Site icon InMarathi

करन्सी म्हणून चक्क प्लॅस्टिकच्या नोटा! ऐकावं ते नवलच!

plastic money im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता भारतामध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची तयारी भारत सरकारने सुरु केली.

भारतात या प्लास्टिकच्या नोटांचे युग सुरु होईल तेव्हा होईल, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगभरातील काही देशांनी या पूर्वीच प्लास्टिकचे चलन अंमलात आणले आहे. चला जाणून घेऊया या क्रांतिकारी देशांबद्दल!

ऑस्ट्रेलिया

 

जगात सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया देशाने प्लास्टिकचे चलन वापराला सुरुवात केली होती. १९९६ साली ऑस्ट्रेलियाने हा निर्णय जाहीर केल्यावर आर्थिक जगतात खळबळ माजली होती. तेव्हापासून संपूर्ण ऑस्ट्रेलिया भर प्लास्टिकचे चलन वापरले जाते.

 

पापुआ न्यू गिनी

 

‘किना’ हे पापुआ न्यू गिनी या देशाचं चलन आहे. दोन किनाच्या नोटा पापुआ न्यू गिनीने १९९१ मध्ये चलनात आणल्या. त्याला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून २००८ पासून तेथील सरकारने सगळंच चलन हे प्लास्टिकमध्ये आणलं.

 

ब्रुनेई

ब्रुनेई या इस्लामिक देशानेसुद्धा १९९६ मध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरायला सुरुवात केली. त्यावेळी पहिल्यांदा प्लास्टिकच्या कमी किमतीच्या नोटांपासून सुरुवात झाली. तर २००७ पासून या देशात सर्वच नोटा या प्लास्टिकच्याच वापरल्या जातात.

 

न्यूझीलंड

 

न्यूझीलंड या देशाचं चलन आहे न्यूझीलंड डॉलर. एक आधुनिक देश असूनही या देशानं १९९९ पर्यंत कधीही प्लास्टिकच्या चलनाचा विचार केलेला नव्हता.

१९९९ च्या मध्यात न्यूझिलंडने २० न्यूझीलंड डॉलरची नोट चलनात आणली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पासून रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंडने केवळ बारा महिन्यांतच आपलं संपूर्ण चलन हे प्लास्टिकमध्ये बदललं.

 

रोमानिया

 

रोमानिया हा प्लास्टिकचं चलन वापरायला सुरुवात करणारा पहिला युरोपिय देश ठरला. रोमानियाच्या चलनाला रिऊ म्हणतात. १९९९ ते २००१ अशा तीन वर्षात कागदी चलन रद्द करून प्लॅस्टिकचं चलन वापरायला सुरुवात केली.

 

व्हिएतनाम

व्हिएतनामच्या चलनाला डाँग म्हणतात. व्हिएतनाम हा असा देश आहे तो कित्येक दशकं युद्धाच्या छायेत राहिला, पण निर्णय घेतल्यानंतर तीन वर्षात व्हिएतनामने आपलं कागदी चलन हे बंद केलं आणि आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली. तीन वर्षात या देशाने आपलं चलन बदललं.

आता लवकरच या देशांच्या यादीमध्ये भारताच नाव जोडलं जाईल.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version