' मेहंदी मनासारखी रंगत नाहीये का? मग या १० मस्त टिप्स वापरुन बघाच – InMarathi

मेहंदी मनासारखी रंगत नाहीये का? मग या १० मस्त टिप्स वापरुन बघाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोणताही सण असो वा फंक्शन, मुली आणि महिलांना मेहंदी लागतेच. आपलीच मेहंदी सर्वात गडद कशी दिसेल या साठीही खूप सारे उपाय केले जातात. त्यात लग्न असेल तर मग मेहंदीचा रंग खुलायलाच हवा.

कोणताही महत्वाचा सण किंवा कार्यक्रम या मेहंदीशिवाय अपूर्ण वाटतो ना? लग्नसोहळयात तर नवीन साड्यांची सुळसुळ, गजर्‍याचा मंद सुवास आणि मेहंदीचा दरवळ सोहळ्याला चार चाँद लावतात.

 

mehndi inmarathi

 

हातावर गडद रंगलेली मेहंदी आणि तिचा दरवळ कार्यक्रमाची शोभा वाढवतो असे कोणी म्हणाले, तर ते अजिबात चुकीचे नाही.

लावण्यवतीचा रंग खुलवणारी मेहंदी अगदी पुरातन काळापासून स्त्रीच्या साजशृंगाराचे रंग खुलवत आली आहे. इजिप्तमध्येसुद्धा भारताप्रमाणेच हजारो वर्षांपूर्वी मेहंदीचा वापर होत होता.

स्त्रियांच्या साज शृंगारात मेहंदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवढी मेहंदी जरूरी तेवढाच तिचा खुललेला रंग सुद्धा महत्वाचा आहे बरं का! जिची मेहंदी जास्त रंगेल तिच्या पतीचे तिच्यावर तेवढे जास्त प्रेम असेल असेही म्हटले जाते म्हणून हा मेहंदीचा रंग जास्तीत जास्त गडद दिसावा म्हणून प्रयत्न केले जातात.

 

mehndi 1 inmarathi

 

रंगलेली मेहंदी नव्या नवरीचे सौंदर्य वाढवते. पण बरेचदा हातावरची ही मेहंदी गडद रंगावी यासाठी काय करावे हे माहीत नसते. हा गडद रंग कसा येईल यासाठी विविध उपाय आपण करून बघत असतो. पण काहीवेळा मेहंदी रंगत नाही आणि रंगाचा बेरंग होतो.

म्हणूनच या लेखात आपण पाहणार आहोत असे उपाय, जे तुमच्या मेहंदीला गडद बनवतील.

१. निलगिरीचं तेल

मेहंदी काढण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही तुमचे हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या हाताच्या तळव्यावर नीलगिरी तेल लावा अथवा तुम्ही मेहंदीच्या तेलाचाही प्रयोग करू शकता. यामुळे तुमच्या हातावरील मेंदी अधिक गडद होण्यास मदत मिळते.

 

nilgiri oil inmarathi

 

या तेलातील उष्ण गुणधर्मामुळे तुमची मेंदी जास्त गडद रंगते.

२. साखर पाणी

साखर पाण्यात लिंबाचा रस मिसळून तो मेहंदी काढून झाली की थोड्या थोड्या वेळाने मेहंदीवर लावावा.

 

mehndi suger 1 inmarathi

 

हा मेंदीला गडद रंग देणारा सर्वात जुना आणि पारंपारिक उपाय आहे. पण मेहंदी काढल्यावर फक्त दोन ते तीन वेळाच याचा वापर करावा.

३. लवंगांची धुरी

 

mehndi 2 inmarathi

 

मेहंदी गडद करणारा आणखी एक सिद्ध झालेला उपाय म्हणजे मेंदी काढलेल्या हातांना लवंगेच्या धूरावर शेकवणे. हो! लवंग धूर मेहंदीच्या रंगाला दीर्घकाळपर्यंत टिकवतो.

४.संयम बाळगा

मेहंदी लावल्यानंतर तुमचे काम थोडावेळ तरी बाजूला ठेवा. तुम्ही मेहंदी काढणार म्हणजे त्यामध्ये खूप वेळ जातो.

 

dipika inmarathi

 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहंदी हातावर काढल्यानंतर किमान ५ ते ६ तास तरी काढू नये. मेहंदीचा रंग हातावर व्यवस्थित उतरू द्यावा. मेंदीचा रंग तुम्हाला गडद हवा असेल तर तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे पाणी लागणार नाही याची काळजी घ्या तसेच मेंदी काढतानादेखील पाण्याचा वापर करू नका.

तुम्ही कोणत्याही कपड्याने अथवा हाताने खरवडून मेहंदी काढा. त्यासाठी पाण्याचा वापर केल्यास, तुमची मेहंदी गडद होणार नाही हे लक्षात घ्या.

५. चुन्याचा वापर

मेहंदी लावलेल्या हाताने तुम्ही जर मेहंदी काढल्यानंतर चुना रगडलात तर तुमच्या मेंदीला नक्कीच गडद रंग चढतो. चुन्यामध्ये अधिक उष्णता असल्यामुळे मेहंदीचा रंग यामुळे अधिक गडद होण्यास मदत मिळते. अर्थात या प्रयोग करण्यापुर्वी त्वचेची काळजी घ्या. संवेदनशील किंवा नाजूक त्वचा असणा-यांनी हा प्रयोग टाळा.

त्याचबरोबर विड्यामध्ये वापरला जाणार्‍या काताचे पानी मेहंदी भिजवण्यासाठी वापरले तरी मेहंदी गडद रंगते.

 

mehndi

 

६. नैसर्गिकरित्या मेहंदी वाळू द्या

मेहंदी सुकल्यावर तुम्ही झोपताना चादरीमध्ये हात गुंडाळून झोपा. याामुळे तुमच्या मेहंदीला अधिक उष्णता मिळते आणि तिचा रंग गडद होण्यासाठी मदत मिळते. हा सर्वात सोपा उपाय आहे. पण मेहंदी सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर अजिबात करू नका.

 

mendi
wedbook.in

 

मेहंदी नैसर्गिक स्वरूपातच सुकू द्यावी तरच त्याचा रंग हातावर व्यवस्थित चढू शकतो.

७. उष्णतावर्धक पदार्थ

हातावरची मेहंदी सुकली की त्यावर विक्स व्हेपोरब किंवा आयोडेक्स लावा. यामुळे उष्णता निर्माण होवून मेंदीचा रंग गडद होईल.

 

dark mehendi inmarathi

 

मेहंदी सुकली की तिला प्लॅस्टिक पेपर किंवा पिशवीने कव्हर करा. यासाठी तुम्ही हातमोजे सॉक्सदेखील वापरू शकता.

८. योग्य वेळेत मेहंदी काढा

 

mehendi inmarathi

 

मेहंदी लगेच रंगत नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस मेहंदी लावावी. तिचा रंग हा साधारण एक ते दोन दिवसाने चढायला सुरुवात होतो. मेहंदी लावून लगेच ती काढल्यास, तुम्हाला कधीही मेहंदीचा गडद रंग दिसू शकणार नाही.

१०. मेंदी काढताना बसण्यासाठी एखादी शांत किंवा कमी वर्दळ असलेली जागा निवडा तसेच सूर्यप्रकाशात बसणे टाळा

या उपायांबरोबरच आणखी काही छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची मेहंदी बराच काळ टिकायला आणि खुलून दिसायला मदतच होईल.

* मेहंदी लावण्यापूर्वी हातांना लोशन किंवा मोश्च्रायझर लावू नका किंवा हात तेलकट ठेवू नका. कारण या गोष्टी मेहंदीचा रंग गडद होण्यास अडथळा आणतात.
* मेहंदी काढायला सुरवात करण्यापुर्वी आंघोळ उरकून घ्या. अंघोळीने शरीरात ऊब तयार होते जी मेहंदी रंगायला मदत करते.
* मेहंदी काढल्यावर इतर कोणत्याही ब्युटी ट्रीटमेंट्स करू नका. त्या तुमच्या मेहंदीचा रंग फेंट करू शकतात.
* मेहंदी काढल्यावर तुमचे हात धुण्यासाठी साबण वापरू नका. त्यामुळे रंग फिकट होतो.

 

mehndi hand inmarathi

 

मेहंदी काढण्यासाठी आपण आपल्या आर्टिस्ट सोबत तासन्तास घालवतो तरी ती रंगेल की नाही याचे आपल्याला टेंशन असेल तर वर सुचवलेले काही उपाय ट्राय करून पहा आणि गडद रंगलेल्या मेहंदीकडे पाहत नक्की गुणगुणा “खुलविते मेहंदी माझा रंग गोरापान…”

तुम्हालाही माहीत असलेले काही युनिक उपाय आम्हाला कमेन्टबॉक्समध्ये जरूर कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?