या टॉप ऍक्शन हिरोचे वडील होते चक्क गुप्तहेर आणि आई कुख्यात स्मगलर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना आपल्या चित्रपटातील विनोदी अभिनयाने हसवणारा आणि स्टंट्सने चकित करणारा कलाकार म्हणजे फॅंग शिलॉंग. तुम्ही म्हणाल हा कोणता अॅक्टर आहे, तर हा आहे सुपरस्टार जॅकी चॅन त्याचे खरं नाव वेगळे असून तो हे नाव वापरतो.
त्याच्याबद्दल सर्वांनाच कायम कुतुहूल आहे कि तो इतके सारे स्टंट्स कसे काय करतो? याही वयात त्याने स्वतःला इतकं कसं फीट ठेवलं आहे? त्याच्या चित्रपटांची व त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से त्याच्या फॅन्स आणि इतर सर्वांना कायम ऐकायला आवडतात…
जॅकी चॅनला मार्शल आर्टस्मधले स्टंट्स, कॉमेडी भूमिका यामुळे त्याला प्रथम हॉंगकॉंगमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. तो चित्रपटात स्वतःचे स्टंट्स स्वतः करण्यासाठी प्रसिद्ध असून यासाठी तो स्पेशल इफेक्ट्सचा वापर करत नाही. अनेक वेळा हे करताना त्याला दुखापती होतात, या दुखापतींची लिस्ट मोठी आहे.
ज्यात स्टंट चित्रीकरण्याच्या दरम्यान त्याच्या डोक्याला मार लागला आणि डोक्यात खोक पडली, खांदा, पाय, हात, पाय, नाक, हनुवटी अशा कोणता भाग उरला नसेल जिथे त्याला त्याला दुखापती झाल्या नसतील तरीही तो आजही स्वतःच स्टंट करतो. लोकांना ते पाह्ण्यात जास्त आवडते. त्यामुळेच तो सुपरस्टार आहे आणि त्याचे बरेच फॅन्स आहेत. ज्या चिनी ऑपेरामध्ये त्याने १० वर्ष प्रशिक्षण घेतले तिथे त्याला त्याच्या विनोदी भूमिकांच प्रशिक्षण मिळालं.
असाच त्याच्या आई वडिलांबद्दलचा किस्सा जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का? जॅकी चॅनचे आई वडील एकमेकांना पहिल्यांदा चीन मधल्या तुरुंगात भेटले. जॅकी चॅनचे वडील गुप्तहेर खात्यात होते व त्याची आई शांघाय शहरात अंमली पदार्थांची विक्री करायची. तिच्या या कामामुळे जॅकीच्या वडिलांनी तिला तुरुंगात टाकले होते तेव्हाच त्यांची भेट झाली. या सर्व गोष्टी जॅकीला तो मोठा झाल्यावर कळलं आणि मोठा धक्काच बसला.
जॅकी चॅनचा जन्म ७ एप्रिल १९५४ मध्ये हॉंगकॉंगमध्ये झाला. तो लहानपणापासूनच शारीरिकदृष्ट्या ताकदवान होता त्याच जन्माच्या वेळी वजन ९ ते १२ पौंड एवढे होते. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचे प्रेमाने नाव शेडोंग तोफ असे ठेवले. त्याचे आई वडील गरीब होते, व ते फ्रेंच दूतावास कार्यालयात कामाला होते.
वडील आचारी होते आणि आई साफसफाई कामगार होती. परंतु २००३ च्या ‘ट्रेसेस ऑफ द ड्रॅगन : जॅकी चॅन अँड हिज लॉस्ट फॅमिली’ या डॉक्युमेंटरी मधून त्याच्या आई वडिलांच्या पूर्वीच्या आयुष्यातील रंजक गोष्टी कळल्या.
जेव्हा तो ७ वर्षांचा होता तेव्हा त्याचे आई वडील ऑस्ट्रेलियाला गेले, आणि तिथे जाऊन त्याच्या वडिलांनी अमेरिकन दूतावास कार्यालयात आचारीची नोकरी करण्यास सुरुवात केली. जॅकीला त्यांनी हॉंगकॉंगमधील चीन ड्रामा अकॅडेमी या बोर्डिंग शाळेत दाखल केले.
जॅकी जेव्हा त्याच्या वडिलांना ऑस्ट्रेलियामध्ये भेटायला गेला तेव्हा त्याला कळलं, की त्याचे आई वडील चीन सोडून हॉंगकॉंगला आले तेव्हा ते त्यांच्या मुलांना तिथेच सोडून आले. त्याच्या वडिलांची पहिली बायको १९४९ मध्ये गेली जिच्यापासून त्यांना २ मुलं होती व त्याच्या आई चे पहिले पती जपानच्या बॉम्ब हल्यात मरण पावले व त्यांच्यापासून तिला २ मुली होत्या ह्यांना ते चीन मध्ये सोडून आले. ते आत्ता जिवंत आहेत कि नाही याची त्यांना काहीच माहिती नाही.
चीन मधील जीवनमान सामान्य असून तेथील खर्च ही फार स्वस्त आहेत. यामुळे मुलांना सोडून देणे ही तितकीशी त्यांच्यासाठी गंभीर बाब नाहीये . आपल्या मुलांना सोडून दुसरीकडे जाणे ही गोष्ट चीनमध्ये फार सामान्य आहे, अनेक पालक आपल्या मुलांना असे सोडून देतात.
जॅकीच्या आईबद्दल सांगताना त्याचे वडील सांगत, की ती चीनमध्ये असताना अफूची तस्करी, जुगार आणि गुन्हेगारी वर्तुळातील नावाजलेली महिला होती. तिला गुन्हेगारी वर्तुळात मोठी बहीण म्हणून ओळखले जात असत.
तिच्या हॉंगकॉंगमधील वागण्यामुळे सर्वांनाच ती अत्यंत सामान्य गृहिणी जी कष्टकरी आणि शांत आहे असे वाटत असे. परंतु तिचा इतिहास कळल्यावर सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी असे ही सांगितले की त्यांच्या कुटुंबाचे नाव चॅन नसून फॅंग आहे व पूर्ण नाव फॅंग दाओलॉन्ग आहे.
२००१ साली जॅकची आई लिली आणि २००८ साली वडील चार्ल्स यांचे निधन झाले. दोघांना ऑस्ट्रलियातील कॅनबेरा येथे अंत्यविधी नंतर पुरण्यात आले.
चार्ल्स ८० वर्षांचे झाले असले तरी ते मनाने अगदी तरुण होते. ते बोलताना त्यांच्या तोंडात कायम पाईप असे. त्यांना पाईप, व्हिस्की व कुंगफू ह्याची आवड होती. ते रोज दिवसातून दोन वेळा विस्की घेत, त्यांचं अत्यंत दिलखुलास व स्वछंदी व्यक्तिमत्व होत. ते बोलताना कायम विनोदी अंदाजात बोलत पण तितक्याच परखड पणे ते आपली मतही मांडत असत.
ट्रेसेस ऑफ ड्रॅगन या डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीला त्याच्या निर्मात्यांना व इतरांना वाटलं ही नसेल की या डॉक्युमेंटरी मधून इतक्या गोष्टी समोर येतील. पण जॅकी च्या आई वडिलांच्या पूर्वीच्या इतिहासामुळे ती रंजक बनली व त्याच्या फॅन्सना यातून फार मोठा धक्का बसला असेल हे सर्व पाहून. कारण त्या सर्व फॅन्सनी कायमच जॅकीच्या आयुष्यातील छोटया छोटया गोष्टींची नोंद ठेवली असेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.