' हॉटसन गोगटे – इतिहासात लुप्त झालेला एक मराठी क्रांतिकारक!! – InMarathi

हॉटसन गोगटे – इतिहासात लुप्त झालेला एक मराठी क्रांतिकारक!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

वासुदेव बळवंत गोगटे ज्यांना हॉटसन गोगटे या नावानंही ओळखलं जातं. त्यांना आज पुण्याबाहेर तर राहूच दे पण पुण्यातही फारसे कोणी ओळखत नाही. वासुदेव बळवंत फ़डके याच्याशी साध्यर्म्य असणार्‍या नावामुळेही अनेकांची गल्लत होते. कोण होते वासुदेव बळवंत गोगटे?

पुण्यात किमान एका चौकाच्या नावाच्या रुपात का होईना पण क्रांतिकारक वासुदेव बळवंत फ़डके हे नाव आजही लोकांच्या परिचयाचं आहे. काहींना त्यांच्या योगदानाचीही माहिती आहे मात्र याच पुण्यात आणखिन एक वासुदेव बळवंत क्रांतिकारक होऊन गेले ज्यांना हॉटसन गोगटे या नावानं ओळखलं जात असे. त्यांची माहिती मात्र जवळपास अज्ञानाच्या अंधारात गेलेली आहे.

 

vasudev inmarathi
scroll.in

 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ते एक अग्रणी क्रांतिकारक होते आणि उजव्या विचारसरणीच्या हिंदूमहासभेचे सदस्य होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य विधान परिशदेतील विरोधी पक्षनेते आणि पुण्याचे महापौरही होते.

गोगटे मुळचे पुण्याचे नव्हते त्यांचे वडील मिरजेत शिक्षक होते. गोगटे शिक्षणासाठी १९३० साली पुण्यातील फ़र्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. ते महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहात असत.

अनेक क्रांतिकारकांच्या कार्यानं भारावलेल्या गोगटेंच्या मनात देशप्रेमाची, स्वातंत्र्याची भावना तेवत होती. त्याकाळातील अनेक महाविद्यालयीन तरूण क्रांतिकारकांप्रमाणेच गोगटेंनाही सक्रीय सहभाग घ्यायचा होता.

 

ferguson college inmarathi
college serach

 

क्रांतिकारकांनी लिहिलेले विचार वाचत गोगटे लहानाचे मोठे झाले. या विचारांनी भारावून गेलेल्या गोगटेंना देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात उतरायचं होतं. लाहोर कराची प्रकरणानंतर हा विचार अधिकच दृढ झाला आणि त्यांनी मनाशी निर्णय घेतला की, जे काही करायचं आहे ते एकट्यानं करायचं. कारण आपल्यासोबत इतर कोणी असेल तर त्यांना आपल्या कामानं त्रास व्हायला नको.

याच दरम्यान एक घटना घडली, इतिहासात ती सोलापूर मार्शल लॉ या नावानं नोंदवली गेली आहे. झालं असं होतं की, काही निर्दोष नागरिकांना, जे सत्याग्रह करत होते अशांना मार्शल लॉचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मल्लापा धनशेट्टी, कुर्बान हुसैन, सारडा णि शिंदे अशा चार सत्याग्रहींना विनाकारण ब्रिटिश सैन्यानं निर्दयीपणे फासावर लटकावलं.

 

solapur inmarathi
samana.com

हे ही वाचा – भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि स्वातंत्र्य सेनानींबद्दल या १० गोष्टी प्रत्येकाला माहित असायलाच हव्यात

या काळात कर्मयोगी हे सोलापूरहून प्रसिध्द होणारं एक पत्रक होतं. यात या घटनेची सौम्यपणे माहिती देण्यात आलेली होती. मात्र त्यांनाही दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

या दोन्ही घटनांनी वासुदेव बळवंत गोगटे संतापले आणि त्यांनी आता याविरोधात काही पावलं उचलली पाहिजेत असं ठरवलं. यावेळेस महाराष्ट्राचे तत्कालीन गव्हर्नर होते, अर्नेस्ट होटसन.

 

gun point inmarathi
bingedaily.in

 

गोगट्यांनी एकट्यानंच हॉटसन याच्यावर गोळ्या झाडण्याचा कट रचला. गोगटेंनी एक एअर पिस्तुल मिळविलं आणि त्याचा सराव सुरू केला. वैयक्तिक खर्च कमी करून अत्यंत काटकसरित रहात त्यांनी पैसे जमा केले आणि ते हैद्राबादला गेले. तिथे त्यांनी दोन पिस्तुलं खरेदी केली. त्यानंतर ते संधीच्या शोधात राहिले, जेणेकरून हॉटसन त्यांच्या पिस्तुलाच्या टप्प्यात येईल आणि त्याचा वेध घेता येईल.

त्यांच्या महाविद्यालयाला भेट द्यायला वॉटसन साहेब  येणार असल्याची खबर त्यांना लागली आणि त्यांनी ताबडतोब वसतिगृहातील त्यांच्या खोलीतुन पिस्तुल लपवून आणलं.

 

libraray inmarathi
fergusson college

हे ही वाचा – इंग्रजांनी ‘मोस्ट डेंजरस मॅन’ ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलोय

हॉटसन ग्रंथालयालाही भेट देणार असल्याची माहिती त्यांनी काढली होती, त्यानुसार ते आधीच ग्रंथालयात जाऊन बसले. ग्रंथालयातून फ़िरता फ़िरता हॉट्सन त्यांच्या अगदी नजिक आणि फ़ैरीच्या टप्प्यात आला. गोगटेंनी लपविलेलं पिस्तूल काढलं आणि थेट समोरुन हॉट्सनवर दोन गोळ्या झाल्या.

पहिली गोळी झाडल्या झाडल्या हॉटसन सावध झाला. दुर्दैवाने हॉटसनच्या शर्टावरील धातूच्या बटनानं गोळी वाचविली आणि तो मरणाच्या अगदी दारातून परतला. दुसरी गोळी आल्याक्षणी त्यानं गोगटेंवर झडप घातली. गोगटे तोल जाऊन खुर्चीला अडखळून खाली पडले, हॉटसननं त्यांना जेरबंद केलं.

हॉटसनच्या अंगरक्षकानं तलवारीचं पातं गोगटेंच्या मानेवर ठेवलं आणि त्याच्याकडची दोन्ही पिस्तुलं जप्त केली. नंतर गोगटेंना हॉटसन समोर हजर करण्यात आलं तेंव्हा हॉटसननं त्यांना विचारलं की तु गोळी का झाडलीस? यावर गोगटेंनी निर्भयपणे सांगितलं की तुम्ही सोलापुरात जी दडपशाही केली त्याचा निशेध म्हणून मी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना बंदी बनवून फर्ग्युसनच्या ग्रंथालय इमारतीतून खाली आणलं. खाली विद्यार्थांचा जमाव उभा होता.

गोगटेंनी वंदे मातरमच्या घोषणा दिल्या आणि जमलेल्या तरुणांनी ही निडरपणे त्यांच्या घोषणांत आपला आवाज मिसळत वंदेमातरमच्या, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. वातावरण एकदम भारावून गेलेलं होतं. जमाव बेभान झाला होता. खाली आलेल्या हॉटसनवरही दगडफ़ेक झाली.

अखेरीस कसाबसा हॉटसन तिथून निघून गेला. त्यानंतर काहीकाळ ग्रंथालय बंद होतं मात्र नंतर जेव्हा ते उघडलं तेव्हा सर्व पुस्तकांवर गोगटे लायब्ररी लिहिलेलं आढळलं. भिंतीवर गोगटे जिंदाबाद लिहिलं होतं.

अवघ्या वीस वर्षांच्या गोगटेंना अटक होऊन त्यांच्यावर खटला चालू झाला, त्यांना आठ वर्षाचा कारावास झाला. यापैकी दोन वर्षं त्यांना आताच्या पाकिस्तानमधील आणि एक वर्ष कर्नाटकातील कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

कन्हैय्यालाल मुन्शिंचे आणि हॉटसनचे संबंध चांगले होते. त्यांच्या शिफ़ारसीनंतर हॉटसननं नंतर त्यांना शिक्षेत सवलत देऊन दोन वर्षांची शिक्षा कमी केली. इतकंच नाही तर त्यांना शंभर रुपये दिले आणि सांगितलं की माझा तुझ्यावर वैयक्तिक राग नाही.

 

jail inmarathi
Pinterest

 

गोगटेंनी नंतर आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि ते वकील झाले. गांधी हत्येनंतर उजव्या विचारसरणीचा सदस्य असल्या कारणानं पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. ते पुण्याचे महापौरही बनले. क्रांतिकारी नेते वासुदेव बळवंत फ़डके यांचं स्मारक उभं करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?