आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
जगबुडी होईल, अमुक अमुक एका वर्षी जगाचा नाश होणार आहे, तिकडे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर देखील वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळत चालला आहे अशा प्रकारच्या बातम्या आपल्या व्हाटसअॅपवर सर्रास येत असतात. त्यातल्या खऱ्या किती आणि खोट्या किती यावर मात्र चर्चा होतं असते.
चिपळूण, महाड कोल्हापूर सांगली ही शहरं पुरातून नुकतीच सावरत आहेत अजूनही तिकडचे जनजीवन रुळावर आलेले नाही, त्यातच नासा सारख्या संस्थेने एक अहवाल सादर करून सर्वांची झोप उडवली आहे. नासाच्या अहवालानुसार मुंबईसह काही इतर शहरे येत्या काही वर्षात पाण्याखाली जाणार आहेत.
अहवालात नेमकं काय म्हटलं आहे?
नासा ही अशी एक संस्था आहे जी संपूर्ण जगावर आणि जगाच्या खाली असलेल्या भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नजीकच्या काळात हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढू शकते. या शतकाच्या अखेरीपर्यंत भारतातील समुद्रकिनारी असलेली शहरे ३ फूट पाण्याखाली जातील. तसेच नदीच्या आसपास असलेल्या भूभागच क्षेत्रफळ सुद्धा कमी होऊ शकत.
समुद्रकिनारी म्हणजे नेमकी किती शहरांना हा धोका आहे चला तर मग बघुयात ही शहरे कोणती ते …..
मुंबई :
आधीच मुंबई एका पावसात तुंबई होते, त्यात वाढते प्रदूषण, लोकसंख्या यामुळे मुंबईला हा सर्वात जास्त धोका आहे.
मंगलोर :
भारतातील ऐतिहासिक शहरांमध्ये मंगलोरचा समावेश होतो अगदी ३ शतकापासून हे शहर अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत. प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या या शहराला सुद्धा धोका आहे.
चेन्नई :
भारतातील मेट्रो सिटीज पैकी एक असलेले हे शहर. आज अनेक उद्योगधंदे, सिनेसृष्टी इथे अस्तित्वात आहेत. या शहराचा देखील नासाने उल्लेख केला आहे. येथील मरिना बीच जवळजवळ ७ किमीचा आहे.
तुतिकोरन :
भारतातील १० प्रमुख बंदरांपैकी असलेलं हे एक बंदर जे चेन्नईच्या खालोखाल येत. मासेमारी, मिठागरे यांचा व्यवसाय चालतो. या बंदरातून परदेशात देखील व्यापार चालतो.
कोची :
मसाल्यांचा व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखेल जाणारे कोची हे बंदर अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.
पारादीप :
ओडिशा राज्यातील बंगाल खाडीवर असलेलय या बंदरामध्ये खोल पाणी असल्याने अनेक मोठमोठाली जहाज इथे येऊ शकतात.
ओखा :
श्रीकृष्णाच्या द्वारकेजवळ असलेले हे एक लहान बंदर. गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी किनाऱ्यावर हे बंदर आहे.
मोरमुगाओ :
प्रामुख्याने लोखंडाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेले हे बंदर दक्षिण गोव्यात आहे. पूर्वी या बंदरातून पोर्तुगीज आणि ब्रिटिशांचे व्यापार चालू असायचे.
कांडला :
गुजरातच्या कच्छ भागातील हे एक प्रमुख बंदर आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर हे बंदर स्थापन करण्यात आले.
भावनगर :
गुजरातमधील भावनगर हे पूर्वीपासून सागरी व्यापारास उत्तेजन मिळावे म्हणून हे शहर वसविले गेले. आजही ही गुजरातमधील प्रमुख शहरांपैकी आहे.
–
हे ही वाचा – नेटफ्लिक्सच्या ‘या’ वेब सिरिजने २०१८ मध्येच केली होती कोरोनाची ‘भविष्यवाणी’!!
–
आज कृष्णाच्या द्वारकाबेट बुडण्याच्या अनेक कथा आपल्या ऐकण्यात आल्या आहेत. नासारख्या संस्थेने दिलेला हा अहवाल खरोखरच विचार करण्यासारख्या आहे. आधीच कोरोनाचे संकट आहे त्यात दरवर्षी येणारी वादळे, पूरजन्य परिस्थिती यामुळे जनजीवन विस्कळीत होत चालेले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.