आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
करोडो रुपये खर्च करून बॉलीवूडमध्ये वर्षाला कित्येक सिनेमे बनवलले जातात, गेल्यावर्षीपासून आलेल्या कोरोनामुळे सिनेमागृह बंद आहेत त्यामुळे निर्मात्यांनी आपला मोर्चा थेट ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला. सिनेमा बनवताना अनेकांचे पैसे अडकलेले असतात निदान ते तरी वसूल व्हायला हवेत.
सिनेमा बनवणं खरं तर महादिव्यच, तंत्रज्ञ, कलाकार, संगीतकार, अशा अनेक लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारा सिनेमाचा कप्तान म्हणजे दिग्दर्शक. आज बॉलीवूडमध्ये अनेक नावाजलेले दिग्दर्शक होऊन गेले आहेत ज्यांनी अजरामर कलाकृती बनवल्या आहेत.
आज सिनेमा बनवताना अनेकदा कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात एखाद्या सीनवरून किंवा गाण्यावरून वाद होत असतात. कलाकार काहीतरी आपल्या सूचना देत असतात त्या दिग्दर्शकाला पटायला हव्यात, दिग्दर्शकांच्या काही सूचना कलाकाराला पटायला हव्यात सगळी तारेवरची कसरत असते.
काही कलाकार दिग्दर्शकाला गुरु मानून तो म्हणेल तसेच काम करतात मात्र सलमान सारखे अभिनेते हे आपल्या तालावर दिग्दर्शकाला नाचवणारे असतात त्यातच तो जर नवखा दिग्दर्शक असेल तर त्याला फारच कठीण जाते.
सेटवर उशिरा येणे, आपल्याला हवा तसाच डान्स करणे, रिटेक्स न देणे या गोष्टीत माहीर असलेला आपला सल्लू भाई मात्र भावाच्या एका वाक्यवार शर्ट काढायला तयार झाला. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात
प्यार किया तो डरना क्या? हा सिनेमा आठवतो का? ९० च दशक संपत असताना हा सिनेमा रिलीज झाला होता. सलमान शाहरुख आणि आमिर या तिन्ही खान मंडळींनी एकमेकांना टक्कर देणारे सिनेमे काढत होते.
–
हे ही वाचा – केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!
–
सलमानने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान तर निर्माण केलेच मात्र आपल्या भावांसाठी देखील जागा निर्माण करायला सुरवात केली होती. सलमानच्या धाकट्या भावाने दिग्दर्शनात पाऊल ठेवले तर दुसरा भाऊ अरबाजने अभिनयात. या तिन्ही भावांनी पहिल्यांदाच एका सिनेमासाठी काम केले होते.
गावातील मुलगी शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेते तिथेच एका मुलाच्या प्रेमात पडते आणि मग तिथून हिरोची प्रेमासाठीची खरी परीक्षा सुरु होते. सलमान यात एका श्रीमंत घरातील मुलगा दाखवला गेला आहे, हिरोची एंट्री दमदार व्हावी म्हणून एक गाणे तयार करण्यात आले जे अनेक निर्मात्यांना त्यावेळी आवडले नव्हते. जे गाणं आजही हिट आहे ते म्हणजे ओ ओ जाने जाना
सलमाननेच याबद्दल एका मुलाखतीत सांगितले की, ‘हे गाणे मुळात या सिनेमात घेणारच नव्हते ‘जब प्यार किसीसे होता हैं’ या सिनेमात घ्यायचे ठरले होते. मात्र निर्मात्यांनी हे गाणे नाकारले होते’. सलमान पुढे म्हणाला होता की मला हे गाणे खूप आवडले म्हणून आपल्याच घरच्या सिनेमात वापरूयात.
आता मुद्दा होता की त्या गाण्याच्या शूटिंगचा आधीच या गाण्याला अनेक निर्मात्यांनी नाकारले होते त्यामुळे एक प्रकाराची पनवती लागली होती, कारण गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सलमानला घालण्यासाठी आणलेला एक ही शर्ट साइजमध्ये बसत नव्हता. शूटिंग तर करायचे होते अशावेळी भावातला दिग्दर्शक जागा झाला आणि त्याने सलमान थेट शर्ट न घालता शूटिंग करायला सांगितले.
सलमानने कुठलीही आडकाठी न घेता गाण्याचे शूटिंग पूर्ण केले आणि इतिहास घडला. या गाण्याने हिरोचा शर्ट काढणे हा नवीनच ट्रेंड चालू झाला. आज सलमाचा सिनेमा बघताना त्याचे फॅन्स अख्ख्या सिनेमापेक्षा तो शर्ट कधी काढतोय याची वाट बघत असतात.
आपण अनेक सिनेमांचे किस्से ऐकत असतो, अगदी अजरामर शोलेसारखा सिनेमाचे किस्से तर खुद्द महागुरू सचिनजींनी सांगितले आहेत. आमिरसारखा अभिनेता सिनेमात काम करताना प्रत्येक बाबतीत ढवळाढवळ करतो असे बोलले जाते. शेवटी दिग्दर्शकाला नेमकं काय अपेक्षित आहे आणि निर्माता आपले पैसे कसे वसूल होतील या दोन्हीमध्ये सिनेमाची कथा भरडली जाते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.