फोनवर असलेले UPI अकाउंट्स ब्लॉक करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आजच्या काळात मोबाईल फोन हे फ़क्त संपर्क साधन राहिले नसुन ते आता आपले पाकीट, पैशाची देवाण घेवाण करण्याचे आणि इतर महत्वाची माहिती साठवण्याचा सर्वात महत्वाचे साधन बनले आहे. अशा परिस्थितीत जर फोन चोरीला गेला तर आपली महत्त्वाची माहिती गमवण्याची किंवा आपल्या फोनमध्ये असलेल्या बँकिंग अॅप्स व पेमेंट अॅप्सचा दुरुपयोग होण्याची व बँकेतुन पैसे जाण्याची भिती मनात असते.
भारतात पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अन्य अॅप्स सारख्या यूपीआय सेवा ही आपली सवय आणि गरज बनली आहे. सध्या रस्त्याकडेच्या भाजीविक्रेत्या पासुन ते मोठ्या दुकानांंमध्ये या पेमेंट अॅप्स मधुन पैसे स्विकारले जातात. या अॅप्समुळे पैशाची देवाण घेवाण सहज रीतीने होत असल्यामुळे बरेच लोक हे वापरतात.
बर्याच वापरकर्त्याच्या फोनमध्ये यापैकी किमान एकतरी अॅप असतेच. अशा परिस्थितीत आपले डिव्हाइस जर चोरीस गेले असेल किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात फ़ोन गेल्यास किंवा तसा काही धोका असल्यास कोण तरी त्यात प्रवेश करून त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असल्यास काही घाबरण्याची गरज नाही आहे, गैरवापर होण्याआधीच तुम्ही ते रोखु शकतात. ते कसे करायचे व त्याची प्रक्रिया काय हे सर्व आपण या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत.
–
हे ही वाचा – ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात
–
सहसा हे अॅप्स पासवर्डनी सुरक्षित केले असतात तरी तुम्ही ते अॅप्स ब्लॉक करुन कोणता ही गैरवापर होण्यापासुन वाचवु शकतात.
या लेखात आपल्याला आपण या यूपीआय सेवा पुरविणार्या अॅप्सना कसे ब्लॉक करू शकता याची संपुर्ण माहिती मिळेल. कशा प्रकारे आपण आपली यूपीआय खाती सुरक्षित ठेवू शकता आणि आपले पैसे त्यातून निघून जातील याची काळजी आता करण्याची गरज नाही.
पेटीएम खाते तात्पुरते कसे ब्लॉक करावे :
पेटीएम पेमेंट्स हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.
– हरवलेल्या फोनसाठी पर्याय निवडा. भिन्न नंबर नोंदवण्यासाठी पर्याय निवडा आणि आपला गमावलेला फोन नंबर तेथे नोंदवा.
-सर्व डिव्हाइसमधून लॉग आउट करण्यासाठी निवडा.
-पुढील पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 मदत निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा.
– रिपोर्ट फ्रॉड हा पर्याय निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा.
पुढील, कोणत्याही मुद्यावर क्लिक करा आणि नंतर तळाशी असलेल्या मेसेज अस या बटणावर क्लिक करा.
-तुम्हाला अकाउंट हँडलरचा एक पुरावा सादर करावा लागेल. पुराव्यासाठी पेटीएम खात्यातील व्यवहार असलेले डेबिट / क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, कन्फर्मेशन ईमेल किंवा पेटीएम खात्याच्या व्यवहारासाठी एसएमएस, फोन नंबर मालकीचा पुरावा किंवा हरवलेल्या किंवा पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्राराची प्रत यापेकी एकदा पुरावा चालेले.
– वरील सर्व प्रक्रीया पुर्ण झाल्यावर पेटीएम आपले खाते प्रमाणित करेल आणि मग ब्लॉक करेल, त्यानंतर आपल्याला एक कन्फर्मेशन संदेश प्राप्त होईल.
आपला हँडसेट हरवल्यास गुगल पे खाते कसे ब्लॉक करावे :
-गुगल पे वापरकर्ते हेल्पलाइन नंबर १८००४१९०१५७ वर कॉल करू शकतात आणि आपल्या हवी असलेली भाषा निवडू शकतात.
– इतर समस्यांसाठी असेला पर्याय निवडा.
-आपल्याला गुगल प्ले अकाऊंटला ब्लॉक करण्यात मदत करणा -या तज्ञाशी बोलण्याचा पर्याय निवडा.
– त्या व्यतिरिकत्त, अँड्रॉइड वापरकर्ते गुगल च्या वेबसाईट वरुन त्यांचे अकाउंटचा वापरुन त्यांचा डेटा डीलिट करुन टाकू शकतात जेणेकरून फोनवरून कोणीही तुमच्या गुगल खात्यात प्रवेश करू शकत नाही आणि गूगल पे अॅप कोणी वापरु शकणार नाही..
– त्याचप्रमाणे iOS वापरकर्ते अॅप्पलच्या वेबसाईटवरुन त्यांचा डेटा मिटवून हे करू शकतात.
फोन पे चे खाते कसे ब्लॉक करावे :
-फोन पे वापरकर्त्यांना 08068727374 किंवा 02268727374 वर कॉल करावा लागेल.
तुम्हाला हवी असेलेली भाषा निवडल्यानंतर, तुम्हाल आपल्या फोन पे खात्यात समस्या नोंदवायची असल्यास त्या पर्यायाचा नंबर दाबा असे विचारले जाईल.
-नोंदणीकृत क्रमांक द्यावा लागेल आणि आपल्याला कन्फर्मेशनसाठी ओटीपी पाठविला जाईल.
– नंतर ओटीपी न मिळाल्याचा पर्याय निवडा.
-सिम किंवा डिव्हाइस गमावल्याचा रीपोर्ट करण्यासाठी तुम्हाला एक पर्याय देण्यात येईल, तो निवडा.
– त्यानंतर आपण एखाद्या प्रतिनिधीशी संपर्क साधला जाईल जो आपल्याला फोन पे खाते ब्लॉक करण्यास मदत करेल. तुम्हाला त्यांना फोन नंबर, ईमेल आयडी, शेवटची देय रक्कम, शेवटच्या व्यवहाराचे मूल्य इत्यादी माहिती द्यावी लागेल व त्यानंतर तुमचे फोन पे खाते ब्लॉक होईल.
वरील दिलेली संपुर्ण प्रक्रियेत काही अडचण आल्यास व तुमची यूपीआय खाती ब्लॉक न झाल्यास आपल्या बँकेशी संपर्क साधावा व तेथे आपली तक्रार नोंदवावी. तुमच्या बँकेच्या वेबसाईट वरुन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन ही तुम्ही आपली यूपीआय खाती ब्लॉक करु शकतात.
यूपीआय खाती ब्लॉक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, फोन हरवल्या नंतर शक्य तितक्या लवकर ती खाती ब्लॉक केल्यास त्यांचा गैरवापर होण्यापासुन वाचवु शकतात व तुमचे पैसे सुरक्षित राहु शकतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.