Site icon InMarathi

पगडीवरून चिडवण्याचा बदला – त्याने घेतल्या पगडीला मॅचींग १५ रोल्स-रॉयस!

reuben singh matching inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तुम्ही तुमचे संस्कार , तुमची धार्मिक प्रतीके आणि तुमची संस्कृती यांना किती महत्त्व देवू शकता? खरेतर याला काहीच सीमा नाहीत हे एका ‘सन ऑफ सरदार’ने दाखवून दिले, ते ही अशा पद्धतीने की सार्‍या जगात त्याची चर्चा रंगली होती.

ही गोष्ट आहे त्या व्यक्तीची ज्याला इंग्लंडचा ‘बिल गेट्स’ म्हणतात. त्याचे नाव आहे ‘रुबेन सिंग’. नक्की काय आहे ही स्टोरी? चला पाहूया.

 

रूबेन सिंग यांची लाईफस्टाईल…

आज त्यांच्याकडे २० रॉल्स रॉयस सोबत इतर लक्झरी कार्स मिळून ३५ महागड्या कार्स आहेत. आलिशान बंगला, स्टायलिश लक्झरी कार्स आणि राजा-महाराजांसारखी लाईफस्टाईल कोणाला आवडणार नाही? मात्र जगात असे खूप कमी लोक असे असतात जे असे जीवन जगतात. रुबेन सिंग हे त्यापैकीच एक आहेत.

 

cartoq.com

रूबेन यांच्या आयुष्याबद्दल थोडंसं…

फार पूर्वी म्हणजे, १९६० च्या दशकात रुबेन यांचे पिता दिल्लीहून ब्रिटेनला स्थायिक झाले. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या रुबेन यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून आपल्या स्वतंत्र व्यवसायाची सुरवात केली. शिक्षण चालू असतानाच त्यांनी ‘मिस अॅटीट्यूड’ नावाने रिटेल बिझनेस चेन सुरू केली होती. जी त्यांनी १९९९ मध्ये दुसर्‍या कंपनीला विकली.

आज ते ‘ऑलडेपीए’ या कॉल सेंटर कंपनीचे आणि प्रायव्हेट इक्विटी फर्म ‘इशर कॅपिटल’चे सी.इ.ओ. आहेत. तसेच ते ‘नॅशनल लिविंग वेज’चे सल्लागार देखील आहेत. ब्रिटेनचे पूर्व प्रधानमंत्री टोनी ब्लेयर यांच्यासोबत ही त्यांनी काही काळ काम केले आहे.

 

bbc.com

रुबेन सिंग यांनी काही काळापूर्वीच एकदम सहा रोल्स रॉयस गाड्यांची खरेदी केली; या खरेदीसाठी त्यांनी पन्नास करोड रुपये खर्च केले. या सहा गाड्यांमधील तीन गाड्या लक्झरी फैंटम सेडन आहेत आणि तीन कलीनन लक्झरी एसयुवी आहेत. या गाड्यांना त्यांनी दिलेली नावे ही माणिक, निलम आणि पाचू ( पन्ना ) ही आहेत.

या कार कलेक्शनला त्यांनी ‘ज्वेलरी कलेक्शन बाय सिंग’ म्हटले आहे. या कार खरेदी केल्यापासून रुबेन सिंग सोशल मीडियावर चर्चेत असतात.

या गाड्यांच्या आगमनाने आता सिंग यांच्या रोल्स रॉयस गाड्यांची संख्या २० झाली असून त्याशिवाय त्यांच्याकडे ‘बुगाटी वेरॉन, पोर्श ९१८ स्पाइडर, पगानी हुयरा, लेम्बोर्गिनी हुराकान आणि फेरारी एफ १२ बर्लिनटाटा’सारख्या महागड्या कार्स आहेत.

नवलाईची गोष्ट म्हणजे कार विक्री करताना आपल्या ग्राहकाचे स्टेटस बघणार्‍या रोल्स रॉयस कंपनीचे सीईओ ‘टॉर्स्टनन मुलर ओटवॉस’ यांनी या गाड्यांच्या किल्ल्या स्वत: रुबेन सिंग यांच्याकडे सुपूर्त केल्या.

 

 

मध्यंतरी त्यांनी सात दिवशी सात वेगवेगळ्या रंगांच्या रोल्स रॉयस गाड्यांचे आणि त्याच रंगाच्या पगड्यांसह स्वत:चे फोटो इनस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते.

हा ‘किंग’ असलेला ‘सिंग’आपल्या यशाचे सगळे श्रेय आपल्या परमेश्वराला देतो. दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्यावेळी, म्हणजे सप्टेंबरमध्ये रुबेन सिंग भारतात येतात आणि अमृतसर येथील सुवर्णमंदिरात जाऊन आपल्या गुरूंचे दर्शन घेतात. इतकेच नाही तर जगभरातील शीख बांधवांना ते पगडी परिधान करण्याचे महत्व पटवून देण्याचे कार्य करतात.

 

 

अर्थात, पगडीला मॅचिंग अशी रोल्स रॉयस विकत घेण्यामागे इतिहास आहे. ही गोष्ट अशीच घडलेली नाही. वाईटातूनही कधी कधी चांगलं घडतं, म्हणतात ना, त्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

घडलं असं की…

ब्रिटेनमध्ये राहणार्‍या रुबेनसिंग यांनी त्यांना ऐकाव्या लागलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीनंतर ठरवले, की ज्या रंगाची पगडी ते घालतील त्याच रंगाची रोल्स रॉयस ते चालवतील.

आपण ठरवलेली ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी ते आधी आपल्या पगडीची खरेदी करतात आणि मग त्याच रंगाची रोल्स रॉयस खरेदी करतात.

एका ब्रिटिश उद्योगपतीने पगडीचा उल्लेख ‘बँडेज’ असा करून रुबेन सिंग यांची चेष्टा केली. तेव्हा या पठ्ठ्याने ठरवले, की ज्या रंगाची पगडी तो बांधेल, त्या रंगाची महागातली महाग गाडी तो चालवेल. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने आपले शब्द अक्षरश: खरे करून दाखवले.

 

 

ही गोष्ट होती २०१७ सालची, लंडनचे बिझनेस टायकून ‘रुबेन सिंग’ यांनी आपल्या पगडीची चेष्टा करणार्‍या ब्रिटिश बिझनेसमनला आपल्या पगडीच्या रंगाची रॉल्स रॉयस खरेदी करून दाखवून दिले, की जगातली कोणतीच गोष्ट ही आपल्या धार्मिक प्रतिकापेक्षा मोठी नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version