धंदा बसायला लॉकडाऊन नव्हे, तुम्हीच कारणीभूत आहात का? वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘गेल्या वर्षभरापासून काम नाही घर चालवायला पैसे नाहीत’ अशी विदारक परिस्थिती आज अनेक घरात दिसून येत आहे. मध्यंतरी एका मुलाला नोकरीच्या मुलाखतीला जाताना टीसीने पकडले कारण त्याच्याकडे तिकीट नव्हते. तिकीट नसण्याचे कारण म्हणजे त्याच्याकडे पैसे नव्हते, त्या संबंधितचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकला ज्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आता हळू हळू या लॉकडाउनच्या विळख्यातून बाहेर पडत आहोत, कोरोना ओसरतोय तर दुसरीकडे डेल्टाचे रुग्ण वाढत चालले आहेत. दुकानांची वेळ वाढवल्याने व्यापारी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र तोच व्यापारी वर्ग काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरला होता. लॉकडाऊनमुळे धंदा बसला अशी एक ओरड व्यापारी वर्गात आहे.
गेल्या वर्षभरापासून होणाऱ्या लॉकडाऊनमुळे खरोखरच व्यापारी वर्गाला तोटा सहन करावा लागतोय, यात शंका नाहीच. मात्र याव्यतिरिक्त गोष्टींचा परिणाम धंदा बसण्यावर होऊ शकतच नाही का? चला तर मग जाणून घेऊयात, नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, या खालील मुद्द्यांच्या आधारावर :
ग्राहकांच्या गरजा ओळखा
आज वडापावची गाडी नाक्यानाक्यावर आढळून येते, मात्र तरीही एकाच गाडीवर लोकांची गर्दी का असते? याचा विचार करायला हवा. असं काय वेगळे ‘तो’ देतो म्हणून लोक गर्दी करतात? समजा, आजच्या ग्राहकाला नुसता वडापाव आवडत नाही, तर तो शेजवान वडापाव आवडीने खातो. मग त्याच्यासाठी हा पर्याय उपलब्ध असायला हवा.
थोडक्यात काय, तर ग्राहकांच्या गरजा त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा जाणून घ्यायला हव्यात.

स्पर्धकांवर लक्ष
आज घरात लागणाऱ्या सामानासाठी बिग बाजार सारख्या मोठ्या दुकानांचा पर्याय ग्राहक निवडतो. बिग बाजार, डी मार्ट, रिलायन्स मार्केट सारखे तगडे स्पर्धक आहेतच, त्यामुळे आपण ग्राहकाला जितक्या कमी किंमतीत वस्तू विकू शकतो यामध्ये स्पर्धा यांच्यात स्पर्धा चालू असते.

योग्य माणसांची निवड
आज अनेकांना सरळधोपट नोकरी सुरु असताना देखील व्यवसाय करण्याची हुक्की येत असते. घरून व्यवसाय करणाऱ्यावरून विरोध असल्याने आपली सुप्त ईच्छा पूर्ण करण्यासाठी व्यवसायात उतरतात. मात्र योग्य माणसं न मिळाल्याने ते अपयशी ठरतात.
आज अनेक स्टार्टअप्स मोठमोठाल्या ब्रँडच्या कंपन्या केवळ अयोग्य व्यक्तीच्या हातात गेल्यामुळे बुडीत निघाल्या आहेत. मात्र कधी कधी योग्य व्यक्ती मिळून सुद्धा त्यांच्या कौशल्यांचा उपयोग करून घेतला जात नाही.
तंत्रज्ञानांचा अभाव
आज डिजिटल क्रांतीमुळे साध्या पान टपरीवरसुद्धा आपल्याला ऑनलाईन पेमेंटचा पर्याय दिसून येतो. डिजिटल क्रांतीमुळे प्रगती तर नक्कीच झाली रोख व्यवहार कमी होऊ लागले, मात्र याचा फटका ज्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले नाही त्यांना नक्कीच झाला आहे.
आज अगदी शुल्लक रकमेसाठी देखील लोक ऑनलाईन पर्याय वापरतात. आज काही लोक असेही आहेत जे फक्त आणि फक्त ऑनलाइन पेमेंटचा पर्याय असेल तर ती वस्तू घेण्यास तयार असतात.

–
हे ही वाचा – श्रीमंत होण्याची इच्छा आहे ना? जाणून घ्या “श्रीमंतांची सिक्रेट्स”…!
–
आज कोरोनाने अख्या जगाला नेस्तनाबूत केले आहे. मोठमोठाल्या कंपन्यांनी मार्केटमध्ये मागणी नाही म्हणून उत्पादन कमी केले, इतर खर्च कमी केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्मचारी कमी केले.
आज किफायतशीर गाडी म्हणून मारुती सुझुकी कंपनीनेकडे बघितले जाते, त्याच कंपनीच्या अनेक गाड्या धूळ खात पडल्या होत्या. तेव्हा कंपनीने शक्कल लढवून ऑक्सिजन सिलेंडर बनवायला सुरवात केली होती.
कोरोनाचे संकट लवकरात लवकर निघून जाऊ देत आणि पुन्हा एकदा व्यापार वृद्धी होऊन तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेला देखील एक नाव संजीवनी मिळू दे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.