Site icon InMarathi

अस्सल मच्छी खवय्यांसाठी ही जागा म्हणजे स्वर्ग आहे, कारण येथे पडतो माशांचा पाऊस!!

fish im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पाऊस म्हणजे काय? तर आकाशातून पाणी पडणे! बाष्पीभवन प्रक्रिया तर सर्वांनाच माहित आहे, तर त्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून पाऊस पडतो हे देखील आपण शाळेत शिकलो. पण तुम्हाला आम्ही म्हटलं की जगात अशी काही ठिकाण आहेत जेथे वेगळ्याच प्रकारचा पाऊस पडतो तर????

तुमचा थेट विश्वास बसणार नाही म्हणा, पण इंटरनेटवर तुम्ही सर्च केलंत तर तुम्हाला या आगळ्या वेगळ्या पावसांबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी नजरेस पडतील.

आपल्या भारताच उदाहरण घ्या ना, केरळ मध्ये काही वर्षांपूर्वी रक्ताचा पाऊस पडला होता. ही घटना म्हणजे देवाची अवकृपा आहे असा जावईशोध देखील अनेकांनी लावला, पण त्यामागे शास्त्रीय कारण असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

 

 

अशीच एक घटना घडली होती महाराष्ट्रातील डोंबिवली मध्ये! डोंबिवली मध्ये अगदी काहीच वर्षांपूर्वी अॅसिडचा पाऊस पडला होता. या घटनेला देखील चमत्काराचे रूप देण्यात आलं होतं. पण हा पाऊस हवामानातील बदलामुळे आणि केमिकल रीअॅक्शनमुळे निर्माण झाल्याचे नंतर उघडकीस आले.

पण तुम्हाला माहित आहे का? एका वेगळ्या प्रकारचा पाऊस पडतो होंडूरास नावाच्या देशामध्ये. हा पाऊस असतो माश्यांचा. काय? दचकलात न ऐकून? चला तर जाणून घेऊया काय आहे हे नेमकं प्रकरण!

मॅक्सिकोपासून जवळच असलेल्या होंडूरास नावाच्या देशात तब्बल शंभर वर्षांपासून चक्क माशांचा पाऊस होतो. म्हणजे आपल्याकडे कसा ठराविक हंगामात पाण्याचा पाऊस पडतो, तसा इथे ठराविक वेळी माशांचा पाऊस पडतो.

येथे आकाशातून धो धो मासे कोसळायला लागतात. या पावसामुळे रस्त्यावर माशांचा ढिग लागलेला असतो. हा माशांचा ढीग इतका प्रचंड असतो, की येथील वाहतूक विस्कळीत होते.

 

 

फक्त याच देशात नाही तर आपल्या भारतामध्ये देखील अश्याच प्रकारचा पाऊस पडून गेलाय. २० जून २०१५ रोजी आंध्र प्रदेशच्या गोलामुड्डी येथे माशांचा पाऊस पडला होता.

तसेच आपला शेजारील देश श्रीलंकेतही माशांचा पाऊस झालेला आहे. ज्यांनी या पावसाचा अनुभव घेतलाय त्यांच्या मते हा अनुभव शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही.

या पावसालाही अनेकांनी चमत्काराचे रूप देऊ केले, पण तज्ञांच्या मते त्यामागेही वैज्ञानिक करणे आहेत. कारण जेथे जेथे असा माश्यांचा पाऊस होतो तेथे पाहणारा असा समज करून घेतो, की आकाशातून माशांचा पाऊस पडतो आहे.

असा निष्कर्ष काढला गेला, की समुद्रामध्ये जेव्हा जोराचे वारे वाहू लागतात, तेव्हा समुद्रात मोठमोठे भोवरे तयार होतात. या भोवऱ्यामुळे समुद्रातील लहान लहान मासे बाहेर दूरवर फेकले जातात आणि हे मासे आकाशातून पडत आहेत, असं वाटतं.

 


काहीही असो अस्सल मच्छी खवय्यांसाठी अश्या जागा म्हणजे स्वर्गच म्हणाव्या लागतील!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version