आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
दारू ही एक अशी वस्तू आहे ज्याची तिच्या चाहत्यांना प्रत्येक परिस्थितीत आठवण होत असते. आनंदी असो वा दुःखी, सेलिब्रेशन असो किंवा वाढदिवस हे दारुशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत हे मानणारे खूप लोक आहेत.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांपासून थोडा ब्रेक आणि एका वेगळ्याच जगाची सैर म्हणून सुद्धा दारूचं सेवन करणारी सुद्धा खूप मोठी जनता आहे.
कोणतंही व्यसन हे मर्यादेत असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी होतात. ती मर्यादा काटेकोरपणे पाळणं यासाठी मात्र मनावर ताबा असावा लागतो.
हे विशेष नमूद करण्याची गरज आहे कारण, एकदा दारू प्यायला लागले की, काही जण थांबतच नाहीत आणि जेव्हा त्यांना दारू ‘चढते’ तेव्हा त्यांचं असंबद्ध बोलणं, वागणं सुरू होतं.
काही लोकांचं असं म्हणणं आहे की, ‘त्या’ परिस्थितीत माणूस जे बोलतो अगदी सत्य असतं. विज्ञानाने यावर काही संशोधन केलेलं नाहीये. पण, दारूची नशा झाल्यावर लोक इंग्रजीत का बोलतात? यावर संशोधन झालं आहे.
मातृभाषा कोणतीही असली, दारू देशी असो का विदेशी, तिचं सेवन केल्यानंतर काही लोक इंग्लिश विंग्लिश का होतात? याची एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे. काय आहे या मागचं कारण? जाणून घेऊयात.
–
हे ही वाचा – दारू पिणाऱ्यांना यापुढे डॉक्टरांकडे जाताना प्रचंड सावधगिरी बाळगावी लागणार आहे!
–
वाईन, बियर ही अशी पेयं आहेत ज्यांच्या सेवनाने लोक फॉरेन लँग्वेजकडे जास्त आकर्षिले जातात अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.
मानस शास्त्राच्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघितलं, तर हे शास्त्रीय उत्तर समोर येतं, की “कोणतीही परकीय भाषा बोलायची म्हंटलं की, आपल्या मनात एक संकोच, चूक बोलण्याची भीती असते. दारू तुम्हाला अशा मनस्थितीत नेऊन ठेवते जिथे तुमच्या मनातील सर्व संकोच, भीती नाहीशी झालेली असते. इंग्रजीत बोलण्याची सुद्धा. म्हणून इतर वेळी इंग्रजीत न बोलणारी व्यक्ती त्यावेळी अगदी आत्मविश्वासाने इंग्रजीत बोलत असते.”
काही संशोधकांनी असाही दावा केला आहे की, “तुम्ही जर एखादी भाषा शिकत आहात आणि त्या दरम्यान जर तुमच्या शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण वाढलं तर तुम्ही नशेत असतांना त्या भाषेत बोलायला लागता. कारण, त्या स्थितीत तुमच्या मनात कोणतीच भीती नसते. तुमच्या ‘कॉग्नेटिव्ह’ म्हणजेच संज्ञानात्मक संवेदना या अल्कोहोलमुळे जागृत होतात.”
काही पण सांगताय, मग काय नवीन भाषा शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दारू प्यावी का? असा प्रश्न पडू शकतो. तर तसं काही गरजेचं नाहीये. आकलनशक्ती ही प्रत्येकाची वेगळी असते.
कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्याचा अभ्यास आणि बोलण्याचा सरावच करावा लागतो, बाकी दुसरं काहीच नाही. संशोधकांनी तर हे पण सांगितलं आहे की, ५० जर्मन विद्यार्थ्यांना डच भाषा शिकवतांना अर्ध्या लोकांवर अल्कोहोल आणि अर्ध्या लोकांवर पाण्याचा वापर करण्यात आला होता.
त्यातील अल्कोहोलचं सेवन करणाऱ्या व्यक्तींनी डच भाषा कमी वेळात शिकली होती. पण, हे सुद्धा व्यक्तिशः त्या लोकांनी केलेल्या सरावामुळे सुद्धा घडलेलं असू शकतं.
शिक्षकांना याबाबतीत विचारल्यावर त्यांनी असं सांगितलं होतं की, “अल्कोहोलचं सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त आत्मविश्वास दिसल्याने हा बदल जास्त जाणवत होता. पाणी पिणारे सुद्धा इंग्रजी शिकले होते, पण ते बोलत नव्हते इतकाच काय तो फरक होता.”
संशोधक हे पण सांगतात की, अल्कोहोलच्या अतिसेवनाने तुमची बोलण्यातली गती वाढते आणि त्यामुळे बोलतांना तुमच्या चुका होण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने लोकांना जिंकू शकता, पण व्याकरणामुळे लोकांचं तुमच्या भाषेबद्दलचं मत बदलू शकतं.
समरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा कमी प्रमाणात घेतलेलं अल्कोहोल उपयुक्त असतं अशी माहिती ‘जर्नल ऑफ सायकोफार्मालॉजी’ मध्ये देण्यात आली आहे.
जे लोक गाणे म्हणणे, डान्स करणे याबद्दल खूप विचार करतात किंवा त्याबद्दल घाबरून असतात ते लोक दारूच्या नशेत ही कामं सहजपणे करतात हे सुद्धा सांगण्यात आलं आहे ज्याचा आपल्यापैकी काही लोकांनी अनुभव सुद्धा घेतला असेल.
आनंदी रहाण्याच्या प्रत्येकाच्या आपल्या व्याख्या आहेत. अल्कोहोल अतिसेवन हे शरीरासाठी चांगलं नाहीये इतकं फक्त लक्षात ठेवावं आणि आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणत्याही वस्तूवर अवलंबून राहू नये.
व्यसनाशिवाय आपल्याला आनंदी करणाऱ्या गोष्टी शोधून काढाव्यात आणि त्यांना वेळ द्यावा.
===
हे ही वाचा – दारू उतरण्यासाठी कडक कॉफी प्यावी, खरं की खोटं? मित्रांसाठी, या खास टिप्स…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.