' सिनेमाच्या परफेक्शनसाठी काय पण! नोलनने केली होती चक्क मक्याची शेती… – InMarathi

सिनेमाच्या परफेक्शनसाठी काय पण! नोलनने केली होती चक्क मक्याची शेती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एकविसाव्या शतकातील प्रमुख फिल्ममेकर्सपैकी एक नाव आहे, ख्रिस्तोफर नोलन. आधुनिक सिनेमातील मास्टरपीस म्हणता येतील अशा सिनेमांची निर्मिती त्यानं भाऊ जॉनथनसह केलेली आहे. नोलानचे सिनेमे हे व्हिज्युअल ट्रिट असतात. त्याच्या मेमेण्टो सिनेमा हा नॉनलिनिअर सादरीकरणाचा उत्तम नमूना मानला जातो.

या चित्रपटाद्वारे त्यानं पारंपरिक पध्दतीने सिनेमा सांगण्याची पध्दतच बदलून टाकली. शॉर्टटर्म मेमरी लॉस असणारी एक व्यक्ती त्याच्या पत्नीचा शोध घेण्याची थरारक गोष्ट त्यानं या चित्रपटातून मांडली (आपल्याकडे यावर आधारीत गजनी आला).

केवळ ९ मिलियन डॉलर्समधे बनलेल्या या चित्रपटानं कमाल केली आणि नोलनची दखल जगभरात घेतली गेली. नोलनची स्टाईल म्हणून, त्याच्या सादरीकरणाचं वेगळेपण म्हणून याप्रकारच्या नरेशनकडे बघण्यात येऊ लागलं.

 

chris nolan inmarathi

परफेक्शनचं दुसरं नाव

नोलनला ज्या पध्दतीचा शॉट हवा आहे त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. मनाजोगता शॉट मिळविण्यात तो कसलीही तडजोड करत नाही हे त्याचं वैशिष्ट्य. त्याला डोळ्यासमोर कथा जशी दिसते तशीच ती कॅमेर्‍यातून पडद्यावर उतरावी अशी त्याची धडपड असते.

त्याच्या डार्क नाईटच्या सिनेमात त्यानं एक वेगळं आणि वास्तववादी जग उभं केलं. बॅटमनकडे जग ज्या नजरेतून पहात होतं त्याची दिशाच त्यानं वळवली आणि एक वेगळी दृष्टी देत या कथाकडे बघायाला भाग पाडलं.

एखादी लोकप्रिय आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेलं, वर्षानुवर्षं पाहिलं जाणारं कथानक डोक्यावर घेतलेलं असताना ते नव्या पध्दतीनं सादर करणं धाडसाचं होतं. नोलनने नुसतंच हे धाडस केलं असं नाही तर ते प्रेक्षकांनी नव्यानं डोक्यावरही घेतलं.

दुसर्‍या महायुध्दाची पार्श्वभूमी असणारा डंकर्क म्हणजे त्याचा आजवरचा मेगा प्रोजेक्ट होता. फ्रान्सच्या समुद्रकिनार्‍यावर हजारो ज्युनिअर कलाकारांचा समावेश करत त्याने या चित्रपटाला जो भव्य कॅनव्हास दिला तो युध्दपटातील महत्वाचा चित्रपट मानला जातो.

 

dunkirk inmarathi

 

याचं कारण म्हणजे यातले बहुतेक सिन हे वास्तवात चित्रीत केलेले आहेत. स्पेशल इफेक्टचा यात कमीत कमी वापर केलेला आहे.

शेती केली कारण…

त्याच्या बहुचर्चित सिनेमांपैकी एक म्हणजे, इंटरस्टेलर. या चित्रपटानं नोलानला चक्क मक्याची शेती करणारा शेतकरी बनवलं. चित्रपट बघताना तुम्हाला कदाचित हे जाणवणारही नाही मात्र चित्रपटाला जास्तीत जास्त ऑथेण्टिक पध्दतीनं सादर करण्यासाठी त्यानं या कथानकात असणार्‍या मक्याचं शेत खरं खुरं उभं केलं.

उभं केलं याचा अर्थ खरं पिक कृत्रिमपध्दतीनं लावत देखावा बनवला असं नाही, तर त्यानं खरोखरच शेतात मका पेरून, ते शेत चित्रपटात दाखवलं.

गंमत म्हणजे चित्रपटासाठी त्याला प्रचंड मोठ्या क्षेत्रफळाचं मक्याचं शेत हवं होतं. यासाठी त्याने अशा ठिकाणी मका लागवड केली जिथे मका पिकला आणि विकला जात नसे. चित्रपटासाठी मका लागवड करून नंतर चित्रीकरण संपल्यावर त्याने हा मका विकूनही प्रचंड नफा मिळवला.

 

corn farming inmarathi

 

चित्रपटात CGI चा उपयोग आता सर्रास बनला आहे. जे न देखे रवी ते देखे कवी यात बदल करून सामान्य माणसं जे बघू शकत नाही ते चित्रपट कथा लिहिणारे बघतात आणि मग ते पडद्यावर उतरविण्यासाठी कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर केला जातो.

सध्याच्या आधुनिक सिनेमा निर्मितीमधे CGI हा अनिवार्य घटक बनला आहे. अगदी साध्या साध्या सीन्समधेही याचा वापर केला जातो. गर्दी दाखविण्यासाठी असो की वास्तवात गजबजलेल्या ठिकाणी शूट झालेलं असलं तरीही पडद्यावरून ती गर्दी गायब करणं असो. CGI ला पर्याय नाही.

मात्र नोलन जगाच्या प्रवाहाविरूध्द पोहोतो आहे. CGI चा कमीत कमी वापर करत तो चित्रपट अधिकाधिक वास्वववादी पध्दतीनं सादर करतो.

एका चित्रपटासाठी मक्याची शेती उभी करण्याची काय गरज होती? याचं उत्तरही मोठं रंजक आहे.

इंटरस्टेलरचा नायक जोसेफ कूपर (मॅथ्यू मॅककोनाघे) हा संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी नवीन ग्रहाच्या शोधात असतो.

 

joseph cooper inmarathi

 

चित्रपटात फारसं विस्तारानं सांगणं टाळलेल्या ब्लाईटमुळे पृथ्वीवरची सर्व पिकं नष्ट झालेली असातात मात्र केवळ मका आणि भेंडी ही दोनच अखेरची पिकं उरलेली असतात.

हे जे कथेतलं मक्याचं शेत आहे ते पडद्यावर दाखवणं अशक्य होतं कारण कथेत ते अशा प्रकारे वर्णन केलेलं होतं, डोंगरानी वेढलेल्या जमिनीवर आणि मक्याच्या शेतांनी वेढलेलं असं हे शेत आहे. जगात असं दोन्ही उपलब्ध असाणारी शेतं जवळपास नाहीत.

म्हणून मग स्वतःच घेतला पुढाकार

बर्‍याच ठिकाणांची रेकी झाल्यावर अखेर नोलन याने स्वत:च शेती करण्याचा धोका घेण्याचं ठरवलं. पश्चिम कॅनडामधे त्यानं त्याला हव्या असणार्‍या लोकेशनवर हे पिक उभं केलं. अनेकांनी त्याला मका घेणं धोक्याचं असून कदाचित पिक येणारच नाही असं सांगितलं.

नोलनला हे पिक दीर्घकाळ उभं राहिलं नाही तरीही चालणार होतं, कारण पडद्यावर ते कसं दिसतंय हे त्याला जास्त महत्वाचं होतं. अखेर शेती तज्ञांच्या मदतीनं त्यानं मका पेरला, तो शुटिंगसाठी वापरला आणि नंतर पिक विकून त्यानं त्यातही कमाई केली.

 

nolan 2 inmarathi

 

आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं करण्याची खरंच काय गरज होती? पडद्यावर खरंच काही फरक दिसणार होतं का? यासाठी तुम्ही नोलनच्या मक्याच्या शेताच्या सेटची तुलना जस्टिस लिगमधील शेतीशी करा.

जस्टिस लीगमध्ये CGI निर्मित शेत आहे. कृत्रिमता आणि नैसर्गिक देखावा यात फरक असतोच आणि तोच नोलनला अमान्य आहे. याच कारणामुळे नोलनच्या सिनेमांचं वेगळेपणही दिसून येतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?