Site icon InMarathi

…तर ‘रंग दे बसंती’मध्ये आमिर, शर्मन, अतुलच्या बरोबरीने जेम्स बॉण्ड दिसला असता!

rang de basanti james bond inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पडता है” आर माधवनचा हा डायलॉग ऐकला, की आजही ‘रंग दे बसंती’ डोळ्यासमोर उभा राहतो. या चित्रपटाची कथा, संवाद, अभिनय, गाणी, दिग्दर्शन या सर्वांच्या मिश्रणामुळे ती उत्तम कलाकृती बनली आहे.

सिनेमातील एकापेक्षा एक सरस असे कलाकार, त्यांचे संवाद यामुळे हा चित्रपट सतत पहावासा वाटतो. अनेक चित्रपटप्रेमींनी या चित्रपटाचे अनेक रंजक किस्से शोधून काढले आहेत आणि आजही सोशल मीडियावर त्यावर चर्चा होतात.

 

 

लंडनमध्ये फिल्मचा अभ्यास करणारी विद्यार्थी सू आपल्या आजोबांनी ब्रिटिश काळात ५ भारतीय स्वातंत्र सैनिकांना दिलेल्या फाशीबद्दल वाचते. ज्यात भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, अश्फाकउला खान, शिवराम राजगुरू आणि राम प्रसाद बिस्मिल असतात.

या स्वातंत्र सैनिकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांचे बलिदान याबबद्दल सू हिच्या आजोबांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिले असते. ती हे वाचते आणि भारतात येते.

भारतात येऊन आमिर खान, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ, कुणाल कपूर आणि शर्मन जोशी यांना घेऊन या विषयावर चित्रपट बनवायचे ठरवते. सूच्या चित्रपटात काम करताना त्यांच्यासोबत अशा घटना घडतात, की त्यांना खऱ्या आयुष्यात सुद्धा एक मोठी लढाई लढावी लागते. यात सर्वच कलाकारांनी क्रांतिकारकांची आणि सद्य परिस्थितीतील अशी दोन्ही पात्र उत्तम साकारली आहेत.

 

डॅनियलच हवा होता

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आपलं आत्मचरित्र ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ यात असा खुलासा केला होता, की सध्याचा जेम्स बॉण्ड म्हणजे डॅनियल क्रेगने रंग दे बसंतीसाठी ऑडिशन दिली होती.

 

===

हे ही वाचा – लोक ज्या व्हिलनला चळाचळा कापायचे, त्याचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला, वाचा

===

रंग दे बसंतीमधील स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देणाऱ्या ब्रिटिश अधिकाराच्या भूमिकेसाठी डॅनियलने ऑडिशन दिली होती. पण त्यावेळी त्याला नवीन जेम्स बॉण्ड म्हणून ठरवण्यात आले त्यामुळे तो रंग दे बसंतीमध्ये दिसू शकला नाही.

जाहिरात क्षेत्रात काम केलेल्या मेहरा यांना हा चित्रपट जागतिक दर्जाचा बनवायचा होता; ज्यात सर्व गोष्टी एकदम परफेक्ट असतील.

‘ऍडम बोवलिंग अँड डेविड रेड’ या दोन हॉलिवूडमधील अत्यंत नावाजलेल्या एक्सिक्युटीव्ह प्रोड्युसर्सना त्यांनी आपल्या चित्रपटात घेतलं. त्या दोघांनाही कथा आवडली आणि ते भारतात येऊन राहिले. या दोघांनीच सु आणि जेम्स मॅकिन्ले यांच्यासाठी ‘एलिस पॅटन आणि स्टीवन मॅकिंटॉश’ यांची निवड निवड केली होती.

याच वेळी तुरुंगातील अधिकाऱ्यासाठी ऑडिशन चालू होती आणि तेव्हा डॅनियलने ऑडिशन दिली होती.

 

बॉण्ड झाला नसता तर…

मेहरा यांचं म्हणणं आहे, की डॅनियलला या रोलसाठी घ्यायचेच होते. मेहरांनी त्याला चित्रपटाची कथा सांगितली आणि ती त्याला आवडली होती. डॅनियल या रोलसाठी तयारही झाला होता, पण त्याच वेळी त्याचा पुढील चित्रपट जेम्स बॉण्डचं शूट सुरु होणार होतं. म्हणून त्याने मेहरांना विचारलं, की ‘रंग दे बसंती’ चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलता येतील का? पण ते शक्य झालं नाही.

डॅनियलचा २००६ सालच्या कॅसिनो रॉयल चित्रपटात त्याने साकारलेला जेम्स बॉण्ड खूप लोकप्रिय ठरला. आणि त्यानंतरही त्याने जेम्स बॉण्ड साकारत आणखी ४ चित्रपट केले.

 

…तर संगीतकारही असता परदेशी

या सोबतच ब्रिटिश रॉक बँड जेनेसिस यातील मुख्य सदस्य आणि इंग्लिश संगीतकार ‘पीटर गॅब्रिएल’ यांनाही मेहरा रंग दे बसंतीसाठी संगीतकार म्हणून घेणार होते. पण नंतर त्यांना असे वाटले की ‘ए आर रेहमान’ चांगलं संगीत देईल आणि त्यांना जे वाटलं ते खरंही ठरलं.

रेहमानने या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीत दिलं. तरुणाईला भावणारं असं ‘अपनी तो पाठशाला’ सोबतच सर्वांना भावुक करेल असे ‘लुका छुपी आणि खून चला’ अशी अप्रतिम गाणी त्याने बनवली.

 

 

रंग दे बसंतीची ऑस्कर्स आणि गोल्डन ग्लोबसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट या श्रेणीत भारताकडून निवड झाली होती. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आत्मचित्रामुळे ‘रंग दे बसंती’बद्दलच्या कळलेल्या गोष्टींनी चित्रपटप्रेमींना थोडंसं वाईट नक्कीच वाटेल.

इतक्या सगळ्या गोष्टी ज्या चित्रपटासाठी जुळून आल्या आणि जी कलाकृती इतकी परफेक्ट बनली, त्यात जर ‘डॅनियल क्रेग’ असता तर फॅन्ससाठी अक्षरशः ‘सोने पे सुहागा’ असेच झालं असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version