आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
जगासमोर असणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणावर उपाय सापडला असण्याची आशा पल्लवित झाली आहे.
जपानमधील वैज्ञानिकांना एका अश्या बॅक्टेरियाच्या जातीचा शोध लागला आहे जी प्लास्टिकचं विघटन करू शकते.
जर हा शोध वाटतोय तितका यशस्वी असेल तर जगासमोर आ वासून उभा असलेला प्लास्टिकचा “प्रदुषणासुर” आटोक्यात येण्यास सुरुवात होईल.
प्लास्टिकची समस्या किती मोठी आहे ह्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर –
२०५० सालापर्यंत समुद्रात मास्यांपेक्षा प्लास्टिक जास्तं असेल.
दुसऱ्या एका अभ्यासानुसार –
फक्त १४ % प्लास्टिक रिसायकल होतं – बाकीचा सर्व कचरा बनतो !
अश्या परिस्थितीत हा शोध फारच उपयुक्त आहे.
हा बॅक्टेरिया सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या Polyethylene terephthalate (PET) ह्या प्लास्टिकचं जलद गतीने विघटन करतो.
Science ह्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार :
Ideonella sakaiensis हा बॅक्टेरिया २ enzymes च्या मदतीने PET चं विघटन करून स्वतःच्या वाढीचे घटक निर्माण करतो.
ह्या शोधामुळे प्लास्टिक प्रदूषणाच्या अजस्त्र समस्येवर उत्तर मिळण्याची आशा बळकट झाली आहे.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi