आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
ऑगस्ट आला, की एका पाठोपाठ एक सण सुरु होतात. अगदी ऑगस्टच्या पहिल्या रविवारपासून विशेष दिवस आणि सणांना सुरुवात होतेच. आत्ताच १ ऑगस्टला फ्रेंडशिप डे होऊन गेलाय. दीप अमावस्या म्हणजे गटारी, नारळी पौर्णिमा, पतेती, मोहरम, जन्माष्टमी असे अनेक सण आपल्याला आपला उत्साह कायम ठेवून आनंदी राहण्याची आणि प्रत्येक दिवस साजरा करण्याची प्रेरणा देतात.
ऑगस्ट महिन्याचे फक्त काही ठराविक दिवसच साजरे केले जात नसून, ऑगस्टच्या प्रत्येक दिवसाचंच काही ना काही विशेष महत्त्व आहे.
ऑगस्ट महिन्यात इतके चित्र विचित्र दिनविशेष आहेत, की तुम्ही ते पाहून चक्रावून जाल. तुम्ही कधीच विचारही केला नसेल, की या कामासाठी सुद्धा एखादा संपूर्ण दिवस ठरवण्यात आला असू शकतो. कोणते आहेत ते दिवस आणि काय आहे त्यांचं दिनविशेष यावर जरा एक नजर टाकूया.
ऑगस्ट १० skyscraper appreciation day
एखादी उंच, आकाशाला भिडणारी इमारत पहिली, की आपण आपसूकच तिचं कौतुक करतो. पण, विशेषतः हे काम करण्यासाठी एक दिवसच नेमून देण्यात आलाय. मग तुम्ही कोणत्या इमारतीच कौतुक करणार? बुर्ज खलिफा की आपल्या वरळीतील Palais Royale?
ऑगस्ट १२ – Sewing Machine Day, World Elephant Day, Milkman Day
या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा दिवस नेमलेले आहेत! शेवटी एक दिवस सगळ्यांचाच सन्मान करायला हवा नाही? सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात ज्या चहापासून होते तो दुधापासून बनतो, कपडे शिलाई मशीनने शिवले जातात आणि हत्ती? ती निसर्गाची एक रचना म्हणून. सगळ्यांनाच योग्य सन्मान मिळालायलाच हवा.
ऑगस्ट १३
International Left Hander’s Day
जे डाव्या हाताचा वापर करतात, म्हणजेच डावखोरे आहेत त्यांच्यासाठी जरा आपला swag दाखवण्याचा एक दिवस. आता कोणीच तुम्हाला तुमच्या डाव्या हाताच्या वापरामुळे बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही. उलट एक पूर्ण दिवस तुमच्या नावावर आहे.
Blame Someone Else Day
चला सगळ्यांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घ्या. जितकीही पापं, चुका केल्या असतील त्या दुसऱ्यांच्या माथी तुम्ही या दिवशी मारू शकता. आज तो सब जायज है.
Shop Online for Groceries Day
shopaholics एक दिवस तुमच्यासाठी पण! रोज तुम्हाला शॉपिंग करून गिल्ट येत असेल, लोक बोलत असतील पण या दिवशी सगळं माफ असतं हो. तसा तर आपल्याला ऑनलाइन शॉपिंग करायला कोणताही दिवस लागत नाही, पण खास त्यासाठीच एक दिवस ठरवलेला असेल तर मग कशाला थांबवायचं स्वतःला?
ऑगस्ट १४ – middle child day
घरात २ पेक्षा अधिक भावंडं असली, की मोठ्याचे मोठा म्हणून, आणि लहानाचे लहान म्हणून फार लाड केले जातात. पण बिचाऱ्या मधल्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. पण काळजी नको, स्पेशली तुमच्यासाठी हा दिवस राखून ठेवलाय. तेव्हा, पूर्ण टशनने आईला तुमच्यासाठी खास बेत करायला लावा. आणि जस्ट चिल!!!
ऑगस्ट १६ – Rollercoaster Day and Rum Day
याबद्दल विशेष काय सांगणार? रोलर कोस्टरचा एक राऊंड करून, एक रमचा पेग मारा! इतर दिवशी तरी तुम्हाला लोक मद्यपान केल्याबद्दल बोलतील. पण या दिवशी कोणीच काहीच नाही म्हणू शकणार. क्यू कि बॉस, दिन ही rum का है!
===
हे ही वाचा – इंग्रजी इतिहासातील चमत्कारिक वर्ष, २ सप्टेंबरला झोपलेली लोकं १४ सप्टेंबरला उठली
===
ऑगस्ट १७
Meaning of ‘is’ Day
नक्की “is” आणि या सारख्या अनेक निरर्थक गोष्टींचा अर्थ शोधू शकता. म्हणजे पूर्णपणे तुमच्यावर आहे ते.
Black Cat Appreciation Day
काही काला जादू वगैरे काही नसतं हो. माऊ ही माऊ असते, काळी पांढरी सगळी सारखीच गोड असते.
I Love My Feet Day
चेहरा, पोट, हात, ओठ, डोळे यांना तर छान म्हणतोच, या दिवशी जरा पायांचं सुद्धा कौतुक करूया.
ऑगस्ट १८ – bad poetry day
पावसाळ्यातील कवींचा दिवस. बस, बाकी सगळेच थोडी शेक्सपियर, व. पू. असतात, नाही का…!!
august २० world mosquito day, men’s grooming day
खबरदार!!! २० तारखेला कोणीच आपल्या घरात ऑल आऊट लावणार नाही. सगळे डासाचं गोडधोड करून स्वागत करतील आणि त्यांना अजिबात हाकलणार नाही. कारण तो दिवस त्यांचा आहे बाबा. सगळ्यांचा आदर करायलाच हवा. आणि याच बरोबर घरातील पुरुषमंडळी, आरशासमोर २-४ तास घालवतील, कारण त्यांनी सुद्धा माहिलांसारखं presentable राहणं शिकायला हवं.
ऑगस्ट २४ – International Strange Music Day, Pluto Demoted Day, Knife Day
या दिवशी सगळे बाथरूम सिंगर्स, सुरीची पूजा करत करत प्लूटो हा कसा ग्रह राहिला नाही याच्या कहाणीचं पठाण करतील आणि सगळ्या श्रोत्यांना त्यांचं गायन, वादन ऐकून घ्यावंच लागेल. सगळ्यांना आशीर्वादच, आशीर्वाद मिळेल.
ऑगस्ट २६
Dog Day
पाळीव किंवा बेवारस आज सगळ्याच श्वानांचा आदर करूया. त्यांना खायला प्यायला देऊन, गोंजारून, कधीही त्यांना त्रास देणार नाही, प्राण्यांप्रति कृरतेचा विरोध करू, हे वचन त्यांना देऊया.
Toilet Paper Day
हो, हा पण दिवस असतो, पण आपल्याकडे बदली आणि पाण्याचा दिवस असायला हवा नाही?!
ऑगस्ट ३१ – Matchmaker Day
या व्यक्तींचा कितीही राग येत असला, तरीही एक दिवस यांना कोणीही काहीच बोलू नका. तो त्यांचा दिवस आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.