' ‘एकही शब्द न बोलता फेमस होता येतं का?’ बघा या पठ्ठ्याकडे … – InMarathi

‘एकही शब्द न बोलता फेमस होता येतं का?’ बघा या पठ्ठ्याकडे …

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनिल कपूर यांचा पहिला welcome सिनेमा नक्कीच पहिला असेल. त्यात एक गमतीदार डायलॉग आहे “रस्ते पर से उठाके स्टार बनाउंगा”. आता तुम्ही म्हणाल या डायलॉगचा आणि लेखाचा काय संबंध? तर संबंध आहे. हा डायलॉग अगदी खरा झालेला आपण पाहू शकतो. कसा, आणि आता कोण स्टार झालं आहे ते पाहूया.

 

welcome hindi movie inmarathi

 

सोशल मीडिया म्हणजे एकमेकांना एकमेकांशी जोडण्याचं एक अगदी लेटेस्ट साधन! जगभरातील लोकांना स्वतःशी जोडून आपण हजारो मित्र त्यावर मिळवू शकतो. आपल्या व्यथा, कहाण्या सांगून स्वतःला व्यक्त करू शकतो. लोकांची मदत करणे असो किंवा अजून कोणतंही काम आजकाल सोशल मीडियामुळे सगळंच सहज शक्य झालंय.

अलीकडे सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यातील रोल जरा बदललाय. हे प्लॅटफॉर्म आता फक्त एकमेकांशी गप्पा मारण्याचं साधन उरलेलं नसून व्यवसाय विस्तीर्ण करण्याचं लोकप्रिय साधन बनलेलं आहे.

 

social media inmarathi

 

सोशल मीडियाची वाढलेली लोकप्रियता अनेक व्यवसायांना त्यावर आपली जाहिरात करण्यासाठी, आपला प्रेझेन्स तयार करण्यासाठी भाग पाडते आहे. आणि या मागणीमुळे “इन्फ्लुएंसर्स, सोशल मीडिया मॅनेजर्स”, अशा अनेक करियरच्या संधीदेखील निर्माण झाल्या आहेत.

म्हणजेच तो वेलकम मधला डायलॉग, खरा ठरला, नाही का? आज सोशल मीडियामुळे सामान्य माणूस सुद्धा अगदी कमी पैशात मोठा जगप्रसिद्ध स्टार बनू शकतो.

सोशल मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, कोणाला किती फॉलोवर्स आहेत, कोणाचा कंटेंट लोकांना जास्त आवडतोय यामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू झाली आहे. आजकाल प्रत्येक तरुण व्यक्ती किंवा सेलिब्रिटी याबद्दलच चर्चा करताना आढळून येतात. आता यावरून फॉलोवर्सची संख्या किती महत्वाची असते हे आपल्या लक्षात आलंच असेल.

 

social-media-inmarathi

 

याच फॅन फॉलोविंगमुळे सेलिब्रिटी लोकांची लोकप्रियता किती आहे याची यादी सुद्धा बनवली जाते. आणि सध्या अमेरिकन Charli D’Amelio ही अमेरिकन स्टार या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तिचे टिकटॉकवर एकूण १२० मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

या यादीत आता एका अगदी आगळ्या वेगळ्या माणसाचा समावेश झालेला दिसतोय. तुम्हाला ५ मिनिट्स क्राफ्टच्या व्हिडियोचे विडंबन म्हणून एका निग्रो मुलाचा तो कॉमेडी विडिओ आठवतो का हो? ज्यात तो, ५ मिनिटं क्राफ्टच्या युक्त्या किती किचकट आहेत आणि आपण ते प्रत्येक काम किती सहजरित्या करू शकतो हे दाखवतो.

 

khabi lame inmarathi

===

हे ही वाचा – सोशल मीडियावरचे शॉर्ट व्हिडीओज आपल्यासमोर भयाण प्रश्नचिन्हं उभे करतायत!

===

हे दाखवताना, केवळ त्याचे हावभाव हे त्या विडिओला पूर्णपणे उचलून धरतात. फक्त एका “विचित्र स्माईल”मुळे आणि त्याच्या विषयाच्या निवडीमुळे आज हा मुलगा जगातील सगळ्यात जास्त टिकटॉक फॅन असलेल्या स्टार्सच्या यादीत जाऊन बसलाय.

या मुलाचं नाव Khabane Lame असं असून, तो टिकटॉकवर Khaby Lame या नावाने कॉमेडी व्हिडिओ बनवतो. khaby हा इटलीचा नागरिक असून त्याचं वय केवळ २१ वर्षे आहे.

तो एका फॅक्टरीमध्ये कामाला होता. आपल्या उर्वरित वेळात टिकटॉक व्हिडिओ बनवायचं काम करायचा. पण कोरोनामुळे त्याची फॅक्टरीमधील नोकरी गेली आणि तो आता पूर्णवेळ टिकटॉक व्हिडिओ बनवू लागला. khaby चे काही विडिओ इतके वायरल झाले, की काही दिवसातच टिकटॉकवर त्याचे ८५ मिलियन इतके फॉलोवर्स झाले आणि रातोरात khaby एक स्टार झाला.

८७ मिलियन फॉलोवर्सचा एक टप्पा गाठून त्याने Addison Rae या फॅन फॉलोवर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्टारला धोबी पछाड केलं.

 

khabane lame inmarathi

 

एक महिन्याआधी त्याचे ६७ मिलियन इतके फॉलोवर्स होते, पण एकाच महिन्यात ते चक्क ८७ मिलियन इतके झाले. इतक्या झपाट्याने त्याचे फॉलोवर्स वाढले. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की पहिल्या क्रमांकावर पोहचायला त्याला अजूनही थोडा वेळ लागेल. पण त्याच्यात आणि Charli D’Amelio च्या फॉलोवर्समध्ये फक्त २२ मिलियनचा फरक आहे. आणि येत्या काही दिवसात तो ते अंतर सहज पार करेल असं त्याच्या फॉलोवर्सच म्हणणं आहे.

टिकटॉकवरील किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट क्रियेटर्सना जास्त फॉलोवर्स मिळवण्यासाठी भरपूर महागड्या यंत्रांची, हाय क्वालिटी कॅमेरा, माईक, मेकप याची सगळ्यांची गरज असते असा आपला समाज असतो. कारण जे पहिल्या क्रमांकावर आहेत ते लोक हे सगळंच वापरतात.

मात्र फार पैसे खर्च करण्याची किंवा इतका सगळं गोंधळ घालण्याची काहीच गरज नाही, तर सोशल मीडिया स्टार बनण्यासाठी फक्त उत्कृष्ट दर्जाचा, वेगळा आणि भरपूर मनोरंजन करणाऱ्या कंटेन्टची गरज असते हे khaby ने आपल्याला दाखवून दिलंय.

 

khaby lame inmarathi

 

जगातील सगळ्यात जास्त फॅन फॉलोविंग असलेला khaby आता अनेक brand deals, इंडोरसमेंट्स, इत्यादी करून पैसे सुद्धा कमावेल. त्याचे पूर्ण कष्ट सार्थकी लागले असंच आपण म्हणूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?