आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हल्ली आपण रोज घरातल्या काही कामांसाठी ऑफिससाठी किंवा फिरायला जाण्यासाठी गाडीचा वापर करतो. गाडी सध्या चैनीची गोष्ट न होता एक गरज बनली आहे.
आपण गाडीतून ऑफिससाठी किंवा फिरायला जातोय सगळं नीट चालू आहे आणि अचानक तुम्हांला कळतं की गाडीचे ब्रेक्स फेल झाले आहेत. अशावेळी साहजिकच भीती वाटते, आपण खूप घाबरतो. पण घाबरून न जाता त्यावर उपाय करणं महत्वाचं आहे. अशा वेळी काय करायला हवं ते आपण पाहूया.
–
- डिस्क ब्रेकवरील छिद्रं केवळ “शो” साठी असतात का? वाचा त्यामागचं नेमकं कारण…
- रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?
–
सर्व प्रथम चालकाला ही माहिती हवी, की तो चालवत असलेल्या गाडीचे ब्रेक कोणत्या प्रकारचे आहेत? ते अँटी लॉक ब्रेक आहेत की नॉर्मल रेग्युलर ब्रेक आहेत.
हे जाणून घेणे अगदीच सोपे आहे. गाडी चालू करतानाच ABS लिहिलेला लोगो आपल्याला दिसतो, तेव्हा समजावे की हा अँटी लॉक ब्रेक आहे. तो लोगो दिसत नसल्यास रेग्युलर ब्रेक आहे, हे स्पष्ट असते.
अचानक ब्रेक फेल झालेत, असं कळलं तर काय करावं आणि काय करू नये हे माहित असणं महत्त्वाचं… काय करू नये ते आधी जाणून घेऊयात…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
या गोष्टी करू नयेत
गाडी चालू असताना ब्रेक फेल झाले आहेत, हे कळल्यावर गाडीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी या गोष्टी टाळायला हव्यात.
१. अशावेळी घाबरून जाऊ नये, ब्रेक फेल झाल्यानंतरचा काही काळ आपल्यासाठी आणि आपल्यासोबत असणाऱ्यांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. त्यामुळे त्यावेळेला दीर्घ श्वास घ्या आणि लक्ष केंद्रित करा.
२. अचानक गाडीचे गिअर्स कमी करू नका, ते अत्यंत धोकादायक ठरू शकतं. गाडी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. शक्य तितक्या हळू हळू वरच्या वरून पहिल्या गिअरवर यायला हवं.
३. काही जण अशा वेळेला गाडी बंद करतात. हेदेखील करू नये, अशामुळे स्टिअरिंग बंद होऊ शकते आणि गाडीवरचा ताबा सुटू शकतो.
मग अशावेळी नेमकं करायचं काय? तेच आता पाहूया…
१. ब्रेक पेडल सतत दाबत राहावे, यामुळे गाडीच्या ब्रेक सिस्टिममध्ये दाब निर्माण होऊन गाडीचा स्पीड कमी होण्याची शक्यता असते. ब्रेक दाबताना तुम्हाला दाब जाणवत असेल, तर हे सतत करत रहा जोपर्यंत तुमची गाडी पूर्णपणे थांबत नाही .
२. हळू हळू पार्किंग ब्रेक दाबत रहा, गाडीच्या मागील दोन चाकांवर पार्किंग ब्रेकचे पूर्णपणे नियंत्रण असते. पंरतु हा ब्रेक फार लवकर वापरू नये, कारण त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता जास्त असते.
३. जर पार्किंग ब्रेक काम करत नसेल, तर हळू हळू गिअर कमी करावे, याला इंजिन ब्रेकिंग असे म्हणतात.
४. आपल्यासोबतच इतर वाहने आणि पादचाऱ्यांसाठी धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. हा धोका टाळण्यासाठी रस्त्यावरील एखाद्या सुरक्षित ठिकाणी जावे. आजूबाजूला तसे काही नसेल तर गवत, मोकळे मैदान पाहून गाडी तेथे न्यावी.
५. जेव्हा गाडी थांबेल तेव्हा गाडी आहे त्याच जागी थांबवावी आणि तिला हलवण्याचा प्रयत्न करू नये.
६. आपण किंवा आजूबाजूची व्यक्ती जखमी झाली असल्यास, आपत्कालीन क्रमांकावर फोन करावा.
७. ब्रेक फेल झाले आहेत, हे कळताच गाडीचे आपत्कालीन दिवे / हझार्ड लाईट्स चालू करावेत. आपल्या आजूबाजूच्या लोकांना हॉर्न वाजवून तुमची परिस्थिती निदर्शनास आणून द्यावी. यातून त्यांना निर्माण होणारा धोका कमी होईल.
८. वरील उपाय करूनही ब्रेक लागत नसतील आणि गाडी थांबत नसेल, तर अशावेळी आपल्या गाडीचा वेग कमी करण्यासाठी रस्त्यावरील संरक्षक भिंतींचा वापर करा. त्या भिंतींवर गाडी हळुवार पणे घासत न्यावी. यावेळी गाडीचा विचार न करता स्वतःच्या जीवाचा विचार करणे योग्य ठरेल.
९. जमेल तितक्या रस्त्याच्या कडेला जाण्याचा प्रयत्न करा, रस्त्याच्या मधोमध असणे इतरांसाठी धोकादायक ठरेल.
–
- गाडी थांबवताना ब्रेक आणि क्लचचा वापर चुकीचा तर करत नाही ना? जाणून घ्या
- कारचा ब्रेक लावतांना प्रत्येक वेळी क्लच दाबण्याची गरज असते का? उत्तर वाचा!
ब्रेक वापरताना घ्यावी ही काळजी
गाडीत अँटी लॉक ब्रेक असल्यास, तो कोरडा किंवा योग्य रस्ता पाहून वापरावा. हा ब्रेक दाबताना आपल्याला काही प्रमाणात धक्के जाणवतील हे झाल्यास समजावे की तुमचा ब्रेक योग्य काम करत आहे.
ब्रेक फेल होऊ नये यासाठी काळजी घेणं कधीही अधिक उत्तम राहील. यासाठी नक्की काय करावं तेदेखील आज जाणून घेऊयात.
ब्रेक कायम तपासत रहा. ब्रेक पॅड आणि रोटर्स कडे लक्ष द्या. अनेक वेळा हे दोन्ही झिजल्यामुळे ब्रेकवरील दाब कमी होतो आणि ब्रेक फेल होण्याची शक्यता वाढते.
गाडी चालवताना, ब्रेक कमी लागत आहेत असं जाणवत असेल, तर गाडी तातडीने सर्व्हिसिंगसाठी देण्यात यावी.
ब्रेक लायनर्स खराब होण्यामुळेही काही वेळा ब्रेक फेल होऊ शकतात, त्यामुळे लायनर्सकडे लक्ष ठेवणेही गरजेचे आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.