आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्याला वाटतं की ज्यांना चष्मा लागलाय ते किती लकी आहेत ना? कारण त्यांना लोक स्कॉलर समजतात. त्यांच्याकडे लगेच आकर्षित होतात आणि चष्म्यामुळे चेहऱ्याला एक हटके लुक मिळतो.
याच दृष्टीकोनामुळे सध्या एक नवीन ट्रेंड सुरु झालाय. तो म्हणजे ज्याला चष्मा नाही तो मनुष्य देखील खोटा का होईना चष्मा घालून फिरतो.
एखाद्या चष्मा असलेल्या माणसाला लोक जसे वागवतात तसेच आपल्याला वागवतील अशी त्याची अपेक्षा असते.
पण तुम्हाला माहित आहे का ज्यांना चष्मा असतो ते मात्र आपला चष्मा कधी सुटतोय याची वाट बघत असतात. विश्वास बसत नसेल तर विचारून बघा एखाद्या चष्मीश माणसाला! तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरोखर चष्मा लागणे हे किती वेदनादायक असते.
==
हे ही वाचा : सावधान : लेन्स वापरताय? या गोष्टी समजून घेतल्या नाहीत, तर एक चूक तुम्हाला महागात पडू शकते
==
असो. आज त्याच सर्व चष्मा असणाऱ्या दु:खी कष्टी लोकांसाठी आम्ही ही खास माहिती घेऊन आलोय. जर तुम्हालाही चष्मा सोडवण्याची खरंच इच्छा असेल तर आम्ही सांगतोय त्या गोष्टी एकदा करून पहा.
सूर्यफुलाच्या बियांच्या सेवनामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. सूर्यफुलाच्या बियांत विटामिन सी, विटामिन ई, बीटा, केरोटीन तसंच एन्टीऑक्सिडेंट आढळतात. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
लिंबू आणि गुलाब पाणी समप्रमाणात मिसळून डोळ्यांमध्ये टाकल्यानं त्याचा फायदा होतो.
एरंडीचे तेल किंवा मोहरीचं तेल डोळ्यांत टाकल्यानं डोळ्यांची सफेदी वाढते.
==
हे ही वाचा : डोळ्यांसाठी गाजर चांगले? दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांनी जगाला उल्लू बनवण्याची कहाणी
==
केळी खाल्ल्यानंही डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा, यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी होतात.
तुरटीचा एक छोटा तुकडा गरम करून घ्या आणि त्याल गुलाब पाण्यात टाका. त्यानंतर हे पाणी प्रत्येक दिवशी रात्री चार-पाच थेंब डोळ्यात टाका. चष्म्याचा नंबर कमी व्हायला यामुळे मदत मिळेल.
तुळशीच्या पानांचा रसाचे दोन थेंब दररोज डोळ्यांत टाकल्यानं डोळ्यांचा पिवळसरपणा दूर होतो.
दररोज लिंबू पाणी प्यायल्याने डोळ्याला फायदा होतो.
==
हे ही वाचा : लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांवर ताण येतोय? डोळ्यांची निगा राखण्यासाठी या ७ टिप्स फायदेशीर ठरतील
==
रोज तीन-चार कप ग्रीन टी प्यायल्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते.
रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना मोहरीच्या तेलानं मालिश करा. सकाळी उठून हिरव्या गवतावर अनवाणी थोड्यावेळ चाला. यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत मिळेल.
आम्हाला खात्री आहे की या गोष्टी नक्कीच चष्मा सोडवण्यासाठी तुमची मदत करतील.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.