ग्लॅमरस आणि गोड “सारा तेंडुलकर” बद्दलच्या या ६ गोष्टी माहित आहेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे. क्रिकेटचा विषय निघाला आणि सचिनचं नाव चर्चेत आलं नाही, असं फार कधी होतं नाही. तेंडुलकरांच्या पुढच्या पिढीतील अर्जुन मैदानावर उतरला असला तरी त्याची मात्र फार चर्चा झाली नाही, होत नाही.
याऊलट, अर्जुनची मोठी बहीण आणि सचिनचं कन्यारत्न सारा ही मात्र काही ना काही कारणाने फारच चर्चेत असते. अगदी शुभमन गिलशी तिचं नाव जोडलं जाण्यापासून, ते ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार इथपर्यंत, अनेक उलटसुलट चर्चांना नेहमीच उधाण आलेलं असतं.
सचिनविषयी जाणून घेण्यात लोकांना जेवढी उत्सुकता असते, तेवढीच उत्सुकता साराच्या बाबतीतही असते. ‘ती सध्या काय करते’ हा प्रश्न तिच्या बाबतीत तुम्हीही कधीतरी विचारला असेल. तर मग तिच्याविषयी या गोष्टी माहित आहेत का, हे एकदा तपासून बघाच…
१. बॉलिवूडमध्ये नाहीच
सारा बॉलिवूडमध्ये येणार अशी चर्चा घडलेली तुम्हाला माहित असेल. या अफवा पसरल्या तेव्हा तर लोकांनी थेट हिरोचं नावही ठरवून टाकलं होतं. आता दमदार अभिनेता शाहिद कपूरसह चित्रपटात सारा पाहायला मिळणार, असं कुणी सांगितलं म्हणजे चर्चा तर होणारच…
आता या अफवा अशा काही वाऱ्यासारख्या पसरल्या, की सचिनला यात लक्ष घालावं लागलं. साराचा मनोरंजन विश्वात जाण्याचा कुठलाही विचार नाही, तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलं आहे हे सचिनने स्वतः स्पष्ट केलं होतं.
२. साराच्या नावाचा ‘सहारा’
साराचा जन्म १९९७ सालचा. आता तुम्ही म्हणाल याचा तिच्या नावाशी संबंध काय? यावर्षी भारताने सहारा कप जिंकला होता. या संघाचा कर्णधार होता सचिन तेंडुलकर!
या विजयाचा परिणाम असा झाला की सचिनने आपल्या मुलीच्या नावासाठी याच शब्दाचा ‘सहारा’ घेण्याचं ठरवलं. म्हणूनच तेंडुलकरांच्या कन्येचं नाव सारा असल्याचं म्हटलं जातं.
३. शॅम्पेनची बाटली…
सचिनने पहिलीवहिली शॅम्पेनची बॉटल मिळवली ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा… आज क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन त्यावेळी १८ वर्षांचाही नव्हता, हे तर आपल्याला ठाऊक आहेच.
त्यावेळी वयाची १८ वर्षं पूर्ण न झाल्यामुळे उघडण्यात न आलेली शॅम्पेनची बाटली चक्क सारा १८ वर्षांची झाल्यावर उघडली गेली होती, हे तुम्हाला माहित आहे का?
===
हे ही वाचा – अभिनय, दमदार फाईट-सीन्स ने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी
===
४. तेंडुलकरांचे जावई
भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल आणि सारा यांच्या नात्यांची चर्चा तर नेहमीच सुरु असते. सारा आणि शुभमन यांचं अफेअर सुरु असल्याच्या वावड्या उठतात, त्याला कारणंही तशीच असतात. मग साराने शुभमनच्या फलंदाजीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करणं असो, किंवा आणखी काही!
साराचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत बरं का मंडळी…!!
या अफवा आहेत, की या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य आहे हे येणारा काळ सांगेलच. पण तोपर्यंत चर्चा थांबणार नाहीत यात काहीच शंका नाही.
५. साराचं शिक्षण
तेंडुलकरांचं कन्या रत्न साध्यासुध्या शाळेत गेलं असतं तर ते नवल ठरलं असतं, नाही का! साराचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल या शाळेतून झालं असून, त्यानंतर ती वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडनलाही गेली होती.
६. जस्टीन बायबरकडून शुभेच्छा
आपल्या लाडक्या आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या साराला थेट जस्टीन बायबरने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
===
हे ही वाचा – प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाला हार्दिक पंड्याबद्दल या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.