Site icon InMarathi

पुन्हा एकदा सिद्ध झाले – आर्मी नेहमी डिलिव्हर करते; जय हिंद!

Neeraj Chopra in Army INMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पाच वर्षांपूर्वी, २०१६मध्ये, जेव्हा आम्हाला अॅथलेटिक्समध्ये पदकाची आशा नव्हती, भारतीय सैन्याने सुरुवात केली मिशन ऑलिम्पिक २०२० साठी!

नेहमीप्रमाणे बरेच लोक हसले…
लष्कराने संभाव्य मुलांना ओळखले, त्यांना रोजगार दिला आणि उत्तम आहार, प्रशिक्षक, पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन दिले. आणि हळू हळू मेहेनतीला फळं येऊ लागली…
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकल्यानंतर सुभेदार नीरज चोप्रा आपल्या वर्तमान रँकवर पोहोचले.
आज, ०७ ऑगस्ट २०२१ रोजी सुभेदार नीरज आणि भारतीय लष्कराने त्यांचे वचन पूर्ण केले; भारत राष्ट्राला प्रथमच अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक!
(भारताला भाला फेकीत पहिले गोल्ड मेडल जिंकून देणारे नीरज चोपडा हे पानिपत युद्धाच्या वेळी दिल्लीच्या रक्षणासाठी गेलेल्या आणि अब्दाली गेल्यानंतर तिथेच राहिलेल्या मराठा योद्ध्यांचा वंशज आहे.दिल्लीच्या जवळच पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र, आणि काही प्रमाणात जींद जिल्ह्यात मराठा समाज वसलेला आहे. यमुनेच्या काठावरील सुपीक जमीन त्यावेळी महाराष्ट्र सोडून तिकडे गेलेल्या मराठ्यांनी समृद्ध केली आहे ती आपल्या आपल्या रक्ताने आणि घामाने.

त्यांना आज रोड मराठा म्हणून ओळखले जाते. त्यांनी आजही आपली संस्कृती जपून ठेवली आहे. फक्त भाषा तेवढी हरियांवी किंवा हिंदी झाली आहे.)

पुन्हा एकदा सिद्ध झाले – आर्मी नेहमी डिलिव्हर करते.
आज आहे भारतातील प्रत्येक सैनिक आणि नागरिकासाठी अभिमानाचा क्षण!
इनमराठी परिवारातर्फे समस्त देश बांधवांचे हार्दिक अभिनंदन!
जय हिंद!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version