’ होतं. अफगाणिस्तानमधील सरकारला मान्यता ही जगातील केवळ ३ देशांनी दिली होती ज्यामध्ये पाकिस्तानचा समावेश होता.

 

talibani government inmarathi

 

‘अतिरेकी राष्ट्र’ ही स्वतःची ओळख लपवण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला पाठींबा दिला आहे जगाला तेव्हाच कळलं होतं. तालिबान निर्माण होण्यासाठी पाकिस्तान कारणीभूत आहे हे सुद्धा ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानमध्ये सापडण्याने आधीच सिद्ध झालं आहे.

‘युनायटेड नेशन्स’ने मात्र तालिबान ला एक ‘अतिरेकी लोकांची टोळी’ म्हणूनच संबोधलं आहे. चीनने तालिबानला देश म्हणून मान्यता देण्याचे संकेत दर्शवले आहेत.

तालिबान येणाऱ्या काळात इतर देशांना काही त्रास देईल का? आणि तसं झालं तर त्यांची मनमानी येणाऱ्या काळात कोणता देश रोखेल? याकडे सध्या पूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

===

हे ही वाचा काबूलमधला ‘शेवटचा हिंदू पुजारी’ जीव धोक्यात घालून तिथेच थांबलाय, कारण…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?