' शरीराच्या त्या भागातील केस काढयचा विचार करताय? तर मग आधी या गोष्टी जाणून घ्या – InMarathi

शरीराच्या त्या भागातील केस काढयचा विचार करताय? तर मग आधी या गोष्टी जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पौगंडावस्था हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक अतिशय नाजूक वळण असतं. आपली बाल्यावस्थेतून प्रौढात्वाकडे वाटचाल सुरु होते. याकाळात, आपल्या शरीरात भरपूर हार्मोनल बदल होत असतात.

या आंतरिक बदलांचा बाह्य शरीरावर आणि मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम दिसून येतो. त्यामुळे प्रत्येकानेच आपल्या शरीराची आणि मनाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.

आपण लहान असतो, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणं जरा अवघड जातं, म्हणून या काळात पालकांचं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. पण आपल्याकडे वरवर माहिती देण्याव्यतिरिक्त पालक कोणत्याच गोष्टींबद्दल चर्चा करणं योग्य समजत नाहीत.

 

angry parents inmarathi

 

साहजिकपणे मग मुलं इंटरनेटचा आसरा घेतात. हेच पाऊल नेमकं घातक ठरू शकतं. त्यावर, नकोत्या गोष्टी पाहणं त्यांच्यासारखी जीवनशैली बनवून घेणं, हे सगळं हल्ली वाढू लागलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, आपल्या त्या ठिकाणांवरील केस काढणे.

खरं तर, केस काढण्याला म्हणजेच वॅक्सिंगला आजच्या मॉडर्न पद्धतीनुसार, ‘गृमिंग’चा एक अविभाज्य भाग समजलं जातं. पण निसर्गाने आपल्याला जर एखादी गोष्ट दिलेली आहे, तर तिचा आपल्या शरीरासाठी नक्कीच काही ना काही उपयोग होत असतो, हे आपण विसरत चाललो आहोत.

यामुळे अनेक त्वचा रोग, इन्फेक्शन, पुरळ, असे प्रकार घडू लागले आहेत. हात आणि पाय यांचे केस काढले जात होते तोपर्यंत तरी ठीक होतं, पण आपण आता आपल्या गुप्तांगाच्या आसपास असलेले केस सुद्धा काढायला लागलो आहोत.

 

pubic hair inmarathi

 

तिथेही केस का असतात?

१) घर्षण कमी करणे

गुप्तांगांवरील केसांना ‘ड्राय लुब्रिकंट्स’ सुद्धा म्हणतात. शारीरिक संबंधांच्या वेळी होणारं घर्षण हे अनेक समस्यांना जसे – रॅशेस, पुरळ, इत्यादी यांना कारण ठरू शकतं.

अशावेळी सहसा कृत्रिम लुब्रिकेशन्सचा वापर केला जातो. आपले केस हे ड्राय लुब्रिकेशनचं काम करतात. ज्यामुळे नाजूक त्वचेला, इजा होत नाही.

 

intimate scene inmarathi

 

२) बॅक्टरीया, फंगस आणि पॅथोजन्सपासून बचाव

आपल्या शरीरावर जे केस असतात ते नैसर्गिक फिल्टर्स असतात. त्यामुळे येणारे सगळे बॅक्टरीया तिथे अडकून राहतात आणि त्यांना आपल्या शरीरात प्रवेश करता येत नाही.

 

hair on hands inmarathi

 

त्यामुळे अनेक संसर्ग टाळण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, हेयर फोलिकल्स हे सिबम नावाचं एक तेल तयार करत असतात, ज्यामुळे बॅक्टरीया वाढत नाहीत.

३) फेरोमोन ट्रान्समिशन

आपल्या शरीरात होणारे बदल हे त्या त्या काळात होऊ शकणाऱ्या प्रक्रियांना चालना देतात. हे केसही त्याला काही अपवाद नाहीत. पौगंडावस्थेत आपलं शरीर हे प्रजननासाठी तयार झालेलं असतं. आणि ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक होण्यासाठी, उत्तेजित होणं सुद्धा गरजेचं असतं.

तिथे फेरोमोन कामास येतं. हे एक प्रकारचे सुगंधित केमिकल रसायनं असतात जे आपल्या पार्टनरला प्रणयासाठी उत्तेजित करतात.

 

sex scene 2 inmarathi

 

४) सेक्शुअली ट्रांसमिटेड डिसीज

गुप्तांगावरील केसांमुळे सेक्स दरम्यान होणाऱ्या सेक्शुअली ट्रांसमिटेड डिसीजच्या संसर्गाचा धोका सुद्धा टाळला जातो. ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहून कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवत नाहीत.

 

STDs inmarathi

 

हे तर झाले या केसांचे फायदे. पण तरीही काही लोकांना तिथले केस नकोसे वाटतात. ज्यामुळे ते काढून टाकण्याचे विविध उपाय अवलंबले जातात. तुम्हीही असं करणार असाल, तर तिथले केस काढण्याच्या काही पद्धतींविषयी आणि सर्वात चांगली पद्धत कोणती आहे याविषयी जाणून घेऊ.

या पद्धतींचा वापर करता येईल

१) हेअर रिमूव्हल क्रीम

त्या भागातील केस काढण्यासाठी बाजारात अनेक हेयर रीमुव्हल क्रीम्स उपलब्ध आहेत. पण या क्रीममध्ये असलेल्या केमिकल्समुळे आपल्या केसांच्या मुळांना कायमची इजा होऊ शकते.

 

hair removal cream inmarathi

 

आपली त्वचा फार नाजूक असल्याने आपल्या त्वचेवर रॅश किंवा क्रीम्सची रिअॅक्शन होते, ज्यामुळे जळजळ होणे किंवा फोड – पुरळ येणे हे प्रकार होतात. त्यामुळे क्रीम्सचा वापर करून गुप्तांगांवरील केस कधीच काढू नये.

२) ट्रिमिंग

तुम्ही तुमचे केस पूर्ण पणे न काढता, थोडे वरवरचे व्यवस्थित कापून घेऊ शकता. ज्यामुळे त्वचेला सुद्धा इजा होणार नाही, आणि इतर कोणतीही इजा होणार नाही. सोबतच, पूर्णपणे केस ना कापल्यामुळे इतर इन्फेक्शनचा वगैरे सुद्धा धोका नसतो.

 

pubic hair trimmer inmarathi

 

३) शेविंग

सगळ्यात चांगली, कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नसलेली ही पद्धत वापरून केस काढता येऊ शकतात. फक्त त्यासाठी थोडी प्रॅक्टिस लागते. कारण शेविंग करताना कट्स होण्याची जास्त शक्यता असते.

 

hair shaving inmarathi

 

शेव करताना योग्य आणि माईल्ड फोमिंग क्रीम वापरावे, ब्लेड्स दर वापरानंतर बदलून टाकावे आणि आपल्या केसांची वाढ ज्या दिशेने आहे त्या दिशेने रेझर फिरवावे. शेव केल्यानंतर त्या जागेवर क्रीम लावून त्वचा मोईश्चराईझ करावी.

४) लेझर ट्रीटमेंट

लेझर ट्रीटमेंटमुळे हेयर फोलिकल्सना कायमचं, नष्ट करून केस उगवणेच बंद करता येतात. आणि पुन्हा केस न उगवल्याने, होणाऱ्या सगळ्या साईड इफेक्ट्सचा धोका वाढतो. पण, या ट्रीटमेंटबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. पुरुषांमध्ये वीर्य कमी होईल का, किंवा स्त्रिया गरोदर राहू शकणार नाहीत का? मात्र लेझर ट्रीटमेंटमुळे असे कोणतेही साईड इफेक्टस होत नाहीत.

 

lazor treatment for hair inmarathi

 

अस्वच्छ वाटतं म्हणून, काहींच्या पार्टनरला ते आवडत नसतात म्हणून लोक गुप्तांगाचे केस काढतात. पण ते ना काढता आपल्या गुप्तांगाची योग्य ती काळजी घेतली, योग्य स्वछता राखली की कोणत्याही समस्या उद्भवू शकणार नाही.

शेवटी आपल्या प्युबिक हेअरचं काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयत्तिक प्रश्न आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?