' उपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणा शाकाहारी आहे का? जाणून घ्या! – InMarathi

उपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणा शाकाहारी आहे का? जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उपवासाला आपण मोठ्या आवडीने साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर अशा सगळ्याच साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थांवर ताव मारतो. साबुदाण्याची खिचडी आवडत नाही, अशी कोणतीच व्यक्ती नसेल. पण साबुदाणा उपवासाला खरंच खावा का, किंवा शाकाहारी लोकांनी याच  सेवन करावं का, ह्या बाबत अनेकदा वादग्रस्त बातम्या येत राहतात.

जसं, साबुदाण्यात जिलेटीन असतं त्यामुळे साबुदाणा हा मांसाहारी अन्नप्रकारात मोडतो. अशा अनेक खोट्या बातम्या आपण ऐकल्या आहेत, पण त्या सगळ्याच खोट्या आहेत हे सुद्धा सिद्ध झालं आहे. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गोष्टीपासून सावध करणार आहोत, ती कोणत्याही प्रकारची अफवा नाही किंवा खोटी बातमी नाही. त्याचे पुरावेही आहेत, तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही जे सांगतोय त्याची तपासणी करू शकता.

 

sabudana khichadi health-inmarathi05

 

साबुदाणा हा शाकाहारी नसून मांसाहारी पदार्थ आहे आणि आपण उपावसाच्या फराळात याचा समावेश करणं थांबवलं पाहिजे. असं का तर यामागे सुद्धा एक कारण आहे. त्यासाठी, साबुदाणा कसा बनवतात आपल्याला ह्याची प्रक्रिया जाणून घ्यावी लागेल. चला जाणून घेऊया.

भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात साबुदाण्याचं उत्पादन हे मुख्यतः तामिळनाडूत केलं जातं. कारण साबुदाण्याच्या उत्पादनाला लागणारी वनस्पती, “सागो पाम (sago palm)”  हे तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात आढळतं. याच्या खोडाला व मुळांना, अनेक महिन्यांपार्यंत मोठाल्या कंटेनर किंवा कुजवून आणि सडवून त्यांच्यातून एक पांढरा दुधासारखा पदार्थ बाहेर येतो.

 

sabudana-health-inmarathi04

 

या पदार्थाला मोठ्या कंटेनरमध्ये किंवा मोठ्या हौदात, झाडाच्या मुळांसकट साधण्यासाठी ठेवलं जातं. काही महिन्यांनी, एक तरल पदार्थ वर तरंगू लागतो, व पांढरा जड पदार्थ तळाशी साचतो. ह्यानंतर, या सगळ्यालाटाक्यातून बाहेर काढून तरल पदार्थाला व खाली साचलेल्या पदार्थाला वेगळं केलं जातं. आणि याच जड पदार्थापासून साबुदाणा बनवण्याचा, आटा तयार होतो. पुढे, फॅक्टरी मध्ये नेऊन या  आट्यापासून साबुदाण्याचे छोटे गोलाकार दाणे बानवले जातात व त्यांना पॉलिश केलं जातं.

ही झाली साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया, पण आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की ह्यात तर मांसाहाराशी संबंधित काहीच नव्हतं. तर जरा अजून खोलात शिरून फॅक्टरी मधली परिस्थिती समजून घेऊया. साबुदाणा, जरी वनस्पती पासून बनत असला तरी, मध्ये जेव्हा त्या मुळांना, लगद्याला सडण्यासाठी ठेवतात त्या कंटेनरवर कोणत्याही प्रकारचं झाकण नसतं. ते सताड उघडे असतात.

 

sabudna inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – उपवासाच्या पौष्टिक, चविष्ट पदार्थांपैकी तुमचा आवडता पदार्थ कोणता? वाचा आणि सांगा

फॅक्टरीमध्ये मोठाले लाईट सुद्धा लागलेले असतात, ज्यामुळे लाईट्सच्या भोवती जमा होणारे किडे, कीटक सरळ ह्या कंटेनर्स मध्ये जाऊन पडतात. याशिवाय, या कंटेनर्स मध्ये तयार होणाऱ्या पांढऱ्या पदार्थांत अनेक सूक्ष्म किटाणू, अळ्या कधी कधी तयार होतात, जे आपल्याला वरून दिसून येत नाही.

या सगळ्या लागद्याला, पुढे हे कामगार आपल्या पायांनी तुडवतात व मेलेले किडे, कीटक, सूक्ष्म जीव, अळ्या, सगळे एकजीव होते. ही पायाने तुडवण्याची प्रक्रिया २-३ वेळा केली जाते. आणि सगळ्यात शेवटी, वर जमा झालेला तो तरल पदार्थ काढून टाकण्यात येतो.

त्या पदार्थात सहसा, झाडाच्या मुळांचा लगदा, कचरा सगळं निघून जातं. पण आधी तुडवले किडे, कीटक इत्यादी त्यातच उरतात आणि हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं असतं. या मिश्रणापासूनच पुढे साबुदाणा बनवण्यात येतो. व आपण मोठ्या आवडीने हा साबुदाणा खातो

 

sabudana inmarathi 2

 

तामिळनाडूतील लोक, उपवासाला साबुदाण्याचा कधीच उपयोग करत नाहीत. ते फक्त फळ, दूध भगर ह्याचंच सेवन करतात. कारण त्यांना तो साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया माहित असते. व इतकं सगळं त्या साबुदाण्याच्या मिश्रणात असलेलं असतं त्यांना पूर्णपणे ठाऊक  असतं.

फॅक्टरी मध्ये जे काही बनतं ते कसं बनवतात याची आपल्याला कल्पना नसते, पण आपण जागरूक नागरिक म्हणून सगळ्या प्रक्रिया नीट समजून घ्यायला हव्या. साबुदाण्यासारखी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतील. साबुदाणा सुरवातीला मांसाहारी नसतो पण त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेमुळे तो नंतर मांसाहारी पदार्थच बनतो.

 

fruits-inmarathi

 

उपवास, व्रत आपण हे सगळं मोठ्या श्रद्धेने करत असतो. आपल्या, प्रसन्न व शुद्ध भावना त्यामागे असतात. ह्या वेळेस आपण साधं खरकटं अन्न ग्रहण करत नाही तर ह्या पवित्र वेळेत, मांसाहार करणे ही अत्यंत दूरची गोष्ट आहे. पण साबुदाण्यासारख्या अनेक पदार्थांतून आपल्या पोटात असेच घटक जातायत का, हे आपण खरंच तपासून घ्यायला हवं.

आता, साबुदाणा मांसाहारी असतो म्हणून उपावसाला तो खाऊच नये अस नसतं. कारण, अनेक कारखान्यांमध्ये साबुदाणा बनवताना खूप खबरदारी घेतली जाते.

स्वच्छता, उत्तम दर्जाचं रॉ- मटेरियल, सगळं नीट पारखून घेतात. अशा कारखान्यांतून बनलेला, पाकिटातून विकला जाणारा साबुदाणा आपण नक्कीच वापरू शकतो. त्यामुळे साबुदाणा विकत घेताना नेहमीच सावधानता बाळगा आणि मनसोक्त आनंद लूटा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?