' पाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा!) होणार? – InMarathi

पाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा!) होणार?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पाकिस्तानचा बंदोबस्त कधी होणार ? या प्रश्नाचे उत्तर देणारा माईचा लाल / भगवा/ निळा या देशात अजून पैदा व्हायचा आहे. अर्थात लाल, भगवा, निळा हे पाकिस्तानचा बंदोबस्त करू शकतील असं वाटत नाही. त्यासाठी तिरंगा डोक्यात असलेलाच आवश्यक आहे आणि तो आत्ता तरी अस्तित्वात नाही. एवढुश्या पाकिस्तानची भारताच्या कुरापती काढायची हिम्मत होते आणि आमचे नेते कडी निंदा करतात आणि पुन्हा गाढ झोपून जातात. आमचे आधीचे राज्यकर्ते नेभळट होते म्हणून नवीन निवडून दिले तर तेही त्याच तोडीचे निघाले हे विशेष.

modi-sharrif-marathipizza
samaa.tv

सैनिक युद्धात हुतात्मा होतात. दोन्हीकडचे होतात, पण आमच्या सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना होते त्याचा आमच्या राज्यकर्त्यांना विशेष राग येत नाही. त्यांच्या दृष्टीने ये भी चलता है. बरं हे अनेकवेळा झालंय तरी लाज नाही राज्यकर्त्यांन. मी आणि माझ्यासारखे दोन्ही सरकारना धारेवर धरतात, पण प्रत्येकवेळी त्या त्या सरकारचे पाठीराखे आम्हाला राजनीती वैगेरे समजावून सांगतात. म्हणजे आधीच्यांना धारेवर धरताना जे पाठीमागे उभे होते आणि खांद्याला खांदा लावून सरकारचा निषेध करीत होते, ते आता फारच प्रगल्भ वैगेरे भूमिका मांडताना दिसतात. आमच्यासाठी मात्र दोन्ही सरकारे वांझोटीच … राजनीती कसली ? एका सैनिकाची विटंबना झाल्यावर पाकिस्तानची तंतरवणारी राजनीती तर नाही ना ही ? मग कसली राजनीती ? राजनीती असती तर पुढे जाऊन पाकिस्तानची हिम्मतच झाली नसती. थोडक्यात काय तर ही राजनीती वगैरे काहीही नाहीये माझ्या मते.

पुन्हा यावर यांचे उपाय पण लई भारी असतात आणि आम्ही भावनिक होऊन त्याच्या पाठीशी उभे राहतो. म्हणजे मी नाही पण \ नाईलाजाने…गप्प राहून उभे राहावे लागते, नाहीतर तुम्ही देशद्रोही वगैरे ठरता. यांचे उपाय म्हणजे पाकिस्तानी खेळाडूंना विरोध… पाकिस्तानी कलाकारांना विरोध… बास!!!… यावेळी मात्र जरा नवीन आहे… पन्नास पाकिस्तानी विद्यार्थ्यांना परत पाठवलंय … ही यांची बोडक्याची राजनीती… याने काय होणार ?

bjp-marathipizza
indianexpress.com

अरे येऊ देत त्यांना भारतात .. बघू देत भारत… भारतावर अवलंबून होऊ देत जरा त्यांचे शिक्षण क्षेत्र, चित्रपट क्षेत्र… त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कण्याला भारताचा आधार मिळू देत की जरा. हे शीत युद्ध आहे… वेगळं आहे… मैदानावरचे युद्ध वेगळे… त्याला याच्याशी जोडू नका… ते ही कडक चालू राहू देत… अगदी तुंबळ युद्ध होऊ देत एकदा… आणि थेट होऊ देत… म्हणजे बांगलादेश साठी झालं तसं नको. सध्या भारताने युद्ध केलं तर ते बलुचिस्तान साठी होईल की काय असं वाटतंय. त्याचा भारताला काय उपयोग? भारताला उपयोग होईल असं युद्ध करा की जरा… जतीन देसाई यांचा उद्देश खरच प्रामाणिक आहे. खरंतर ते ही एक शीत युद्ध लढत आहेत, पण समजून कोण घेतो… छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीचा वापर केला आहे. एकाचवेळी एकीकडे औरंगजेबाला आदिलशहाच्या तावडीतून सोडवले आणि दुसरीकडे त्याच्याच राज्याचा भाग असलेल्या जुन्नरवर देखील हल्ला केला. अरे हो… पण एवढे छत्रपती कोण अभ्यासणार ? आम्हाला त्यांच्या युद्धनीतीपेक्षा त्यांच्या स्मारकाच्या उंचीची काळजी.

एकतर पाकिस्तानवर प्रचंड मोठा हल्ला करून, पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत करून पाकिस्तानचा प्रश्न सोडवता येईल किंवा पाकिस्तानबरोबर शीत युद्ध खेळून, त्यांची अर्थव्यवस्था भारतावर अवलंबित करून पाकिस्तानला नेस्तनाबूत करता येईल.

india-pakistan-marathipizza
emergingequity.org

पण आम्ही दोन्हीही करत नाही. पाकिस्तानशी युद्ध न केल्यामुळे तो आमच्या कुरापती काढतो आहे, तसेच त्याच्या अवलंबित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला देशाबाहेर काढून आम्ही चीन सारख्या देशाला पाकिस्तानची अर्थव्यवस्था आंदण देत आहोत. थोडक्यात काय तर आम्ही सपशेल फेल आहोत आणि हीच ती आमची सरकारच्या पाठीराख्यांच्या दृष्टीने प्रगल्भ अशी राजनीती आणि आमच्या दृष्टीने प्रचंड नादान राजनीती आहे…..जय हिंद!

हे देखील वाचा: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग १)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?