Site icon InMarathi

या भावाची “पुरात देखील वरात”, व्हिडिओ पाहून नेटकरी जोमात!

sangli final feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हौसेला मोल नाही मग परिस्थिती कोणतीही असो, मागच्या वर्षांपासून आलेला कोरोना असो किंवा महाभयंकर पूर असो, आपली लोक कुठेच यात कमी पडत नाही. ‘सगळी हौस मौज आहे ती लग्नात कर’ अशी तंबी आज घराघरात वडीलधारी मंडळी आपल्या मुलांना देत असतात.

काही घरात पालक देखील एकदा का मुलाचे लग्न ठरले की आनंदात काय करू काय नको अशा स्थितीत असतात. मोठमोठाले हॉल बुक करणे, भव्यदिव्य सेट उभारणे, असं जंगी थाटच असतो मात्र गेल्या वर्षीपासून या सगळ्यावर पाणी फिरले आहे.

 

 

हजार हजार माणसांमध्ये होणारा लग्नसोहळा आज मात्र केवळ २५ लोकात होत आहे. त्यामुळे याचा परिणाम एकूणच लग्न कार्यात समाविष्ट होणाऱ्या सर्व गोष्टींवर होत आहे. लग्नातील वरात म्हणजे सर्वांचा आवडीचा भाग, बेफाम होऊन नाचणारे मित्रमंडळी सोबतीला डीजे पण अशीही एक वरात आहे, जी निघाली चक्क होडीतून…. तीदेखील पुराच्या पाण्यात! बघा मग हा व्हिडिओ..

आपल्याकडे लग्नाच्या विधींमध्ये सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे वरात नाचवणे, वरातीची अशी खास घोडी असते, वरातीत घोडी नाचवणे हा प्रकार सुद्धा बघण्यासारखा असतो. पण वरच्या व्हिडिओमध्ये निघालेली अशी ही वरात भारतातली पहिली वरात असू शकते. सांगली जिल्ह्यात आणि शहरात सुद्धा पाणी काही फुटांवर गेले होते.

 

 

पूरजन्य परिस्थती असताना सुद्धा लग्न सोहळे आपल्याकडे थांबत नाहीत, नजर जाईल तिथे पाणीच पाणी अशा परिस्थितीत माणसाची बुद्धी काम करणे बंद होते, मात्र काही लोक यात सुद्धा आपले मनोरंजन करत असतात. लग्न सोहळे हे खार तर एक पवित्र सोहळा असतो मात्र त्यापेक्षा लग्नात गमतीजमती जास्त घडत असतात.

काही दिवसांपूर्वी पुण्यात देखील एक घटना घडली ज्यात नववधू कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसवून फोटोशूट केले होते, सासवडला ती जात होती वाटेत फोटो काढायची इच्छा झाली म्हणून तिने थेट गाडीच्या बॉनेटवर बसून फोटो काढले आणि लगेचच ते फोटो व्हायरल झाले, पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्यावर त्यांनी तातडीने कारवाई केली.

 

हे ही वाचा – नर्सने हात लावताच पोलिसाला फुटलं हसू : गमतीशीर व्हिडिओ नक्की बघा

लहानपणी आपण सुद्धा पावसामुळे पाणी तुंबल्यावर त्यात मुद्दाम जाऊन भिजण्याचा आनंद घेत असू, कागदाची होडी बनवून त्या होड्यांची शर्यत लावत असू, छत्री असताना देखील पावसात भिजण्याची मज्जा वेगळीच असते.

सध्या कोल्हापूर, सांगली परिसरात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे, बाजारपेठा, शहरातील प्रमुख रस्त्यावर ५ फूटाच्यावर पाणी होते, त्यामुळे रस्ता कधीच पाण्याखाली गेला होता, काही घरांच्या छतावर देखील पाणी गेले आहे. सांगलीत नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की नदीमधली मगर एका घराच्या छतावर गेली होती.

आज आपल्यावर संकटांवर संकट येत आहेत अशा परिस्थितीत आपण एकत्र येऊन समाजभान बाळगायला हवे. पूरपरिस्थिती असो किंवा कोरोनाचे संकट आपला जीव धोक्यात घालू नये. चिपळूण, महाडसारखी शहर आता हळूहळू सावरत आहे मात्र लोकांना सावरयाला वेळ लागेलच. कोल्हापूर सांगलीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version