१० वादग्रस्त एन्काऊंटर्स ज्यावर सर्वांच्या मनात कायमचं प्रश्नचिन्ह आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एन्काऊंटर हे एक असं धाडसी काम आहे जिथे तो पोलिसांची समयसूचकता, जबाबदारी, कायदा आणि निशाणा हे सर्वच पणाला लागलेलं असतं. एक योग्य एन्काऊंटर पोलिसांना शाबासकी, पुरस्कार मिळवून देऊ शकतो, आणि एखाद्या एन्काऊंटरमुळे पोलिसांची नोकरी सुद्धा जाऊ शकते.
सिनेमात दाखवलेल्या एन्काऊंटरनंतर जसं पोलिसांचं फक्त कौतुक होतं, तसं प्रत्यक्षात होत नसतं. काही एन्काऊंटर असे पण असतात जिथे पोलिसांच्या निर्णयावर, नैतिकतेवर शंका घेतली जाते.
गुन्हेगार व्यक्तीसोबत असलेल्या पूर्व वैमनस्यातून ही कृती करण्यात आली असावी अशी संशयाची सुई पोलिसांभोवती सतत फिरत असते. पोलिसाचा वर्दी एकदा परिधान केला की, पोलिसांना या सर्व गोष्टींसाठी स्वतःला तयार करावं लागत असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
भारतीय पोलिसांकडून झालेल्या अशा १० एन्काऊंटरची माहिती देत आहोत त्यानंतर पोलिसांना कौतुकापेक्षा मीडियाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं :
१. विकास दुबे, उत्तरप्रदेश : (२०२०)
गँगस्टर विकास दुबे आणि त्याच्या ५ सहकाऱ्यांवर कानपुर पोलीस स्टेशनमधील ८ पोलिसांचा खून करण्याचा आरोप होता. जुलै २०२० मध्ये विकास दुबेचा आणि त्याच्या पाचही साथीदारांचा एन्काऊंटर करण्यात आला.
पोलिसांना याबाबत विचारल्यावर त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की, “विकास दुबे हा पोलिसांची पिस्तुल घेऊन पळून जात होता. त्याला मारण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.”
–
हे ही वाचा – गुन्हेगारी विश्व ढवळून काढणाऱ्या विकास दुबेची खरी काळीकुट्ट बाजू!
–
एका आठवड्यानंतर त्याच्या ५ सहकाऱ्यांना सुद्धा याच पद्धतीने मारण्यात आलं. पोलिसांनी तेच उत्तर दिलं आणि प्रकरण तिथेच संपलं.
विकास दुबे याचे काही वरिष्ठ राजकीय लोकांसोबत घनिष्ठ संबंध आहेत, त्याच्यावरील खटला कित्येक वर्ष सुरू राहिला असता, म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं असावं असं मत स्थानिक वृत्तपत्रांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं.
२. हैद्राबाद – बलात्कार आरोपी (२०१९) :
२७ नोव्हेंबर २०१९ रोजी हैद्राबाद मध्ये एका २६ वर्षीय जनावरांच्या डॉक्टरवर चार नराधमांनी अमानुष बलात्कार आणि खून केला होता. पोलिसांनी २ दिवसात या प्रकरणाचा छडा लावला आणि २ आरोपी ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या २ सहकाऱ्यांना अटक केली होती. हे चौघेही जण त्यांच्या वयाच्या विशीतले होते.
७ डिसेंबर २०१९ रोजी जिथे बलात्काराची घटना घडली तिथेच नेऊन या चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता. दहा दिवसांतच या गुन्ह्याचा निकाल लागला होता.
पीडित मुलीला वेळेत न्याय मिळाल्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक झालं होतं.
पोलिसांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, “पुढील तपास करण्यासाठी आम्ही आरोपीना घटनास्थळी नेलं होतं, तेव्हा ते रायफल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्हाला त्यांचा एन्काऊंटर करावा लागला.”
एन्काऊंटर चं कौतुक होणं हे आपल्या सुस्त न्याय प्रक्रियेचं प्रतिक आहे हे सुद्धा त्यावेळी बोललं गेलं होतं.
३. भोपाळ जेल – (२०१६) :
३१ ऑक्टोबर २०१६ रोजी ८ आरोपी हे भोपाळ जेल तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. शहराच्या हिललॉक या ठिकाणी या सर्व आरोपींचा एन्काऊंटर करून खात्मा करण्यात आला.
हे ८ आरोपी इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाचे बंदी घातलेले आरोपी होते. त्यांच्या मृत्यूने काही सामाजिक संघटनांनी या एन्काऊंटरच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
जून २०१८ मध्ये सीबीआयने सखोल चौकशी करून पोलिसांना क्लीन चीट दिली होती. गुन्हेगार पोलिसांवर हमला करू पाहत होते, असं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.
४. आंध्रप्रदेश – २० चंदन तस्कर – २०१५ :
लाल चंदन ज्याचा वापर हा औषधी आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी होत असतो ते चोरून विकणाऱ्या २० लाकूडतोड्या व्यक्तींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. तामिळनाडूमधून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.
पोलिसांनी चौकशी अंती असं सांगितलं की, “१०० लोक हे आमच्यावर चाकू, कोयता घेऊन हल्ला करायला आले होते. आम्ही त्यांना फक्त प्रत्युत्तर दिलं आहे.”
५. वारंगल ऍसिड अटॅकर्स – २००८ :
दोन इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनींवर त्यावेळी आंध्रप्रदेशमध्ये असलेल्या वारंगल मध्ये ऍसिड अटॅक करण्यात आला होता. या गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एकाने गुन्ह्याची आणि या घटनेचं नियोजन करण्याची कबुली दिली होती.
त्याच दिवशी या तिन्ही आरोपींचा शहरा बाहेर गेल्यावर पोलिसांवर हल्ला करण्याच्या आरोपात एन्काऊंटर करण्यात आला.
६. अहमदाबाद – इशरत जहान – २००४ :
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचून आलेल्या लष्कर-ए-तैबाच्या इशरत जहान आणि इतर ३ आरोपींचा अहमदाबादच्या बाहेर नेऊन एन्काऊंटर करण्यात आला होता.
गुजरात हायकोर्ट च्या अखत्यारीत येणाऱ्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम (SIT) ने या प्रकरणाची चौकशी करून प्रकरण सीबीआयच्या हवाले केलं होतं.
काही पोलिसांवर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. २०१८ मध्ये लागलेल्या निकालात पोलिसांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
७. मुंबई पोलीस – २००६ :
छोटा राजन गॅंगच्या टोळीचा सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखन भैय्याचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. लखन भैय्याच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती.
२०१३ मध्ये या केसचा निकाल लागला आणि १३ पोलिसांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पोलिसांना दोषी ठरवण्याची ही एक दुर्मिळ घटना होती.
८. मणिपूर – २०१० :
१ सप्टेंबर २०१० रोजी मणिपूर पोलीसने रतनकुमार या आरोपीचा एन्काऊंटर केला होता. मणिपूर पोलिसांवर तोपर्यंत एकूण १५०० लोकांचा एन्काऊंटर करण्याची नोंद होती. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून मे २०१९ मध्ये पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
फेब्रुवारी २०२० मध्ये आपल्यावरील आरोप मान्य करून पोलिसांनी इंफाळ च्या चीफ ज्युडीशीयल समोर शरणागती पत्करली होती.
९. तामिळनाडू – विरप्पन – २००४ :
चंदन तस्करी, हस्तिदंत अवैध विक्री आणि लोकांकडून खंडणी गोळा करण्याच्या आरोपात कुप्रसिद्ध असलेल्या विरप्पन चा तामिळनाडू च्या स्पेशल टास्क फोर्स ने एन्काऊंटर करून निकाल लावला होता.
आपल्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी विरप्पन हा एका हॉस्पिटलमध्ये जाणार आहे अशी पक्की बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली होती.
स्पेशल टास्क फोर्सने ही संधी साधून विरप्पनला डोळ्यात आणि डोक्यात अश्या तीन गोळ्या मारल्या आणि १० वर्षांपासून पोलिसांसोबत असलेला संघर्ष संपवला.
१०. बाटला हाऊस – दिल्ली – २००८:
१९ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या या एन्काऊंटर वर जॉन अब्राहम चा एक सिनेमा सुद्धा तयार करण्यात आला आहे. दिल्लीतील जामिया नगर येथे स्थित बाटला हाऊस येथे इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचे काही प्रतिनिधी लपल्याची पोलिसांना पक्की माहिती मिळाली होती.
एन्काऊंट स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्स्पेक्टर मोहन चांद शर्मा हे इथे फक्त चौकशी करण्यासाठी जाणार होते. पण, ही चौकशी एन्काऊंटर मध्ये बदलली आणि त्या भागातील लोकांनी २० मिनिटं हा थरार अनुभवला.
–
हे ही वाचा – आजही या एन्काऊंटर केसला भारतातली सर्वात जास्त वादग्रस्त केस का मानलं जातं?
–
ह्युमन राईट्स कमिशनने याविरुद्ध केस दाखल केली होती. पण, दिल्ली पोलिसांना या प्रकरणात क्लीन चीट देण्यात आली होती.
विविध राज्यांमध्ये घडलेल्या या घटनांमधून एक लक्षात येतं की, पोलिसांची निर्णय घेण्याची प्रक्रिया ही सारखी असते. काही वेळेस त्यांचं कौतुक होतं तर काही वेळी त्यांच्यावर टीका होत असते.
पोलिसांना सुद्धा शिक्षा होऊ शकते हा आपल्या लोकशाही, न्याय व्यवस्थेचा विजय समजावा आणि पोलिसांना त्यांच्या तपासणीत सहकार्य करावे. सामान्य नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.